Showing posts with label रहस्यमय कथा. Show all posts
Showing posts with label रहस्यमय कथा. Show all posts

Thursday, April 30, 2020

भितीदायक सत्य घटना


भयानक घटना म्हणटले की आपल्याला भिती वाटायला लागते. पण काही घटना सत्य ही असतात,आणि काही काल्पनिक ही असतात. जे आपण TV मलिका आणि सिनेमांमधून बघतो ते सर्व काल्पनिक असते. आपल्या अजुबाजूला भितीदायक घटना घडत असतात त्या ऐकुन आपल्याला विश्वास होवू लागतो, की भूतं, जादूटोणा वगैरे आहे. आज आपण आश्याच दोन सत्य घडलेल्या घटना पाहणार आहोत.

१. डीसुजा चाळ
                   
डीसुजा चाळ ही मुंबईच्या माहीम येथे आहे. ही चाळ खुप मोठी असुन त्या चाळींमध्ये एक विहीर आहे. अस सांगतात की २० वर्षा पुर्वी या विहीरीला कोणतीही कडा नव्हती. एकदा चाळीत राहनारी एक महिला पाणी घेण्यासाठी त्या विहीरीकडे गेली असताना, त्या विहीरीला कडा नसल्याने तीचा पाय घसरून ती विहीरीत पडली. ती स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती. तीची हाक कोणालाही ऐकु आली नाही. ती त्या विहीरी मध्ये बुडून मरन पावली. या घटनेला २० वर्ष झाली तरीही त्या विहीरी कडे जाण्यास लोक घाबरतात. त्या विहीरी भोवती तिची आत्मा फिरत असते असे तिथे राहणारी लोक सांगतात.
तिथे त्या विहीरीचा मालक दर आमावश्याला पुजा करतात. बऱ्याच लोकांनी एका महीलेची आकृती पाहिली ती नंतर अदृश्य होते. त्या आत्माने तिथे राहणाऱ्या लोकांना हाणी पोहचवली नाही. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. पण लोकांना बहुतेकदा सल्ला दिला जातो, की एकट्याने तिथे जाऊ नका. या चाळीत आणखी एक आत्मा आहे ती म्हणजे एका रक्षकाची असुन बहुतेकदा एका झाडाच्या जवळपास दिसते. तो रात्री येत असल्याचे दिसुन येत आहे. आणि काही लोक त्याला चाळीचे रक्षण करताना बघतात.

२. टाॅवर ॲाफ सायलेन्स

टाॅवर ॲाफ सायलेन्स हे नाव ऐकण्याईतकेच भीतीदायक आणि शांत आहे. दिवस रात्र इथे शांतता असते. आणि ही शांतता प्राणघातक आहे. याला शांततेचे क्षेत्र मानले जाते. हा जगातील सर्वात भयानक भाग मानला जातो. हे अश्या प्रकारचे एकमेव क्षेत्र आहे जेथे भितीदायक प्रवास केवळ पृथ्वीच्या अनुभवापुरते मर्यादित नाही तर त्या पेक्षा बरच काही आहे. दिवसा आपल्याला येथे एकापेक्षा जास्त भितीदायक दृश्य पाहायला मिळेल. इथली दृश्य भीतीदायक तसेच भिन्न आहेत.

इथल्या दृश्यांमध्ये लपलेल्या भीतीचे एक मोठे कारण आहे. आणि त्याचे कारण धार्मिक विधी आहे, ज्यामुळे येथे येणे म्हणजे वाईट गोष्टी स्वतःवर ओढावून घेतल्यासारखे होते. मुंबईच्या मलबार हिल भागांत स्थित टाॅवर ॲाफ सायलेन्स प्रत्यक्षात पारशी स्मशानभूमी आहे. इथल्या पारशी समाजातील लोक त्यांच्या मेलेल्यांचे अंतिम संस्कार करतात. त्यांच्या मध्ये मेलेल्या मानसाला जाळले किंवा पुरले जात नाही. ते मेलेल्या मानसाचे शरीर तिथे स्मशानभुमित सोडुन येतात. प्राण्याना खाण्यासाठी. गिधाडे आणि गरूड ते शरीर खाउन टाकतात.
विकृत शरीर, मानवी सांगाडे, शरीरातून देहाचे मांस पाहून आपले रक्त गोठेल. दिवसात ज्या ठिकाणी असे घडते, त्या ठिकाणी रात्री काय देखावे असतील. येथील स्थानिकांमध्ये प्रचंड भिती आहे. इथे जरी एखाद्याने दिवसा जाण्याची चूक केली तर रात्रीच्या वेळी कोणीही इथे जाण्याची हिम्मत करत नाही.

येथे एक मुलगी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसते. जे रात्रीच्या वेळी त्या रस्त्यातून येनाऱ्या जाणाऱ्यांना लिफ्ट मागत असते. या व्यतिरिक्त या ठिकाणी कार अपघातात ठार झालेल्या पारशी कुटूंबातील व्यक्तीनी त्या मुलीला पाहिले असल्याचा दावाही केला जात आहे.

तिथे बऱ्याचदा लोक येताना आणि जाताना दिसतात. ते गाडी खराब झाल्याच्या बहाण्याने लोक त्यांच्यकडे खेचतात आणि मदतीसाठी आवाहन करतात. या आत्म्यांनी इथून जाणाऱ्या काही लोकांचे नुकसान केले, त्यानंतर येथे अस सांगण्यात येते की तेथे जाणे धोक्याच ठरू शकत. आणि आजारपणाचे आव्हान आहे.

हे ऐकण्यासारखे किती आहे, आणि खरे किती आहे. काही लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण अज्ञान लोक घाबरतात

Saturday, April 11, 2020

देवाची आजी


माणूस जन्माला येतो. त्यानंतर त्यांच आयुष्य त्याच्या एका ध्येयापर्यंत जात आणि थांबत. शक्यतो शिक्षण, नोकरी, गाडी, बंगला, लग्न, मुले आणि नंतर मुलांची ह्याच प्रतिक्रियेत शेवटच्या श्वासापर्यंत साथ! पण या प्रतिक्रियेशिवाय स्री किंवा पुरुष पूर्ण होऊ शकत नाही अशी भारतीयांची धारना किंवा. अगदीच संस्कृती याशिवाय सुद्धा जगणारी एक बाई पाहिली मी जगासाठी एक वेगळाच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करून गेली.

मी एका खेडेगावात राहते. छोटंस टुमदार गाव आहे. बंगले, रस्ते, गाड्या आल्या पण विचारसरणी बदलली नाही. मी इतकी वर्ष या प्रतिक्रीयेचा हिस्सा आहे. पण बदलला तो बाह्यरंग आतून माणसं तिच भांडण म्हटल की अगदी जीवावर उठणारी आणि जीव लावला तर जीवाला जीव देणारी!

माझ्या गल्लीच्या मागच्या बाजुला एका मोकळ्या जागेत एक फांद्यानी साकारलेली झोपडी असली तरीही टापटीपणे ठेवलेली. ती झोपडी एका आजीची होती. तिला सगळं गाव देवाची आजी म्हणुन ओळखायची. देवाधर्माच्या गोष्टी अजुनही आमच्या गावाकडे एकत्रित होतात पण त्यांच नेतृत्व देवाची आजी करायची.

नदीवर गौराई आणायला जाताना सगळ्यात पुढे असणारी देवाची आजी. तिच्या मागे चालणाऱ्या वैतागलेल्या डोक्यावरच्या घागरीतली गौराई सांभाळताना आम्ही सगळ्या पोरी!

आजीची गौराईची गाणी तिच्या मागून गुणगुणताना अडखळनारे शब्द आणि ते सुधरवण्याचे प्रयत्न करणारी ती आमची आजी. खुप छान चित्र असायच ते. आजही आम्ही मैत्रीणी एकत्रित जमलो की आजीची आठवण काढतो.

आजीच देवाशी लग्न लागलेल होतं. त्यामुळे तिला देवाची काकू किंवा देवाची आजी म्हणलं जात. आजी हळू हळू म्हातारी होत गेली पण तरीही ती तिच एकटीच काम काटेकोरपणे करायची. नंतर मात्र तिच्याकडून तेही होणे बंद झालं

बऱ्याच दिवसांनंतर आम्हाला कळाल की आजीला तिचा भाचा घेऊन गेला आहे. भाच्याकडून ती परत आल्याचे कळाले. तिच्या भाच्याने घराबाहेर काढले होते. तिला सांभाळतो म्हणुन त्याने तिची गावात असलेली झोपडी विकली आणि पैसे घेऊन गेला. त्याने तिला सांभाळ तर नाहीच उलट तिचे पैसे घेउन तिलाच घराबाहेर काढले. ती गावामध्ये आल्यावर भटकत होती दारोदारी अन्न मागून खात होती. जिथ मोकळ छत दिसेल तिथे ती झोपत होती. तीला गावच्या सरपंचाने एका मंदीरात जागा दिली राहायला. गावकरी तीची मदत करत होते. तीला काय पाहीजे काय नको ते पाहत होते.

ज्या बाईंने आयुष्यभर जगभर आनंद वाटला, तिला मुठभर पोटासाठी दारोदारी भटकाव लागल. नंतर गाव सोडून गेली ती. कुठे गेली ती काय करते कोणीच सांगु शकत नव्हत. फार महीन्यानी खबर आली की देवाची आजी देवाकडे गेल्याच कळाल.

ज्या देवाच्या नावाने मळवट आयुष्यभर तिने भरला, तो तिच्यासाठी फक्त देवच राहिला पती कधीच झाला नाही. ज्या पतीच्या सेवेसाठी तिनं सगळ्यांना एकत्रित केलं त्यांच फळ तिला सोडुन सगळ्यांना मिळाल…………

आजही गौराई आम्ही घराबाहेर नळावर भरून आत घेतो ना तेव्हा एक सेकंद का होईना आम्हाला आजीची आठवणीत डोळ्यात टचकन पाणि येते.

आणि कानात आजीचा गाण्याचा आवाज घुमतो - - - - - - - - - - - - -

आली आली गौराई…………………..