व्हाटसॲप वर आमचे दोन ग्रुप आहेत प्रिनंसेस आणि गल्ली गॅंग. त्या ग्रुप वर कुणाचा वाढदिवस असला तरच जागा होतो, आणि शुभेच्छा देऊन संपल्यावर तो वाळवंटासारखा औसाड होऊन जातो…….
मी तर आश्चर्यचकीत होते की ही तिच लहान पिल्ल आहेत जी मोठी झाली अन त्यांच्यातला एक मित्र मरत गेला.
आमच गावात गावठाण भाग आहे. तिथे आम्ही राहतो. आमची छोटीशी गल्ली. त्यामधे एक खेळण्यासाठी थोडीशी मोकळी जागा होती. कुणाची होती माहीत नाही पण ती जागा आम्ही खेळण्यासाठी वापरायचो. एके दिवशी त्या जागेमध्ये कोणाच्यातरी बांधकामाची वाळू आणुन टाकली. त्यात वाळू असल्याने आमच खेळणं बंद झालं. काही दिवस आम्ही बघितल की वाळू संपेना. वाळू संपायची वाटच नाही बघितली. नंतर आम्ही त्या वाळूमध्येच खेळायचो. विष-अमृत, साखळीचा डाव चांगलाच रंगायचा. त्या मध्ये मुल आणि मुली एकत्र असायची.
साखळी खेळताना कोण कुणालाही पकडायच कुणालाही कुणाचा हात पकडायला लागायचा.
पाप नव्हत आमच्या मनांत. कोण कुणाच्याही शेजारी मांडीला मांडी लावून बसायचं. जगाच्या या घाणेरड्या मलिन नदीपासून खुप दुर होतो आम्ही! नंतर जसं मोठे होत गेलो तसं आजुबाजूस असणाऱ्या लोकांना खटकत गेलो आम्ही मुलं……
मुलांना मिसरूट फुटली, पोरींची चमक वाढली अन् लोकांच्या नजरा बदलायला लागल्या …….
आम्ही एकत्र खेळायचो दिवाळीची सुट्टी म्हणली की खूप धमाल यायची. सुट्टी लागली रे लागली आम्ही २ दिवसात सगळा दिवाळी अभ्यास करून ठेवायचा. ती सुट्टी खुपच कमी असायची. दिवाळी फराळ बनवायला आम्ही तयार असायचो. गल्ली मध्ये सगळ्या बायकांच ठरले असायच, की आज कुणाचं करंजे कायचे आणि उद्या कुणाचे आम्हा मुलांना खास आमंत्रण असायच करंजा करायचे आहेत या तुम्ही. आम्ही पोलपाट लाटन घेऊन तयारीत असणार. एका दिवसात दोन-दोन घरचे करंजा बनवनार. खुप खायला पण भेटायचं… अशी आमची दिवाळीची मज्जा … आता काय व्हाट्ॲप वरच फराळ पाठवतात आणि दिवाळीच्या शुभेच्छा पण!
सुट्टीची मज्जाच वेगळी होती. आम्ही सुट्टीत आबा डबा टीम टीम खेळायचो. त्यात त्या मुलांच काही वेगळच असायच आम्हाला फसवण्याचे त्यांचे वेगळेच उद्योग चालायचे. लपला असलेला मुलगा आम्ही त्यांच्या शर्ट वरून ओळखायचो हे त्यांना चांगलच माहीत होत. म्हणू ते एकमेकांचे शर्ट अदलाबदल करायचे. त्यातच आम्ही फसायचो.
उन्हाळयाच्या सूट्टीत मराठी सिनेमे खुप छान लागतात. आम्ही आमचे खेळ सकाळी खेळुण रिकामे व्हायचो नंतर सिनेमे बघायला पूर्ण दिवस भेटायचा. माझ्या घरी माझे आजोबा होते त्यांना ज्यास्त वेळ टी॰वी॰ बघणं आवडत नव्हत. त्यांच टी॰वी॰ बघून झालं की ते बंद करून जायचे. ते एकदा गेले बाहेर की आम्ही परत टी॰वी॰ लावायचो. त्यांनी एखदा पाहील की सगळी मुल जमुन टी॰वी॰ बघतात, त्या नंतर ते घरातील फ्वूज च काढून ठेवायचे. दुपारच झोपायचं असत असं सांगायचे.
संध्याकाळी आमचा लगोरीचा खेळ चालायचा. लगोरी खेळताना आमचा खुप आरडाओरडा व्हायचा. त्या आमच्या खेळाने संपुर्ण गल्ली त्रासुन गेली होती. एकदा तर एका काकु ने आम्हाला वयतागुन आमच्या लगोरीचे दगडच फेकून दिले.
हादगा तर मुलींचा सगळ्यात आवडतां खेळ. पाऊस चालु झाला की हस्त नक्षत्रावर हादगा पण चालु होतो. हादग्याला तर रोजच नविन खाऊ डब्यात. हादग्याची गाणी म्हणणार. हात्तीचा फोटो पाटीवर काढुन त्यांच पूजन करनार. नंतर दुसऱ्यान डब्यात काय आणलय ते ओळखायच. नंतर डबा उघडून एक एक खास त्या हत्तीच्या फोटोवर ठेवणार. आपल्या डब्यातल एकमेकांना वाटून खाऊन डबा रीकामा घरी घेउन येनार. हदग्याच्या शेवटच्या दिवशी हात्तीच्या फोटोवर ठेवलेला खाऊ आणि रोजची वाहीलेली फुले नदीवर विसर्जन करनार. असा आमचा खेळ खुप मज्जा यायची.
खुप काही लिहायच होत पण आतापूरते येवढच...
असे माझे बालपण माझ्या आयुष्याच्या नव्या वळणावर विसरून गेलय ……….
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवनी………….
आज एक गाण ऐकल की बालपण डोळ्यांसमोर उभ राहत…….
“ का कळेना अशी हरवली पाखरे………..हरवली हरवली हरवली पाखरे……..!!!


गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवनी………….
ReplyDeleteNice
ReplyDeleteबालपण 🥺🥰
ReplyDelete