Showing posts with label Marathi short story. Show all posts
Showing posts with label Marathi short story. Show all posts

Thursday, April 23, 2020

कष्टाचे महत्त्व: राजाची शक्कल;शेतकरी मालामाल


माणूस हा आयुष्यभर कोणत्या ना काणत्या कारणांसाठी विविध प्रकारची कष्ट करत असतो. कष्ट मेहनत आणि परिश्रम या माध्यमातून यश संपादन करत असतो. कष्टाशिवाय सुख मिळू शकत नाही. सुखासाठी, आनंदासाठी, समृध्देसाठी कष्टाला पर्याय नसतो. कष्ट आणि कर्म या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, अनेकदा कर्म आणि कष्ट यांपासून माणूस दूर पळत असतो. कष्ट करण्याची तयारी नसते. असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी, अशीही अनेकांची वृत्ती असते. कष्ट करणाऱ्यांनाच कष्टांचे महत्त्व पटत असते. शिवाय दुसऱ्याला कष्ट करताना किती त्रास होतो, याचीही जाणीव असते. जीवन सुरळीत जाण्यासाठी कष्ट करणे भागच असते. कष्टांचे महत्त्व समजवण्यासाठी एका राजाने शक्कल लढवली. याचा फायदा मात्र एका गरीब शेतकऱ्याला झाला.
ललित नगरीचा राजा आदित्यदेव यांनी एक दिवस प्रजेची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सकाळी एक मोठा दगड रहदारी अधिक असलेल्या मार्गावर ठेवला. दिवस पुढे सरकला, तशी रस्त्यावर रहदारी वाढली. जो-तो त्या दगडाच्या बाजूने जायला लागला. त्या रस्त्यावर जाणाऱ्या जवळपास प्रतेकाला त्या दगडाचा त्रास होत होता. मात्र कुणीही तो दगड बाजुला करण्याचे कष्ट घेतले नाहीत. राजाचे मंत्री, सैनिक, कामगार सर्वजण त्या रस्त्यावरून गेले. परंतु कोणीही दगड रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला नाही. सूर्य डोक्यावर आल्यावर मात्र सर्वांनी राजाला आणि यंत्रणेला दोष देण्यास सुरूवात केली. राज्य कारभार करण्यास राजा सक्षम नाही. राजाला प्रशासनाचा गाडा चालवायचा अनुभव नाही. एवढेच नव्हे तर, राजाची गुप्तचर यंत्रणा झोपली आहे का? हा दगड बाजुला का केला जात नाही? असे प्रश्न उपस्थित करू लागले.

संपूर्ण दिवस राजावर दोषारोप करण्यात गेला. मात्र, कुणीही दगड हटवला नाही. सायंकाळ झाली हळूहळू अंधार होऊ लागला. त्या रस्त्यावरून एक वृध्द शेतकरी जात होता. त्याच्या डोक्यावर भाज्यांचा टोपला होता. तो शेतकरी त्या दगडाजवळ पोचला. त्यालाही अडचण आली. आपल्या डोक्यावरील ओझे उतरवून शेतकरी दगड बाजुला करू लागला. दगडामुळे ये जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये, हा उद्देश त्यामागे होता. तो दगड बाजुला करताना त्याला खुप कष्ट होत होते. शेवटी अथक प्रयत्नाने तो दगड त्याने बाजुला केला.

आपला टोपला घेऊन पुढे जाणार, इतक्यात त्या दगडाच्या जागेवर एक पिशवी दिसली. तो पिशवी जवळ गेला आणि पिशवी उचलली. त्या पिशवीत सोन्याची ५०० नाणी होती. पिशवित सोन्याची नाणी पाहून शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. तो आनंदीत झाला. त्या पिशवीत नाण्याशिवाय एक पत्र होते. त्या पत्रात लिहीले होते की, दगड बाजुला करणाऱ्याला व्यक्तिला राजा आदित्यदेव यांच्याकडून विशेष बक्षीस देण्यात येत आहे. कारण जनतेच्या अडचणी, कष्ट दूर करण्याचा आपण प्रयत्न केला.

Wednesday, April 22, 2020

हेच आहेत खरे साधू


  
माणूस साधना आणि ज्ञान विध्येच्या चर्चेव्दारे आपापसातील ताळमेळ साधून आपली वृत्ती वाढवू शकतो. कधी कधी असही होत की, माणूस माणसावर बाहेरून एखाद्या वृत्तीवर दबाव टाकण्यात येतो आणि सांगितलं जात की हे गृहीत धरून मार्गक्रमण करा. या मार्गावर चालत असताना असं लक्षात येत की, एक अशी कल्पना समोर येते त्यामुळे पुढे जाण कठीण होऊन बसत. ती कल्पना सांगते की अमूक एका धर्मशास्त्रात ही गोष्ट सांगितली आहे. हे सर्व काही मनुष्याने तयार केलेला प्रपंच आहे. हे संपूर्ण विश्व, पूर्ण ब्रह्मांड माझे आहे, तरीही समुद्रापलीकडे कसा जाऊ, धर्मशास्त्रात यांत निर्बंध आहेत. अशा प्रपंचापासून दूर राहायला हव.

आपल्यासाठी आपले प्राण जितके प्रिय आहेत, इतरांसाठी त्यांचे प्राणही तेवढेच प्रिय आहेत. ही गोष्ट ध्यानात घेतां दुसऱ्यांप्रती दया दाखवतो, त्यांनाच साधू म्हणून संबोधले जाते. हाच बोध मनांत ठेवून त्याने विचारणा केल्यास त्याला माहिती होईल की, भोजनासाठी तो नाहक पशुंची हत्या करतो आहे. मनात हा प्रश्न येतो की, मी असं काम का करू? तसं पाहता सागातही तेच आहे. मांसातही तेच आहे तरीही मन म्हणत की, शास्त्रात लिहील आहे करू नका मग काय करू ? मानाव तर लागेलच. मनांत येत की, असं करण योग्य नाही. तरीही शास्त्राच्या विरोधात काहीही करू शकत नाही. कारण त्यात धाडस नाही. ही एक भावधारा आहे. ही मनाच्या गतीला रोखते. यालाच भाव जडत्व असे म्हणतात. तो चुकीच्या दर्शनाने आले किंवा शास्त्राने ही आले, पण अवश्य त्याचा त्याग करायला हवा.

जर कोणी युक्तीपूर्ण वार्ता करत असेल तर त्याला मानून मार्गक्रमण केल्यास प्रगती होते. ती ह्रदय ज्या ठिकाणी युक्ती काम करत नाही. तेव्हा मानवतेच्या आधारे विचार करावा. माझ्यासाठी प्राण जेवढे प्रिय आहेत, एका पशुसाठी त्याचेही प्राणतेवढेच प्रिय आहेत. मी त्याच्या प्रती दया का दाखवू आणि जर कोणी म्हटलं की, यामुळे पशुंला त्याचा पशु जीवनातून मुक्ती मिळेल, तर तुम्हीही मनुष्य आहेत आणि मनुष्य ही जिव आहे. तर तुम्ही तुमचा गळा कापुन मनुष्य जीवनातून मुक्ती का नाही मिळवत ? तुम्हीही मुलगा-मुली, आप्त, स्वकीयांना मानवी जीवनातून मुक्त करू शकता ? हे मुक्त करायचे आंदोलन आणि वज्राघात नाहक बकरीवरच का? युक्ती तर आपल्याला हेच सांगते.

एका बाजुला भावना आहे आणि दुसऱ्या बाजुला मानवी विशाल ह्रदय आहे, मानवतां आहे. दोघांमधे छोटासा फरक आहे. हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. साधना हा फरक समजून घेण्या लायक बनवते. हे समजून घेतल्यास त्या निर्गुण सत्तेशी एकरूप होऊन एकाकार होण कठिण नाही. अश्या स्थितीत मनुष्य आपल्या मानस विषयाचा त्याग करतो. तो जीवनमान किंवा अनुमान पर्यंत पोहोचतो. तो वर्तमान आपल्या ध्येयात परावर्तित होतो, त्याला जर भूमाचैतन्य किंवा परमपुरूषात परावर्तित कराल तर तुम्हाला निर्विकल्प समाधीचा लाभ होईल निर्गुण स्थिती मिळेल.

Tuesday, April 21, 2020

हे दोन्ही मार्ग परमात्म्याकडे घेऊन जातात


स्रीमनाचे आणि पुरुष मनाचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. चित्त किंवा मानसिक प्रवृत्तीचा देहाशी थेट संबंध नाही. सर्व स्रीया या स्रीमनाच्या असल्या पाहीजेत अशी आवश्यकता नाही. पुरुष ही स्री मनाचे असू शकतात. तसेच स्रीयाही पुरुष मनाच्या असू शकतात. आपल्यात जवळ जवळ अर्धे लोक पुरुष मनाचे आहेत, तर अर्धे स्री मनाचे. पुरुष चित्त म्हणजे मस्तिष्ककेंद्रीत आहेत आणि स्री मनाचे म्हणजे जे ह्रदय केंद्रीत आहेत. दोन्ही प्रकारची मने असलेल्या व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहेच, भावनांचे शुध्दीकरणही महत्त्वाचे आहे. पुरुष मनाच्या भावनाशुध्दीसाठी ध्यानाचे मार्ग अधिक उपयुक्त आहे. असे लोक भावना साधून, अधिकाधिक चैतन्य होऊन, परम जागरूकतेची स्थिती प्राप्त करूनच आपल्या चेतनेची शुध्दी करू शकतील. जे स्री मनाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी प्रेम, भक्ती, श्रध्दा, प्रार्थणा आणि समर्पण भावशुध्दीचा मार्ग आहे. स्री मनासाठी भक्ति मार्ग सोपा आहे. ध्यान म्हणजे चैतन्याची साधना आणि भक्ति म्हणजेच प्रेमाची साधना होय.

दोघांमध्येही एक गोष्ट सारखी आहे शुध्दीकरण. असं यासाठी की आपल्यात अमृतही आहे आणि विषही. उदाहरणासाठी प्रेम. आपल्या ह्रदयातील प्रेमही मिश्रित आहे, कारण यासोबत क्रोध, घृणा, ईर्षा, व्देष, सोम्यतेचा अनुभव आणि अहंकाराचा तत्वेही सामावलेली असतात. यासाठी जसे विषाला अमृतापासून वेगळ करण्यासाठी अमृत मंथन केले होते, त्याचप्रमाने आपल्या भावनेच्या सागरात आपल्या ह्रदयाचे मंथन करून अमृत बाजुला करून विष काढावे

अशाप्रकारे ध्यानाचा मार्ग अवलंबिण्यासाठी आपल्याला बुध्दीची, विचारांची आणि मनाची शुध्दी करावी लागेल. यामधे जो कचरा साचलेला आहे, तो काढावा लागेल, त्याचे साक्षीदार व्हावे लागेल, अधिक चैतन्य आणावे लागेल. यासाठी ध्यानाचे सारे विधी संकल्प करून भावनांचे विरेचन करून मनाची सफाई करून विरेचनापासून याची सुरूवात होते कारण आत काही राहील्यास, ते बाहेर पडावे असे वाटते. मग भेदभाव दूर करून जागरूकतेत एकरूप होणे शक्य आहे.

परमेश्वराच्या मन मंदीरालाप्राप्त करायचे दोनच मार्ग आहेत. साधना जागरूकतेची असू दे किंवा प्रेमाची मार्ग योगाचा असू दे किंवा समर्पणाचा दोघांचे परीमान एकच आहे. दोन्ही मार्ग आपल्या परमात्म्याकडे घेऊन जातात.

जुन्या जमान्यात योग आणि भक्तिचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते. ज्याचे स्रीमन होते, त्याच्यासाठी भक्तीच मार्ग अधिक अनूकुल होता, पण आपल्यात जनसंख्या मोठी आहे जवळ जवळ ५०% ज्यात स्री मन किंवा पुरुष मनाला एखाद्या स्पष्ट श्रेणीत ठेवतां येणार नाही. हे असे लोक आहेत ज्यांच्यात बुध्दी आणि भावनेचे प्रमाण अर्धे अर्धे आहे. जर तुम्हाला ही व्दिधा आहे की, आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे तर दोन्हींचा संयुक्तपणे अवलंब करा

जो ध्यानाचा मार्ग निवडतो, तोच शुध्द चेतनेमध्ये विहार करू शकतो. निर्मळ मनाच्या या अवस्थेत भक्तीची मात्रा शक्य असते. जो चेतनापूर्ण आहे, ज्याचे मन निर्मळ आहे, त्याचीच उर्जा जागृत होऊ शकते. त्याच्यातच अहं भाव निर्माण होतो, तोच संगीताचा आनंद घेऊ शकतो, गाऊ शकतो.

Monday, April 20, 2020

कृष्णाला रूक्मिणी मिठासासारखी वाटते

आपण लहान असताना आपल्याला घरातील मोठी माणसे गोष्टी सांगायची. मला ही माझ्या आजी ने गोष्टी सांगीतलेय. माझ्या घरी माझे आजी आजोबा माळकरी असल्यामुळे आमच्या घरात विठ्ठल रूक्मिणी आणि राधा कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या जायच्या. अशीच एक कृष्णाची गोष्ट माझ्या आजीने सांगितली होती तीच मी गोष्ट मांडत आहे.   

एकदा  कृष्णा आपल्या दोन्ही बायकांशी गप्पा मारत बसले होते.

गप्पांमध्ये सत्यभामाने विचारले की,......

“नाथ मी आपल्याला किती आवडते?”

त्यांवर कृष्ण म्हणाले,....

“हे सत्यभामे साखरे प्रमाणे आवडतेस.” लगेच रूक्मिणीने हाच प्रश्न विचारला तर कृष्ण म्हणाले, “रूक्मिणी तू मला मिठासारखी आवडतेस.”

हे ऐकून सत्यभामा खुप खुष झाली की आपण पतीला गोडाप्रमाणे वाटतो आणि तिकडे रूक्मिणि रूसुन बसली की मी मिठाप्रमाणे. रागात रूक्मिणी तिथून निघून गेली. आपल्या प्रिय रूक्मिणीला रागावलेले बघून दुसऱ्या दिवशी कृष्णाने स्वयंपाकात मिठ न घालण्याची सूचना दिली आणि जेवनात गोड धोड पदार्थही करायला सांगीतले.

स्वयंपाक तयार झाला. कृष्ण नेहमीप्रमाने जेवले. परंतु जेव्हा रूक्मिणी व सत्यभामा जेवायला बसल्या तर बघतात तर काय पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर जणू काही चवच लागली नाही. वरण, भात, भाजी, आमटी, भजी सर्वांची तीच गत.

आधिच रागात असलेली रूक्मिणी स्वयंपाकावर चिडून म्हणाली,.......

“स्वयंपाक फार आळणी झालाय.”भगवंताच्या सूचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला,”आज मीठ संपले होते, म्हणून जेवन आळणी बनवाव लागले.

अर्धपोट जेवून उठली रूक्मिणी आणि महालात फेऱ्या मारू लागली.

तेवढ्यात तिथे कृष्ण आले आणि म्हणाले,..........

“की जेवन एवढ्या लवकर कसे झाले? आज गोडाधोडाचा स्वाद घेतला नाही वाटत.”

त्यांवर रूक्मिणी रागाने म्हणाली,........

“गोडाचे कौतुक तुम्हाला असेल, पण इतर पदार्थ अगदीच अळणी होते. मिठाशीवाय स्वयंपाकाला जरातरी चव होती का?”

यांवर कृष्ण म्हणाले,.....

“मीठ नसल्याने स्वयंपाकाच्या चव नाही, हे तूच म्हणतेस आहे बघ. मग मी तुला मीठासारखी आवडतेस म्हंटल्यावर तू रागावली.”

पतीच्या बोलण्यातला अर्थ समजल्यावर रूक्मिणीच्या गालाची कळी एकदम खुलन गेली.

Sunday, April 19, 2020

भाऊबीज

    भाऊबीज म्हणजे भावा बहीणीच्या प्रेमळ नात्यांचा उत्सव. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण कार्तिक शुध्द द्वितीये दिवशी असतो. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. तर हिंदीत या सणांस भाईदूज असे म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपालमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थणा करते.

भाऊबीजेच्या दिवशी बहीणी आपल्या भावांना गोडाच्या जेवणाचे आमंत्रण देतात. बासुंदी पुरी हा या दिवसाचा खास बेत असतो. आपल्या भावाला ओवाळून बहिणी त्याच्या कपाळी कुंकवाचा टीळा लावतात. हा टीळा आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी असतो. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्राला ओवाळते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. बहीणीने ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहीणीचे कौतुक करतो.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पुजा करते. भावाची पुजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो दीर्घायुषी व्हावा हा यामागे हा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तिप्रमाणे पैसे, कपडे, दागिना अशा वस्तु ओवाळणी म्हणून देतो. या दिवशी सख्खा किंवा दुरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पध्दत आहे, म्हणूनच आपण लहाण मुलांना चंद्राला चांदोमामा अशीच हाक मारायला शिकवतो.

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात?

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या माग एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्रे, अलंकार ,वस्तु देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.

यम आणि यमी या भाऊ-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला तेव्हा यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातलं अश्रु काही केल्या थांबवेना. तेव्हा अखेर देवाने दिवस संपला असे भासवण्यासाठी रात्र निर्माण केली. मग यमीला भावाच्या मृत्यू मुळे झालेले दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा आहे. आपल्या भावाला दीर्घायूष्य लाभावे यासाठी बहीणीने यमराजाची पुजा आणि प्रार्थणा करायची असते.

“आई नंतर” जर जगात तुमच्यावर जीव टाकणारच कोणी व्यक्ति असेल तर ती म्हणजे “बहिण”
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही आई निर्माण केली. आई फार काळ असु शकत नाही म्हणून त्याने कदाचित आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी राहते. गुणांच तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरून घालते. बाजू घेउन भांडायला ती सदैव तत्पर असते. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने गहीवरलेला असतो.

“बहीण मग ती कोणाचीही असो, तीचा नेहमीच आदर करा…….

हीच खरी भाऊबीज असते………..

Saturday, April 18, 2020

बाप.........बाप हा बाप असतो

    
वडिलांन बद्दल काय बोलायच. बाप… हा बापच असतो. मी एकदा आमच्या शाळेमध्ये एका मुलीच वक्तृत्व ऐकल होत. मला ते खुप आवडले होते. ती वडीलांबद्दल खुप काही चांगल बोलुन गेली. तेच मी ईथे मांडत आहे.

बाबा, पप्पा, ड्याडी, बोलायला ऐकायला किती छान वाटते ना ! पण आपण कधी कधी मुद्दामच जाणून बुजून त्यांना बाप या नावाने संबोधतो. आज अशाच एका बापाची कहाणी.

आई घरच मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात, पण आपण या अस्तित्वाला कधीच समज़ुन घेतले आहे, त्यांच्या विषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात आहे……... नाही

लोकांनी वडील रेखाटलेले आहेत ते ही तापट, व्यसनी, चिरखोड, भांडखोर, मारझोड करणारे. असे वडील असतील ते ही ३ ते ४ % पण बाकीच्या चांगल्या वडीलांबद्दल काय?

आई कडे अश्रु चे पाठ असतात ती रडुन मोकळी होते, पण सांत्वन करणारा बाप कोणालाच दिसत नाही. आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणार्यावरच जास्त तान पडत असतो कारण ज्योती पेक्षा तो छोटा दिवाच जास्त पेटत असतो. आणि श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते. रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शीदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वांनसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीर तोंड खुपसून मुस्मुसतात ते आपले वडीलच असतात. स्वःताचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण लहान भावंडांना धीर देणे, कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात. पत्नी आर्धातच सोडून गेली तरी स्वःताला अवर घालत मुलांच्या अश्रुंना आवर घालणारे ते वडीलच असतात.
जिजाऊ ने शिवबाला घडविले असं अवश्य म्हणतां येईल पण त्यांच वेळी शहाजीराजांची ओढातान लक्षात घ्यावी. देवकी यशोधेच कोतुक अवश्य कराव पण त्यांच वेळी भर पुरात डोक्यावरून पुत्राला घेउन जाणारा वासुदेव आठवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडुन मरणारा राजा दशरथ होता.

वडीलांच्या चीरलेल्या टाचा, झिजलेली चप्पल, आणि फाटलेले बनियन पाहिले की कळते की नशिबाची भोक त्यांच्या बनियन ला पडली आहेत, त्यांचा दाही वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो, मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वःता मात्र जुनेच कपडे वापरतील. मुलगा संलुन मधे ५०₹ खर्चतो, मुलगी पार्लर मधे १००₹ खर्चेल, पण त्यांच घरातील बाप मात्र दाढीचा साबन संपला तर अंघोळीच्या साबणाने दाढी करतील, कधी कधी तो ही नसला तर नुसती पाणी लावून दाढी करतील. बाबा कधी आजारी पडले तर डाॅक्टर कडे जात नाहीत, मुळात ते आजारपणाला घाबरताच नाहीत, त्यांना काळजी असते ती डाॅक्टर सांगतील महिनाभर आराम करायला. त्याच्या पुढे काही नशिबाने वाडुन ठेवलेल असत. मुलीच लग्न, मुलाच शिक्षण, घरातील सर्व खर्च याची काळजी असते कारण घरात कमवणारा तो एकटाच असतो.
ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलाला मेडिकल, इंजिनीअरिंग या सारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात. महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून , काटकसर करून पहिला मुलाला पैसे पाठवतात, खर तर मला सर्वच मुले म्हणायची नाहीत पण काही मुले आहेत की बापाने दीलेल्या पैस्याने शिक्षण कमी आणि मजाच जास्त मारतात. एवढच नव्हे तर या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवनाऱ्या बापाची टिंगल टवाळी करत असतात. हीच मुले एकमेकांच्या वडीलांच्या नावाने हाक मारतात.

ज्या घरात बाप असतो त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होत नाही. कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. जरी तो काही करत जरी नसला तरी तो त्या पदावर असतो आई असण्याला अथवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ प्राप्त होतो.

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला कि जवळी वाटते ती आई, कारण ती कौतुकाने जवळ घेते, आपले लाड करते, पण गुपचूप जावून पुढे आणनारा बाप कोणालाच दिसत नाही. चटका बसला की तर लगेच “आई ग” हा शब्द आपण उच्चारतो पण एखादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखाद्या ट्रक ने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्या वेळी आपण “बाप रे…..!” असे म्हणतो. छोटी छोटी संकटे आई सोसती हो, पण मोठी वागळे पेलताना बापच आठवतो……..

एखाद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते, पण जर एखाद मयत झालं तर बापाला एकट्यालाच जाव लागत. मुलाच्या नोकरी साठी लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंभरे झिजवनारा बाप, घरच्यांसाठी स्वःच्या व्यथा दडपवनारा बाप खरच किती ग्रेट असतो.

बापाचे खरे महत्त्व ज्यांना कळते ज्याचे वडील लहानपणीच जातात आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. एकेक गोष्टीसाठी त्यांना कष्ट कराव लागत तेच बापाच महत्व समजतात

बापाला समज़ुन घेनारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्याची मुलगी, सासरी गेल्यावर ही अथवा घरापासून दुर असताना ही फक्त फोनवर बोलताना वडीलांचा आवाज जरी बदलला असला तरी त्यावरून सतरा प्रश्न विचारेल

वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती मुलगीच असते. आणि वडिलांना जपनारी त्याची काळजी घेणारी ही मुलगीच असते…………..

“Father is someone who has faith in you even when you fail”


कोणी आपली गाडी २ मिनीटासाठी

मागितली तरी आपला जीव खाली वर होतो

आणि तो बाप लहानपणापासुन जपलेली बाहुली

हसत हसत दुसऱ्याला देऊन टाकतो………. बाप ……..बाप हा बापच असतो.

त्यांच मन कोणालाच न कळण्यासारख असत ……………...

Thursday, April 16, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग २

वेळापत्रकाप्रमाने जरी शाळा भरली असली तरी जो पर्यंत शिक्षक वर्गात येत नाहीत तो पर्यंत खऱ्या अर्थानेशाळा भरत नाही. आमची पहिलीच batch होती ती semi-English ची, म्हणजे आम्ही पाचवी ला गेलो आणि Semi-English चालु झालं. म्हणजे काय ३ विषय मराठी भाषेतून आणि ३ विषय English मधुन. शिक्षकांना वाटले आताच पोरं मराठीतून English कडे वळलेत थोडीशी सूट द्यावी त्यांना. तो पाचवीचा आमचा वर्ग खुप लाकडा होता पुर्ण शाळेचा. मस्ती तर खुपच करायचा तेवढाच हुषार पण होता.

वर्गातला ती पहिली तासिका नेहमीच वर्ग शिक्षकांची असायची. डस्टर आपटल्याचा आवाज आला की शिक्षक वर्गात आलेत असं कळायच. त्या डस्टरच्या आवाजानेच मित्रांशी गप्पा मारणारा बेसावध मुलगा भानावर येउन सर्वात शेवटी उभा राहतो. त्याचे उभे राहणे आणि आणि इतरांचे खाली बसणे एकाच वेळी झाले की वर्गात हास्यकळोळ व्हायचा. हजेरी सुरू व्हायची. काही वेळेस नावं वाचून हजेरी घ्यायचे शिक्षक नाहीतर काहीवेळा हजेरी क्रमांका वरून. शिक्षकांच्या नजरा खाली असल्यावर ‘हजर’ आणि ‘गैरहजर’ बोलायला मजा यायची. काहीवेळा तर दूसऱ्यांची हजेरी द्यायचो आम्ही.

मुलांचे वाचन किती आहे आणि ते वाढावे, त्यांना नविन शब्दांचीच ओळख व्हावी, म्हणू आणि वाकप्रचार स्वत:हून वाक्यात उपयोग करणे अशी काही ‘निबंध’ लिहीण्यामागे कारण असतं. मात्र शाळेच्या मुलाच निबंध वाचले की त्यांचे वाचन, निरीक्षण आणि साधेपणातुन होनारी विनोदी निर्मीति यांचे दर्शन घडवते. बऱ्याचदा निबंधची अभंगातील ओळ किंवा एखादी म्हण या पासुन सुरूवात होते. पहीलांदा लिहायला लागल्यावर निबंधाचा विषय सोपा वाटू लागतो आणि पेन हातात घेतला कि काय लिहू आणि कसे लिहू असं वाटायच. थोड तिरक्या नजरेने समोरच्यान काय लिहीले आहे बघायच दोन ओळी दिसल्या की वेळ न घालवतां ते स्वत:च्या वहीत लिहायच.

इंग्रजी निबंध लिहायला सांगितला की आम्ही ते रट्टा मारून पाठ करुन व त्यातूनच विनोदी निर्मिती करायचो. एकदा मराठी पत्र लिहा असे सांगितले पत्राचा विषय होता. ‘तुमच्या मित्राच्या आईचे निधन झाल्यावर मित्राचे सांत्वन करा.’ त्यात एका मैत्रीणीने पत्राची सुरवात रट्टा मारल्या प्रमाणे उजव्या बाजुस पत्ता, खाली प्रिय मित्र राजु यास, वगैरे केली. पुढे मात्र तीच्या पत्राला खरा रंग चढवला. काल तुझे पत्र मिळाल आनंद झाला. मी तुझे पत्र वाचले. वाचून दू:ख झाले. अश्या विषयांशी निगडीत वाक्य लिहून, “ तुझ्या आई-वडीलांना माझा नमस्कार सांग” असे लिहून तिने पत्राचा शेवट केला.

आता ई-मेल काळात पत्रे लिहीण्याचा योग येत नाही. C.I.D. आणि M.B.B.S. या शब्दाते विस्तारीत रूप माहीत आहे पण शि.सा.न.वि.वि. अजुन कोड्यात आहे. आता मुद्दाम प्रयत्न करुनही एवढे साधे निबंध व पत्र लिहीता येनार नाही. चुकून फक्त शाळेची वही सापडली की थोडा वेळ ती वाचून हसायचे एवढेच उरले आहे.

Wednesday, April 15, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग १

                                                माझ्या आठवणीतील शाळा. भाग १

आपण आपल्या जीवनाची बारा वर्ष शाळेय जीवनात घालवले. या वर्षात आपण खूप काही कमावले आणि बरेच काही गमावलेही. आपल्या शाळेच्या कडु-गोड प्रसंगावर वेगळ्या नजरेने बघुन त्याला प्रकाशझोतात आणण्याचा माझा छोटासा प्रयत्न. मला नक्की खात्री आहे कि या अनुभवातून तुम्हांला ही तुमच्या शाळेच्या गमतीजमती आठवतील.

शाळा, शाळेचा बाक, फळा, रंगीत चित्रानी सजलेली शाळेची भिंत, सुविचार, परीक्षा, स्पर्धा, परिपाठ, गृहपाठ, सहल, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, शिक्षा, वत्कृत्व स्पर्धा, शिपाई काका, ग्रंथालय, संगणक विभाग, प्रयोगशाळा, वाढदिवस, गणवेश, सण, दिवाळीची वही, ॲाफ पिरेड, डबा, शिक्षक दिन, बालदिन, प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिन, प्रार्थणा, मराठीचे भन्नाट निबंध आणि इंग्रजीचे अजब स्पेलिंग. गणितातील सुत्रे व इतिहासातील इसविसन, हिंदीचे व्याकरण त्यांच बरोबर सर्वात महत्वाची शाळेची घंटा या सर्वांचा विचार तुमच्या डोक्यात आला असणारच.तर उजळुया जुन्या आठवणी आणि भरवूया आपल्या मनांत आपलीच शाळा.

शाळेचा तो पहिला दिवस. पहिली त होते त्या वेळेच काही आठवत नाही, पण पाचवीचा आठवतो. नविन शाळा, नविन शिक्षक माझ्यासाठी सगळंच नविन होत. पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश केला तेव्हा खुप छान वाटत होत. शाळा भरली. शिक्षक शिकवायला सुरूवात करतात. शेजारीची परकी मुलगी आपली मैत्रीण बनते. पहील्यांदाच बाकावर बसवण्याच फिलिंग वेगळच होत. दुपारी एकत्रित बसुन जेवन करन सगळंच वेगळ होत माझ्यासाठी. मग घंटा वाजते शाळा सुटल्याची बाबा बाहेर उभे असतात आपल्याला घेउन जाण्यासाठी मात्र आपण नविन शाळेत एवढे रमलेलो असतो की आता तिथेच राहावसे वाटते. परंतु निघणे गरजेचे असते. घरी आल्यानंतर ओढ लागते ती दुसऱ्या दिवसाच्या शाळा भरणाऱ्या घंटेची.

सकाळच्या शाळेचा राग फक्त हिवाळयाच्या दिवसातच यायचा. सकाळी लवकर उठायला लागायचे. थोडा वेळ उभ्या उभ्या ही झोप यायची. आईच्या ओरडण्याने मात्र पार झोप उडून जायची. मग धावतच शाळेत जायचे. उशीर झाला की सकाळच्या शांत वेळात शाळेच्या परीसराजवळ आल्यावर प्राथनेचा आवाज ऐकु यायचा. प्रार्थणेला नाही वेळेत पोचलो की शिपाई काका आमच्या कडुन मैदान साफ करून घ्यायचे. त्याची नजर चुकवून आम्ही वर्गात पळायचो. .

प्रार्थणा ही मुलांना शिस्त लावण्याचा एक मार्ग. पण बऱ्याचदा तो व्यर्थ जातो. आम्हाला मंचावरून शिक्षकांची सूचना असायच्या एका रांगेत उभे रहा. दोघांमधे एका हाताच अंतर असु द्या. उंचीप्रमाणे उभे रहा. आमच्या कडुन हात जोडून प्रार्थणा म्हणायला लावतात. बऱ्याचदा स्पिकरवरुन प्रार्थणा ऐकवली जाते आणि मुले हात जोडुन उभे असतात. या सर्व चित्रात पहिल्या दोन रांगेतील मुलेच शांतपणे शहाण्या मुलांसारखं डोळे मिटून प्रार्थणा म्हणत असतात. शेवटच्या आणि गर्दीचा फायदा घेणाऱ्या मधल्या रांगेतील मुल आपल्या स्वःताचाच दुनयेत असतात. कोणी मध्येच स्वर उंचावनार, मध्येच कोणीतरी ओरडणार. काहीजण मुद्दामच शब्द मागून बोलल्यानंतर तो उच्चारणार. काही मस्तीखोर मुले बाजुला उभ्या असलेल्या शांत मुलाला त्रास देण्यास व्यस्थ असतात. मध्येच एकजण शेजारच्या मुलाला बाजुच्या उभ्या असलेल्या मुलीवर ढकलणार. मैदानात बसलेलो असताना जवळची दगडी मागे न बघताच फेकणार आणि सर्वात जास्त मजा, सर्व कार्यक्रम झाल्यावर मागच्या मुलीच्या उठण्याच्या आधी उठून स्वःतची मातीने भरलेले कपडे झटकण्यात येते. वर्गात जाताना हाताचा घडी घाला आणि एका रांगेत वर्गात जावा अशा सूचना असायच्या आम्हाला. पण शिक्षकांच्या सुचना ऐकतील ती मुल कसली. आमच्यात शर्यत लागायची कोण पहिला वर्गामध्ये जातय त्याची. आम्ही पळतच जीण्यावरून वर्गात जायचो.

पण ही सर्व मजा करत असताना कळत नकळत आमच्यावर त्या प्रार्थनेचे संस्कार होत होते. प्रार्थणेतून मिळणाऱ्या उत्साहानेच संपुर्ण दिवस चांगला जायचा.आज मात्र त्या शाळेसमोरून जाते तेव्हा ती शाळा ते मैदान आणि मातीने माखलेल्या त्या कपड्यांची उणीव भासते.





Tuesday, April 14, 2020

कन्यादान

कन्यादान म्हणलं की आई बाबांच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस. असाच एक अविस्मरणीय कन्यादानाची गोष्ट माझ्या डोळ्यांसमोर आली. तुम्हाला वाटत असेल माझ्या लग्नाचा दिवस असेल, हा तो दिवस तर कधीच विसणार नाही मी. पण! असा एक दिवस होता तो माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस ठरला.

आज किशौरीच लग्न होत….. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते…… पूर्ण घर फुलांनी सजवले होते……

किशोरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती….. नाजुक सुंदर…. खुप खुश होती ती….. तीच ते चेहऱ्यावरच मोहक हास्य तीच सौंदर्य आणखी खुलवत होते……. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता…… काही दिवसांपूर्वीच अभि तीला पाहायला आला होता….. आणि बघताक्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता….. खुप सुंदर जोडी होती त्यांची……

पण थोड्याच अंतरावर सयाजीराव उभे होते…. किशोरीचे बाबा….. खुप कौतुकाने मुलीकडे पाहत होते….. किशोरीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भुतकाळात हरवले……. किशोरीचा चेहरा तिच्या आई सारखाच होता…… साधी सरळ होती तिची आई…… मोठ्या थाटात लग्न झालं होत त्यांचं…...एक वर्षांचा सुखी संसार झाला असेल त्यांचा…… मग चाहुल लागली येनाऱ्या बाळाची……. खुप जपायचे सयाजीराव त्यांना…….. पण …… पण प्रसूतीचा वेळी अघटित घडले……. आणि एका मुलीला जन्म देऊन……. तिने निरोप दिला या जगाला…...कायमचा…..

सयाजीराव कोलमडले होते…….पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहीलं…… तिचे डोळे आईला शोधत होते……. त्यांनी तिला उचलून घेतले……. अगदी कुशीत….. खुप रडले…… पण शेवटच……. त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आल होत….. त्यांचे डोळे भरून आले होते…… भरल्या डोळ्यानी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते……..

कीशोरीने तिच्या बाबांकडे पाहिलं…...त्याचे भरलेले डोळे बघुन तिच पण मन भरून आल…..तिला आठवले जुने दिवस…...तिचे बाबा हेच तिच जग होत…… जसं कळतय तसं तिचे बाबा तिची आई बनले होते….. आईची आठवण तिला कधीच आली नव्हती……. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठी दुसर लग्न केलं नव्हत…..तिची किती काळजी करायचे तिचे बाबा….नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दु्र्लक्ष केलं नाही…….

आजारी पडली कि रात्र रात्र न झोपतां तिच्या बाजुला बसुन रहायचे….. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडुन परत जाताना चार वेळा वळुन पाहायचे….

किशोरीला पण बाबांन बद्दल खुप जिव्हाळा होता…… आपल्या नंतर त्यांची कोण काळजी घेणार….?? किशोरीच मन अस्वस्थ झालं…...आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग…..

किशोरी झोपली होती…. अचानक तिला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला...ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली…. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते…..तडफड करत होते….तिला काय करावे सुचेना……

“बाबा... बाबा... काय होतय….???” तिने पळत जाऊन पाणी आणल…. पण ती परत येई पर्यंत ते शांत झाले होते….. हातातील पाण्याचा पेला अलगद खाली गळुन पडला….आणि ती तिच्या बाबांना हाक मारु लागली…..रडू लागली…...आणि अचानक सयाजीरावांचे श्वास पुन्हा चालु झाले…… आणि उठूनच बसले…..किशोरी त्यांना बघून रडू लागली….ह्रदय विकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता…...कसे बसे वाचले होते ते……. किशोरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे….

त्यादिवसापासुन तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले…..विवाह संस्था मध्ये चकरा मारू लागले…… मध्येच वकिला कडे पण जायचे…. जेवनाचे भान नाही की आराम नाही……. सतत फक्त तिच्याच लग्नाचा विषय….त्या चिंतेमुळे कि काय त्यांची तबियत पूर्ण ढासाळली होती….. डोळे आत गेले होते…….चेहरा निस्तेज दिसत होता….. अशातच एक दिवस अभि च स्थळ आल….. देखणा मुलगा… चांगली नोकरी…..घरंदाज घरान सर्वकाही एकदमच व्यवस्थित……..

त्यांच्याकडुन लगेच होकार मिळाला….. किशोरीने पण लाजून होकार दिला…… तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती…… सर्वकाही एकदमच गडबडीत…… किशोरी काय बोलली तर ते बोलायचे…. “ मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे…….”

आता कन्यादानाची वेळ आली होती….. भरल्या डोळ्याने आणि जड अंतकरणाने त्यांनी कन्यादान केलं…… जाताना खूप रडले दोघे…...किशोरीचे तर पाय निघतच नव्हते बाबांना सोडुन जाताना….. पण जगाची रीतच होती….. किशोरी गेली…… पाहुणे पण गेले…..तिचे बाबा खुप वेळ एकाच जागी बसलेले होते……. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले…….

दुसऱ्या दिवशी किशोरला वाईट बातमी मिळाली…. तिचे बाबा हे जग सोडुन गेल्याची….. ति आणि अभि लगेच निघाले…… लोक जमले होते….. किशोरी खुप रडत होती…. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर…….अंतविधि पार पडला….. किशोरी अजुनही रडतच होती…. तेवढ्यात तिच लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेल…… ज्यावर पेपर वेट म्हणुन तिची बाहुली ठेवली होती……. तिने ति चिठ्ठी उचलली……. खाली घर आणि जमीनीचे कागदपत्र होते….जे त्यांनी दोन आठवड्या आधीच तिच्या नावावर केलं होत…...ती चिठ्ठी वाचू लागली….

माझी छकुली………

“तु आधी डोळे पुस…..तुला माहीतच आहे की मी तुला रडताना बघु शकत नाही…. एक ना एक दिवस हे होणारच होत…… नको रडूस…… मी खरच खुप भाग्यवान आहे कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे….. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आल….. खुप समजुदार निघालीस तू……. कधीच आईचा हट्ट केला नाहीस….. तरी पण माझ्याकडून काही कमी राहीली असेल तर माफ कर पोरी…. तुला आठवत असेल त्या दिवशी मला ह्रदय विकाराचा झटका आला होता….. खर तर तेंव्हाच मी हे जग सोडल होत….. माझ्या समोर अंधार पसरला…..माझ्या समोर रेड्यावर बसलेला काळाकुट्ट धिप्पाड व्यक्ति होता. त्याच्या हातात मृत्यू पाश होता….. जो माझ्या भोवती आवळला जात होता…. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्यासाठी हे शरीर मागून घेतले … माझ्या विनंती ने नाही पाहून तुझी आर्त साद ऐकुन त्यांनी मला एवढा वेळ दिला…. मागचा महिना जो तुझ्याबरोबर होता तो फक्त आत्मा होता… ज्यांच शरीर उधारीवर शिल्लक होत… पण माझ काम झालं आता….. वकिला कडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे हव होत ते मिळाले. मी कन्यादानाच पुन्य मिळवलं. यातच सर्व काही आहे. आणि आता डोळे पुस आनंदाने आयुष्य जग… सर्वांना आनंदी आणि सुखी ठेव माझा आशिर्वाद सतत तुझ्या सोबत राहील… सुखी रहा पोरी…..”

तुझाच बाबा………..

किशोरीचे अश्रु थांबतच नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यू कडून पण वेळ काढून थांबलेले होते..ते पण तिच्या कन्यादानासाठी …. एका मुलीचा बापच हे करू शकतो……. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला….. मागे अभि होता…. त्याने तिचे अश्रु पुसले आणि बोलला ……..” मी तुझ्या डोळ्यात अश्रु नाही पाहु शकत….” किशोरी बिलगली…… पिता नंतर आता पतीच तिच सर्वस्व होता…………...

Monday, April 13, 2020

हरवली पाखरे……..!!!


व्हाटसॲप वर आमचे दोन ग्रुप आहेत प्रिनंसेस आणि गल्ली गॅंग. त्या ग्रुप वर कुणाचा वाढदिवस असला तरच जागा होतो, आणि शुभेच्छा देऊन संपल्यावर तो वाळवंटासारखा औसाड होऊन जातो…….

मी तर आश्चर्यचकीत होते की ही तिच लहान पिल्ल आहेत जी मोठी झाली अन त्यांच्यातला एक मित्र मरत गेला.

आमच गावात गावठाण भाग आहे. तिथे आम्ही राहतो. आमची छोटीशी गल्ली. त्यामधे एक खेळण्यासाठी थोडीशी मोकळी जागा होती. कुणाची होती माहीत नाही पण ती जागा आम्ही खेळण्यासाठी वापरायचो. एके दिवशी त्या जागेमध्ये कोणाच्यातरी बांधकामाची वाळू आणुन टाकली. त्यात वाळू असल्याने आमच खेळणं बंद झालं. काही दिवस आम्ही बघितल की वाळू संपेना. वाळू संपायची वाटच नाही बघितली. नंतर आम्ही त्या वाळूमध्येच खेळायचो. विष-अमृत, साखळीचा डाव चांगलाच रंगायचा. त्या मध्ये मुल आणि मुली एकत्र असायची.

साखळी खेळताना कोण कुणालाही पकडायच कुणालाही कुणाचा हात पकडायला लागायचा.

पाप नव्हत आमच्या मनांत. कोण कुणाच्याही शेजारी मांडीला मांडी लावून बसायचं. जगाच्या या घाणेरड्या मलिन नदीपासून खुप दुर होतो आम्ही! नंतर जसं मोठे होत गेलो तसं आजुबाजूस असणाऱ्या लोकांना खटकत गेलो आम्ही मुलं……

मुलांना मिसरूट फुटली, पोरींची चमक वाढली अन् लोकांच्या नजरा बदलायला लागल्या …….

आम्ही एकत्र खेळायचो दिवाळीची सुट्टी म्हणली की खूप धमाल यायची. सुट्टी लागली रे लागली आम्ही २ दिवसात सगळा दिवाळी अभ्यास करून ठेवायचा. ती सुट्टी खुपच कमी असायची. दिवाळी फराळ बनवायला आम्ही तयार असायचो. गल्ली मध्ये सगळ्या बायकांच ठरले असायच, की आज कुणाचं करंजे कायचे आणि उद्या कुणाचे आम्हा मुलांना खास आमंत्रण असायच करंजा करायचे आहेत या तुम्ही. आम्ही पोलपाट लाटन घेऊन तयारीत असणार. एका दिवसात दोन-दोन घरचे करंजा बनवनार. खुप खायला पण भेटायचं… अशी आमची दिवाळीची मज्जा … आता काय व्हाट्ॲप वरच फराळ पाठवतात आणि दिवाळीच्या शुभेच्छा पण!

सुट्टीची मज्जाच वेगळी होती. आम्ही सुट्टीत आबा डबा टीम टीम खेळायचो. त्यात त्या मुलांच काही वेगळच असायच आम्हाला फसवण्याचे त्यांचे वेगळेच उद्योग चालायचे. लपला असलेला मुलगा आम्ही त्यांच्या शर्ट वरून ओळखायचो हे त्यांना चांगलच माहीत होत. म्हणू ते एकमेकांचे शर्ट अदलाबदल करायचे. त्यातच आम्ही फसायचो.

उन्हाळयाच्या सूट्टीत मराठी सिनेमे खुप छान लागतात. आम्ही आमचे खेळ सकाळी खेळुण रिकामे व्हायचो नंतर सिनेमे बघायला पूर्ण दिवस भेटायचा. माझ्या घरी माझे आजोबा होते त्यांना ज्यास्त वेळ टी॰वी॰ बघणं आवडत नव्हत. त्यांच टी॰वी॰ बघून झालं की ते बंद करून जायचे. ते एकदा गेले बाहेर की आम्ही परत टी॰वी॰ लावायचो. त्यांनी एखदा पाहील की सगळी मुल जमुन टी॰वी॰ बघतात, त्या नंतर ते घरातील फ्वूज च काढून ठेवायचे. दुपारच झोपायचं असत असं सांगायचे.

संध्याकाळी आमचा लगोरीचा खेळ चालायचा. लगोरी खेळताना आमचा खुप आरडाओरडा व्हायचा. त्या आमच्या खेळाने संपुर्ण गल्ली त्रासुन गेली होती. एकदा तर एका काकु ने आम्हाला वयतागुन आमच्या लगोरीचे दगडच फेकून दिले.


 हादगा तर मुलींचा सगळ्यात आवडतां खेळ. पाऊस चालु झाला की हस्त नक्षत्रावर हादगा पण चालु होतो. हादग्याला तर रोजच नविन खाऊ डब्यात. हादग्याची गाणी म्हणणार. हात्तीचा फोटो पाटीवर काढुन त्यांच पूजन करनार. नंतर दुसऱ्यान डब्यात काय आणलय ते ओळखायच. नंतर डबा उघडून एक एक खास त्या हत्तीच्या फोटोवर ठेवणार. आपल्या डब्यातल एकमेकांना वाटून खाऊन डबा रीकामा घरी घेउन येनार. हदग्याच्या शेवटच्या दिवशी हात्तीच्या फोटोवर ठेवलेला खाऊ आणि रोजची वाहीलेली फुले नदीवर विसर्जन करनार. असा आमचा खेळ खुप मज्जा यायची.

खुप काही लिहायच होत पण आतापूरते येवढच...

असे माझे बालपण माझ्या आयुष्याच्या नव्या वळणावर विसरून गेलय ……….

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवनी………….

आज एक गाण ऐकल की बालपण डोळ्यांसमोर उभ राहत…….

“ का कळेना अशी हरवली पाखरे………..हरवली हरवली हरवली पाखरे……..!!!

Sunday, April 12, 2020

TV मालीका आणि माझी आई

                                                           
नमस्कार,

मी मालीकंना कंटाळेली एक मुलगी. आजकालच्या मालीकांमधे काहीही दाखवतात…… नव्याने सांगण्याची गरज नसावी त्यामुळे मुध्यातच हात घालते…… काय आहे ना आजकालच्या मालीका सिनेमा मधे जे काही दाखवतात ते आपल्याला real वाटू लागतात . आता बघा ना आमच्या घरचच घ्या . मी घरी रोज अनुभव घेते. माझी आई तीला मालीका पाहनं येवढ आवडत की आजुबाजुला कोण बसलय हेच कळत नाही. तिला मालीकांचे पात्र खरी वाटू लागतात. तिला वाटते की या मालीकांचे पात्र, त्यांचे संवाद, एकमेकांशी असलेले नाती ह्या गोष्टी कितीही अमान्य केलं आपल्या ह्रदयाच्या खुप जवळ असतात.

आता हेच उदाहरण पहा ना……..

काही दिवसांपूर्वीच गोष्ट माझ्या लग्नसाठी स्थळ बघत होती. त्यामधे त्यांना मुलगा चांगला, मुलीला शोभेल असा. मुलीच्या वयाच्या मानाने १ ते २ वर्षच मोठा असणारा. पण मालिका मधे चालतोय बापाच्या वयाचा मुलगा! ती मालीका “ तूला पाहते रे “ बघुन आई म्हणते कशी “ कसा मुलीचा वडील आहे तीला लग्नाला परवानगी देतच नाही. “ आता यांवर मी काय बोलनार ना! तिला काय बोलायचे म्हणजे ……

तुम्हाला तर माहीतच आहे …..home minister म्हणल्यावर कोणीच काहीच बोलु शकत नाही..

घरात रोज प्रत्येक मालिकेच चर्चासत्र चालुच असते. त्यात अजुन एक भर पडली ती म्हणजे माझी वहीनी तीला तर मालिकांमधे काहीच रस नव्हता. ती पण आई बरोबर राहुन मालिका बघायची सवय झाली. रोज दोघींच चालू असत आज राधिका गुरूनाथ ला धडा शिकवेल का ……. सुमी सासुबाई ला काय उत्तर देईल. ….. गूरुनाथ काल राधिकाला ओरडला, शनायाच नवीन कारस्थान केलं, राधिकाने ४-५ लिटर आश्रु गाळले…… वगैरे-वगैरे………

बर एवढच नव्हे तर त्या मालिकांचे पुन्हा पुन्हा दिवसभर त्याच त्याच repeat मालिका बघुन त्या पात्राचे संवाद इतके पाठ झालेले असतात कि त्या कलाकाराऐवजी या दोघींना उभ केलं तरी काही बिघडणार नाही……. असो, विषयांतर नको.


म्हणजे माझ सांगण्यात तात्पर्य काय, तर या मालिका खुप जास्त व्यापून टाकतात आपल्या जिवनाला. म्हणजे काय तर, एखादी गोष्ट केली की ती कोणत्याही मालिकेतल्या कोणत्यातरी पकाऊ पात्राप्रमाणे केली आहे अशी comment सहसा ऐकायला मि़ळतेच……..तुझं बोलन-वागन एकदम ‘अंजलीबाई’ सारखं आहे, तू अगदी ‘राणा’ सारखा वागतोस, तु ‘ईशा’ सारखी हसतेस…….अशी ५५० उदाहरण आहेत पण तेवढा वेळ माझ्याकडे आहे ना वाचकांकडे. आमच्या घरामधे या सासु-सुनाकडे खुप वेळ असतो…….असो यांना मालीका बघुन त्यांना सुख भेटत. तुम्ही वाचनातुन घ्या.

महत्वाच असं की ह्या मालीका ज्या सामान्य माणसाच्या देखील इतक्या जवळच्या बनून जातात त्या तितक्याच चांगल्या असायला पाहिजेत असं मला वाटत. सगळ्याच मालिका वाईट असतात असं नाही काही ईतिहासावर मालिका आहेत. एका मालिकेच नाव मला आवर्जुन घ्यावसं वाटत ती म्हणजे डाॅ. अमोल कोल्हें यांची मालिका “ स्वराज्य रक्षक संभाजी “ सत्याचा विजय दाखवण हे मालिकांचे ध्येय असायला हवे, असं माझ ठाम मत आहे……
..
तुम्हाला काय वाटत??????

मालिकांमधे जे दाखवत आहेत ते पाहुन जगात काही चांगले उरले आहे असे अजिबात वाटत नाही. एका मालिकेत सासू सुनेवर जे अत्याचार करते शनाया राधिकाच्या घराचे वासे मोजते,[ तशीच तीची आई पण], राधिकाला घराबाहेर काढणाचा विचार करणारा गुरूनाथ स्वत: शनायाशी जे वागतोय ते सर्व पाहुन जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चालला आहे. थोड्या फार फरकाने बऱ्याच मालिका याचेच किस्से गिरवत आहे. सध्या ती माया राधिकाविषयी कटकारस्तान शिजवन्यात मग्न असावी.

असे किस्से रोजच्या पेपरात येतच असतात.

Saturday, April 11, 2020

देवाची आजी


माणूस जन्माला येतो. त्यानंतर त्यांच आयुष्य त्याच्या एका ध्येयापर्यंत जात आणि थांबत. शक्यतो शिक्षण, नोकरी, गाडी, बंगला, लग्न, मुले आणि नंतर मुलांची ह्याच प्रतिक्रियेत शेवटच्या श्वासापर्यंत साथ! पण या प्रतिक्रियेशिवाय स्री किंवा पुरुष पूर्ण होऊ शकत नाही अशी भारतीयांची धारना किंवा. अगदीच संस्कृती याशिवाय सुद्धा जगणारी एक बाई पाहिली मी जगासाठी एक वेगळाच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करून गेली.

मी एका खेडेगावात राहते. छोटंस टुमदार गाव आहे. बंगले, रस्ते, गाड्या आल्या पण विचारसरणी बदलली नाही. मी इतकी वर्ष या प्रतिक्रीयेचा हिस्सा आहे. पण बदलला तो बाह्यरंग आतून माणसं तिच भांडण म्हटल की अगदी जीवावर उठणारी आणि जीव लावला तर जीवाला जीव देणारी!

माझ्या गल्लीच्या मागच्या बाजुला एका मोकळ्या जागेत एक फांद्यानी साकारलेली झोपडी असली तरीही टापटीपणे ठेवलेली. ती झोपडी एका आजीची होती. तिला सगळं गाव देवाची आजी म्हणुन ओळखायची. देवाधर्माच्या गोष्टी अजुनही आमच्या गावाकडे एकत्रित होतात पण त्यांच नेतृत्व देवाची आजी करायची.

नदीवर गौराई आणायला जाताना सगळ्यात पुढे असणारी देवाची आजी. तिच्या मागे चालणाऱ्या वैतागलेल्या डोक्यावरच्या घागरीतली गौराई सांभाळताना आम्ही सगळ्या पोरी!

आजीची गौराईची गाणी तिच्या मागून गुणगुणताना अडखळनारे शब्द आणि ते सुधरवण्याचे प्रयत्न करणारी ती आमची आजी. खुप छान चित्र असायच ते. आजही आम्ही मैत्रीणी एकत्रित जमलो की आजीची आठवण काढतो.

आजीच देवाशी लग्न लागलेल होतं. त्यामुळे तिला देवाची काकू किंवा देवाची आजी म्हणलं जात. आजी हळू हळू म्हातारी होत गेली पण तरीही ती तिच एकटीच काम काटेकोरपणे करायची. नंतर मात्र तिच्याकडून तेही होणे बंद झालं

बऱ्याच दिवसांनंतर आम्हाला कळाल की आजीला तिचा भाचा घेऊन गेला आहे. भाच्याकडून ती परत आल्याचे कळाले. तिच्या भाच्याने घराबाहेर काढले होते. तिला सांभाळतो म्हणुन त्याने तिची गावात असलेली झोपडी विकली आणि पैसे घेऊन गेला. त्याने तिला सांभाळ तर नाहीच उलट तिचे पैसे घेउन तिलाच घराबाहेर काढले. ती गावामध्ये आल्यावर भटकत होती दारोदारी अन्न मागून खात होती. जिथ मोकळ छत दिसेल तिथे ती झोपत होती. तीला गावच्या सरपंचाने एका मंदीरात जागा दिली राहायला. गावकरी तीची मदत करत होते. तीला काय पाहीजे काय नको ते पाहत होते.

ज्या बाईंने आयुष्यभर जगभर आनंद वाटला, तिला मुठभर पोटासाठी दारोदारी भटकाव लागल. नंतर गाव सोडून गेली ती. कुठे गेली ती काय करते कोणीच सांगु शकत नव्हत. फार महीन्यानी खबर आली की देवाची आजी देवाकडे गेल्याच कळाल.

ज्या देवाच्या नावाने मळवट आयुष्यभर तिने भरला, तो तिच्यासाठी फक्त देवच राहिला पती कधीच झाला नाही. ज्या पतीच्या सेवेसाठी तिनं सगळ्यांना एकत्रित केलं त्यांच फळ तिला सोडुन सगळ्यांना मिळाल…………

आजही गौराई आम्ही घराबाहेर नळावर भरून आत घेतो ना तेव्हा एक सेकंद का होईना आम्हाला आजीची आठवणीत डोळ्यात टचकन पाणि येते.

आणि कानात आजीचा गाण्याचा आवाज घुमतो - - - - - - - - - - - - -

आली आली गौराई…………………..