Showing posts with label बिस्कीटस. Show all posts
Showing posts with label बिस्कीटस. Show all posts

Tuesday, June 16, 2020

‘पार्ले जी’ - या बिस्किटाच्या पॅकेटवर असणाऱ्या फोटोवरून अजुनही वाद चालु

  आपण लहानपणापासून पार्ले-जी बिस्कीट खात आहोत. आपण काय, आपल्या आई वडिलाही तेच खाऊन मोठे झाले आहेत. पार्ले-जीचे पॅकेट एकेकाळी जगातील सर्वात प्रसिद्ध बिस्कीट होते, ते बदलले नाही तर. त्यानंतर पार्ले यांनी बरीच उत्पादने बाजारात आणली असली तरी त्यांनी मुळ पार्ले-जीशी छेडछाड केली नाही. गेल्या दोन पिढ्यांच्या आठवणी या बिस्किटशी संबंधित आहेत. आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. नीलसनने २०११ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक विक्री होणारी बिस्कीट आहे. 

     आपण जेव्हा त्याचे मुखपृष्ठ पाहतो तेव्हा आपल्या मनांत एक प्रश्न पडतो. प्रश्न असा की त्याच्या मुखपृष्ठावर दिसनारी मुलगी कोण आहे? त्याहुनही महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे ती आजकाल कुठे आहे आणि काय करते? आपण बिस्कीटे संपवून तो कागद भेकुन देतो. पण मला आज हा प्रश्न पडला आहे.

     या बिस्कीटाच्या मुखपृष्ठावर मुलगी दिसण्यावरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. हा फोटो असलेल्या मुलीसाठी तीन महीलांचा दावा करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तीन लोकांबद्दल असे म्हटले गेले आहे की ते त्या फोटोमध्ये दिसतात. 

ती मुलगी कधीपासून या कवर वर दिसत आहे

      मुंबईतील विलेपार्ले येथे राहणाऱ्या चौहान कुटूंबाने १९२९ मध्ये ‘पार्ले’ नावाची कंपनी सुरू केली. सुरूवातीला फक्त मिठाई म्हणजे केक, पेस्ट्री आणि कुकीज यासारख्या गोष्टी विकल्या जात होत्या. पण बाजारात बिस्कीटांना मागनी होती. आणि ती ब्रिटिश कंपन्या पूर्ण करत होती. सन १९३९ पासुन पार्ले यांनी भारतात बिस्कीटे बनविणे आणि विक्री करण्यास सुरवात केली. १९८० पर्यंत ‘पार्ले ग्लुको’ बिस्कीट म्हणून ओळखले जात असे. नंतर त्याचे नाव बदलून ‘पार्ले जी’ करण्यात आले. कालांतराने, ‘जी’ ज्याला ग्लुकोज म्हणून ओळखले जायचे, ते बदलून जिनियस झाले. तसेच त्याच्या कवर वर दिसनारा फोटोही बदलला. पूर्वी गाय चे चित्र या बिस्कीटच्या कवर वर असायचे. परंतु नंतरच्या दशकात गायची जागा या गोंडस चिमुरडीचे घेतली. कंपनीची ही जाहिरात करण्याचे धोरण होते. 

  

  

 त्याच्या रॅपरचा रंग सुरवातीपासुन पांढरा आणि पिवळा आहे. पण या छोट्या चिमुरडीवरून बरीच चर्चा रंगली होती. नीरू देशपांडे, सुधा मुर्ती (आयटी उद्योगपती नारायण मुर्ती यांची पत्नी), आणि गुंजन गंडानिया या तिनं महीला या बिस्कीटावरच्या कवर वर असनारी मुलगी असण्याचा दावा करत आहेत. पण, त्या नीरू देशपांडे आहेत असे मानले जाते. नीरूच्या या फोटोमागची कहाणी अशी आहे की, जेव्हा त्या साडेचार वर्षीच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी हा फोटो घेतला होता. ते व्यवसायीक छायाचित्रकार नव्हते. परंतु ज्यांनी हा फोटो बघितला त्यांना हा फोटो खुप आवडला. हा फोटो अशा माणसाने पाहीला जो पार्ले वाल्यांचा ओळखीचा होता. अशा प्रकारे त्यांना पार्लेच्या पॅकेटवर झळकण्याची संधी मिळाली. मात्र आता नीरू ६३ वर्षांच्या झाल्या आहेत. 

       पण अजुनही त्या पार्लेजीच्या पॅकेटवर दिसनारी छोटीशी चिमुरडी कोण आहे. त्या पॅकेटवर दिसणाऱ्या मुलगीच नाव नीरू देशपांडे असल्याचे सांगीतले जाते. परंतु हे ही सांगितले जाते हा फोटो सुधा मूर्तींचा आहे .

सुधा मुर्ती ह्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांचा पत्नी आहेत. पण हेही सत्य आहे की, नीरूंचा फोटो शोधूनही सापडत नाही कारण सुधांचा फोटो सर्वत्र आहे. ह्या सगळ्या अफवा आहेत असही म्हणाले जाते पार्ले कंपनी चे प्रोडक्ट मॅनेजर मयंक जैन यांच म्हणने आहे की हा फोटो कुठल्याही मुलीचा फोटो नाही तर एक कल्पनाकेलेले चित्र आहे. हे ६० च्या दशकात मगनलाल दहीया नावाच्या कलाकाराने तयार केले आहे.