Sunday, April 12, 2020

TV मालीका आणि माझी आई

                                                           
नमस्कार,

मी मालीकंना कंटाळेली एक मुलगी. आजकालच्या मालीकांमधे काहीही दाखवतात…… नव्याने सांगण्याची गरज नसावी त्यामुळे मुध्यातच हात घालते…… काय आहे ना आजकालच्या मालीका सिनेमा मधे जे काही दाखवतात ते आपल्याला real वाटू लागतात . आता बघा ना आमच्या घरचच घ्या . मी घरी रोज अनुभव घेते. माझी आई तीला मालीका पाहनं येवढ आवडत की आजुबाजुला कोण बसलय हेच कळत नाही. तिला मालीकांचे पात्र खरी वाटू लागतात. तिला वाटते की या मालीकांचे पात्र, त्यांचे संवाद, एकमेकांशी असलेले नाती ह्या गोष्टी कितीही अमान्य केलं आपल्या ह्रदयाच्या खुप जवळ असतात.

आता हेच उदाहरण पहा ना……..

काही दिवसांपूर्वीच गोष्ट माझ्या लग्नसाठी स्थळ बघत होती. त्यामधे त्यांना मुलगा चांगला, मुलीला शोभेल असा. मुलीच्या वयाच्या मानाने १ ते २ वर्षच मोठा असणारा. पण मालिका मधे चालतोय बापाच्या वयाचा मुलगा! ती मालीका “ तूला पाहते रे “ बघुन आई म्हणते कशी “ कसा मुलीचा वडील आहे तीला लग्नाला परवानगी देतच नाही. “ आता यांवर मी काय बोलनार ना! तिला काय बोलायचे म्हणजे ……

तुम्हाला तर माहीतच आहे …..home minister म्हणल्यावर कोणीच काहीच बोलु शकत नाही..

घरात रोज प्रत्येक मालिकेच चर्चासत्र चालुच असते. त्यात अजुन एक भर पडली ती म्हणजे माझी वहीनी तीला तर मालिकांमधे काहीच रस नव्हता. ती पण आई बरोबर राहुन मालिका बघायची सवय झाली. रोज दोघींच चालू असत आज राधिका गुरूनाथ ला धडा शिकवेल का ……. सुमी सासुबाई ला काय उत्तर देईल. ….. गूरुनाथ काल राधिकाला ओरडला, शनायाच नवीन कारस्थान केलं, राधिकाने ४-५ लिटर आश्रु गाळले…… वगैरे-वगैरे………

बर एवढच नव्हे तर त्या मालिकांचे पुन्हा पुन्हा दिवसभर त्याच त्याच repeat मालिका बघुन त्या पात्राचे संवाद इतके पाठ झालेले असतात कि त्या कलाकाराऐवजी या दोघींना उभ केलं तरी काही बिघडणार नाही……. असो, विषयांतर नको.


म्हणजे माझ सांगण्यात तात्पर्य काय, तर या मालिका खुप जास्त व्यापून टाकतात आपल्या जिवनाला. म्हणजे काय तर, एखादी गोष्ट केली की ती कोणत्याही मालिकेतल्या कोणत्यातरी पकाऊ पात्राप्रमाणे केली आहे अशी comment सहसा ऐकायला मि़ळतेच……..तुझं बोलन-वागन एकदम ‘अंजलीबाई’ सारखं आहे, तू अगदी ‘राणा’ सारखा वागतोस, तु ‘ईशा’ सारखी हसतेस…….अशी ५५० उदाहरण आहेत पण तेवढा वेळ माझ्याकडे आहे ना वाचकांकडे. आमच्या घरामधे या सासु-सुनाकडे खुप वेळ असतो…….असो यांना मालीका बघुन त्यांना सुख भेटत. तुम्ही वाचनातुन घ्या.

महत्वाच असं की ह्या मालीका ज्या सामान्य माणसाच्या देखील इतक्या जवळच्या बनून जातात त्या तितक्याच चांगल्या असायला पाहिजेत असं मला वाटत. सगळ्याच मालिका वाईट असतात असं नाही काही ईतिहासावर मालिका आहेत. एका मालिकेच नाव मला आवर्जुन घ्यावसं वाटत ती म्हणजे डाॅ. अमोल कोल्हें यांची मालिका “ स्वराज्य रक्षक संभाजी “ सत्याचा विजय दाखवण हे मालिकांचे ध्येय असायला हवे, असं माझ ठाम मत आहे……
..
तुम्हाला काय वाटत??????

मालिकांमधे जे दाखवत आहेत ते पाहुन जगात काही चांगले उरले आहे असे अजिबात वाटत नाही. एका मालिकेत सासू सुनेवर जे अत्याचार करते शनाया राधिकाच्या घराचे वासे मोजते,[ तशीच तीची आई पण], राधिकाला घराबाहेर काढणाचा विचार करणारा गुरूनाथ स्वत: शनायाशी जे वागतोय ते सर्व पाहुन जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चालला आहे. थोड्या फार फरकाने बऱ्याच मालिका याचेच किस्से गिरवत आहे. सध्या ती माया राधिकाविषयी कटकारस्तान शिजवन्यात मग्न असावी.

असे किस्से रोजच्या पेपरात येतच असतात.

6 comments: