एनाबेल हा हाॅलिवूड चा चित्रपट आहे. या चित्रपटाने आणि त्याचाच दुसरा भाग असलेल्या एनाबेल क्रिएशन या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच घाबरवले.
या चित्रपटामध्ये दाखवलेली बाहुली खुप विचित्र आणि भीतीदायक आहे. एनीबेल हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.
या चित्रपटामधे जसे लोकांना बाहुली त्रास देते, तसेच खऱ्या आयुष्यामध्ये देखील झाले आहे. चित्रपट फक्त बघूनच ते एवढे भयानक वाटते, मग विचार करा की, खऱ्या आयुष्यामध्ये ज्यांनी अनुभवलेल असेल त्यांच्यावर काय परीस्थिती ओढवली असेल.
गोष्टींची सुरूवात :——
१९७० मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणारी डोना जी तिची मैत्रीण अनंगीबरोबर एका अपार्टमेंट मध्ये राहत होती. त्यांच्याबरोबर लू नावाचा मुलगा सुध्दा राहत असे.
डोनाच्या आई ने तिच्या वाढदिवसाला तिला एन्टिक बाहुली गिफ्ट केली होती. पण तिच्या आई ला आणि तिला हे माहीत नव्हत की, काही दीवसामध्ये ती बाहुली त्यांचे जगणे कठीण करून ठेवेल.
डोना आपल्या आईने दिलेली बाहुली आपल्या बेडवर एका कोपऱ्यात सजवून ठेवत असे.
काही दिवसांमध्ये डोनाला आणि तिच्या मैत्रीणीला त्या बाहूलीचा वाईट अनुभव येऊ लागला. त्याच्या लक्षात आले की, बाहुली स्वतःहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. त्या दोघी ज्या ठिकाणी बाहूलीला ठेवून जात असत, घरी आल्यावर बाहुली त्या जागेवर नसायची. ती बाहुली दूसऱ्याच ठिकाणावर असे. बाहूलीला एखाद्या रूम मध्ये जर दरवाजा बंद करून जरी त्या दोघी बाहेर गेलेल्या असल्या तरी सुध्दा तरी ती बाहुली आपली जागा सोडून बाहेर जात असे.
हळू हळू रूम मध्ये काही चिट्या मिळू लागल्या. त्याच्यावर ‘हेल्प मी’ असं लिहीलेल असायच. ते अक्षर एखाद्या लहान मुलाच असावे. त्यानंतर त्यांनी एक आत्माशी संवाद साधणाऱ्या एका व्यक्तींला बोलावले. त्या व्यक्तीने सांगितलेकी, या बाहूलीमध्ये लहान मुलीची आत्मा आहे. तिचे नाव एनाबेल होते. ती मुलगी इथेच खेळायची आणि तिचा मृत्यू देखील येथेच झाला आहे. तिला डोना आवडते तिला तिच्याबरोबर राहायच आहे. डोनाने तिला ठेवण्यास होकार दिला.
थोडे दिवस गेल्यानंतर परत डोनाला भयानक अनुभव यायला सूरूवात झाली. तिच्याबरोबर राहणाऱ्या लू ने सांगितले की, या बाहुलीमध्ये राक्षसी ताकत आहे आणि तिला जवळ ठेवने खूप भारी पडू शकते.
एकदा लू वर त्या बाहूलीने हल्ला केला. हे त्याने डोना आणि अनंगीला सांगितले पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हळूहळू डोनाला लक्षात आले की, त्या बाहूलीमध्ये लहान मुलीचा आत्मा नाही. ऐके दिवशी दुपारी लू आणि अनंगी घरात गप्पा मारत असताना त्यांना डोनाच्या रूममधून किंचाळण्याचा आवाज आला, परंतु डोना तर घरात नव्हती. त्या दोघांनी घाबरतच तिच्या रूममध्ये प्रवेश केला, पण तिथे ती बाहूली सोडून कोणीच नव्हत. बाहूलीने लू वर हल्ला केला आणि त्याला जखमी केले. या घटनेनंतर लू शाॅकमध्ये गेला.
पॅरानाॅर्मल इन्वेस्टीगेशन :——-
लू वर हल्ला झाल्यानंतर डोनाच्या लक्षात येते की, ही मुलगी शापित आहे आणि तिच्यामध्ये राक्षसी आत्मा आहे.
डोना मदत मिळवण्यासाठी एक बिशप “फादर हेगन” कडे जाते. फादर हेगन ला ती बाहूली शापित असल्याचे कळते. म्हणून तो डोनाला आपल्यापेक्षा वरिष्ठ “फादर कुक” कडे पाठवतो.
फादर कुक इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पॅरानाॅर्मल एक्सपर्ट वाॅरेन दाम्पत्याला बोलवतात.
वाॅरेन दाम्पत्य त्या तिन्ही मित्रांचे म्हणणे ऐकतात आणि एक आठवडा त्या बाहूलीच्या व्यवहाराचे निरीक्षण करतात. तेव्हा त्यांना समजते की, त्या बाहुलीला डोनाच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी त्या बाहूलीने एवढा खटाटोप केला होता.
तिला लू आवडत नसे म्हणून तिने त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्यांनी बोलवलेल्या माणसाला सुध्दा त्या बाहूलीने खोटे सांगितले.
To be continue next blog ……….



😧😦😲
ReplyDelete