Saturday, April 11, 2020

देवाची आजी


माणूस जन्माला येतो. त्यानंतर त्यांच आयुष्य त्याच्या एका ध्येयापर्यंत जात आणि थांबत. शक्यतो शिक्षण, नोकरी, गाडी, बंगला, लग्न, मुले आणि नंतर मुलांची ह्याच प्रतिक्रियेत शेवटच्या श्वासापर्यंत साथ! पण या प्रतिक्रियेशिवाय स्री किंवा पुरुष पूर्ण होऊ शकत नाही अशी भारतीयांची धारना किंवा. अगदीच संस्कृती याशिवाय सुद्धा जगणारी एक बाई पाहिली मी जगासाठी एक वेगळाच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करून गेली.

मी एका खेडेगावात राहते. छोटंस टुमदार गाव आहे. बंगले, रस्ते, गाड्या आल्या पण विचारसरणी बदलली नाही. मी इतकी वर्ष या प्रतिक्रीयेचा हिस्सा आहे. पण बदलला तो बाह्यरंग आतून माणसं तिच भांडण म्हटल की अगदी जीवावर उठणारी आणि जीव लावला तर जीवाला जीव देणारी!

माझ्या गल्लीच्या मागच्या बाजुला एका मोकळ्या जागेत एक फांद्यानी साकारलेली झोपडी असली तरीही टापटीपणे ठेवलेली. ती झोपडी एका आजीची होती. तिला सगळं गाव देवाची आजी म्हणुन ओळखायची. देवाधर्माच्या गोष्टी अजुनही आमच्या गावाकडे एकत्रित होतात पण त्यांच नेतृत्व देवाची आजी करायची.

नदीवर गौराई आणायला जाताना सगळ्यात पुढे असणारी देवाची आजी. तिच्या मागे चालणाऱ्या वैतागलेल्या डोक्यावरच्या घागरीतली गौराई सांभाळताना आम्ही सगळ्या पोरी!

आजीची गौराईची गाणी तिच्या मागून गुणगुणताना अडखळनारे शब्द आणि ते सुधरवण्याचे प्रयत्न करणारी ती आमची आजी. खुप छान चित्र असायच ते. आजही आम्ही मैत्रीणी एकत्रित जमलो की आजीची आठवण काढतो.

आजीच देवाशी लग्न लागलेल होतं. त्यामुळे तिला देवाची काकू किंवा देवाची आजी म्हणलं जात. आजी हळू हळू म्हातारी होत गेली पण तरीही ती तिच एकटीच काम काटेकोरपणे करायची. नंतर मात्र तिच्याकडून तेही होणे बंद झालं

बऱ्याच दिवसांनंतर आम्हाला कळाल की आजीला तिचा भाचा घेऊन गेला आहे. भाच्याकडून ती परत आल्याचे कळाले. तिच्या भाच्याने घराबाहेर काढले होते. तिला सांभाळतो म्हणुन त्याने तिची गावात असलेली झोपडी विकली आणि पैसे घेऊन गेला. त्याने तिला सांभाळ तर नाहीच उलट तिचे पैसे घेउन तिलाच घराबाहेर काढले. ती गावामध्ये आल्यावर भटकत होती दारोदारी अन्न मागून खात होती. जिथ मोकळ छत दिसेल तिथे ती झोपत होती. तीला गावच्या सरपंचाने एका मंदीरात जागा दिली राहायला. गावकरी तीची मदत करत होते. तीला काय पाहीजे काय नको ते पाहत होते.

ज्या बाईंने आयुष्यभर जगभर आनंद वाटला, तिला मुठभर पोटासाठी दारोदारी भटकाव लागल. नंतर गाव सोडून गेली ती. कुठे गेली ती काय करते कोणीच सांगु शकत नव्हत. फार महीन्यानी खबर आली की देवाची आजी देवाकडे गेल्याच कळाल.

ज्या देवाच्या नावाने मळवट आयुष्यभर तिने भरला, तो तिच्यासाठी फक्त देवच राहिला पती कधीच झाला नाही. ज्या पतीच्या सेवेसाठी तिनं सगळ्यांना एकत्रित केलं त्यांच फळ तिला सोडुन सगळ्यांना मिळाल…………

आजही गौराई आम्ही घराबाहेर नळावर भरून आत घेतो ना तेव्हा एक सेकंद का होईना आम्हाला आजीची आठवणीत डोळ्यात टचकन पाणि येते.

आणि कानात आजीचा गाण्याचा आवाज घुमतो - - - - - - - - - - - - -

आली आली गौराई…………………..

6 comments: