Thursday, June 11, 2020

मुंबईची गाॅडमदर - हसीना पारकर



२०१७ मध्ये निर्देशक अपूर्वा लाखीया यांची फिल्म ‘हसीना पारकर’ रीलीज झाली होती. ही फिल्म भारतामधील मोस्ट वाॅन्टेड अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम ची बहीन हसीना पारकर च्या जीवनावर आधारीत आहे. हसीना पारकर हे नाव आहे जे १९९१ च्या नंतर मुंबईमध्ये दहशदीचे दुसरे नाव होते. हसीना पारकर म्हणजे दाऊद इब्राहीम ची बहीन आणि इब्राहिम इस्माईल पारकर यांची पत्नी, पण हसीना या दोघांच्या व्यतिरीक्त बरेच काही होती. हसीनाला मुंबईची गाॅडमदर म्हणून ओळखले जात होते. 

कशी बनली गाॅडमदर 

अंडरवर्ल्ड ची रिपोर्टिंग करत असलेले हुसैन जैदी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ‘माफीया क्वीन्स ॲाफ मुंबई’ या पुस्तकामध्ये हसीना पारकरचे काही खुलासे केले आहेत. दाऊद ची बहीन हसीना मुंबईची रानी होती. काही जाग्यांवरती तिची दहशत होती. 

पतीच्या खुन्या नंतर बनली डाॅन

   

हसीनाचे नाव नागपाडा ची गाॅडमदर १९९१ सालानंतर पडले. याच्या पहिले हसीनाचे आणि अंडरवर्ल्ड चे काहीही संबंध नव्हते. १९९१ मध्ये त्यांच्या पती इब्राहिम पारकर यांचा खुन झाला. जुलै १९९१ मध्ये अरून गवळी ने त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दाऊच्या बहीणीचा नवरा म्हणजे हसीनाचे पती इब्राहिम ला मारले. नंतर दाऊद ने या खुनाचा बदला घेण्यासाठी जेजे हाॅस्पिटल मध्ये शुटआऊट केले होते. या सगळ्या प्रकरणानंतर हसीना ने अंडरवर्ल्ड च्या दुनियेत पाय ठेवला. 

मनपसंत घर

 हसीनाने स्वतःचा आशीयाना बनवला. मुंबईच्या नागपाडा इलाक्यामधले गार्डन हाॅल नावाच्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाली. अस बोलेजाते की हसीनाला हे घर इतके आवडले की त्यांनी घराचे कुलूप तोडून ती त्या घरमध्ये राहायला गेली आणि ते घर स्वतःच्या नावावर करून घेतले. या वरती कोणी तक्रार नाही केली. 

विधवा झाल्यानंतर बनवली गैंग

 दाऊद च्या बहीन-भावामध्ये हसीना सातव्या नंबरची होती. गार्डन हाॅल च्या इमारत च्या शानदार फ्लाट मध्ये राहत असलेली हसीनाच दाऊद च्या संपुर्ण संपत्तीची देखरेख करत होती. तिन मुलांची आई हसीना च्या नावावर करोडोची प्रोपर्टी आहे. अंडरवर्ल्ड मध्ये गैंगवाॅर ची सुरवात हसीनाचे विधवा होने हेच कारन आहे. दाऊद ने हसीनाच्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अरून गवळी च्या शुटर चा खुन केला. यानंतर या दोघांच्यात मारामारीझाली आणि या मारामारीत खुप लोक जखमी झाले. काही लोक मरन पावले. 

दहशीदीचे दुसरे नाव होते हसीना पारकर

 

आतापर्यंत च्या रिपोर्ट नुसार हसीना खुप बेकायदेशीर कामामध्ये तिचा हात होता. याच्या सोबत तिच्या आसपासच्या लोकांसाठी गाॅडमदर पेक्षा जास्त होती ती. एक लोकल दुकानदाराच्या हिशोबाने हसीना आपा ने त्यांची मदत केली त्यांची पळून गेलेली बहीन हसीनाने परत आणली. हे काम करण्यासाठी हसीनाने स्वतःहून फोन केला होता. हसीनाचे नाव झोपड पट्टीतले धंदे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये वसुली आणि विदेशामध्ये रिलीज साठी मोलभाव करणे, हवाला रॉकेट,केबल ॲापरेटर चा धंदा या सगळ्या कामासाठी ती प्रसिध्द होती. या सगळ्याच्या व्यतरीक्त आजपर्यंत फक्त एकच एफआयआर तिच्या विरोधात लिहीली गेली आहे. 

दाऊदचे सुध्दा ऐकले नाही

 

पोलीस रेकाॅर्ड च्या हिशोबाने हसीना तिच्या भावाची ५४ बेमानी प्रोपर्टीची देखभाल करत होती. नागपाडामध्ये ६ हाॅटेल, पीर खान रोड ला गुड लक लाॅज. बोल्ले जाते की हसीनाची नजर स्लम रीडवलपमेंट अथाॅरीटी (SRA) च्या प्रोजेक्ट वर होती. या गोष्टीसाठी हसीनावर तक्रार नोंदवली होती. दाऊद ने याच्यासाठी हसीनाला मना केले होते. पण हसीनाने ऐकले नाही. हसीना प्रोपर्टीचे मसले पण सोडवायला लागली. याच्या साठी ती भरपुर कमिशन पण घेत होती.

                             

हुसैन जैदी ने घेतलेल्या इंटरव्यू मध्ये हसीना बोलत होती तिचा भाऊ चूकीचा आहे पण एवढा पण नाही जेवढे त्याला लोकांनी बनवले आहे. हसीनाच्या हिशोबाने दाऊदच्या विरोधात खुप चूकीच्या केसेस लावल्या गेल्या आहेत. हसीना पारकर एक दबंग महीला होती. गैंग ला चालवनारी. लाखो लोकांची गाॅडमदर होती. हसीना पारकर चा मृत्यु २०१४ मध्ये ह्रदय झटक्याने झाला. आणि त्यांच्या अंतीम यात्रामध्ये ५ हजार पेक्षा जास्त लोक आले होते.

2 comments: