उपयोग
यंत्रमानव सांगकाम्याचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात.हे सांगकामे यंत्रमानव शक्तीची कामे कमी वेळात करू शकतात. मोटार वाहन उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरतात. हे ‘औद्योगिक’ सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर स्पोटके शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरतात. कारण यांत काही अपघात घडून मानव जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात.जसे की घरीच स्वच्छता करणे. ठराविक भागातील गवत कापणे. अंतराळ क्षेत्रात यांचा उपयोग होतो. जसे मंगळ ग्रहावर सांगकामे यंत्रमानव उतरून तेथील वातावरणाचे संशोधन केले जाते. या सांगकाम्याना फक्त आज्ञावली मार्फत दिलेले कामच करता येते. त्यांची निर्मिती अनेकदा एका प्रकारचे काम करण्यासाठी झालेली असते.
स्वरूप
सांगकामे यंत्रमानव हे मानवी स्वरूपात दिसतील असे नाही. यांना हात, पाय, डोळे आदी अवयव सदृश सेन्सर्स असलेच पाहीजेत असे नसते. हे सांगकामे निरनिराळ्या स्वरूपात असू शकतात. यांना कामासाठी आवश्यक असलेले अवयवच जोडलेले असतात जसे की यांत्रिक हात.
सध्या काळात हा सागकाम्याची खुप मदत होताना दिसते. पुर्ण जगभरात कोरोना असल्यामुळे काही लोक कामावर जातात काही घरीच आहेत. पण याच कोरोनाच्या काळात हेच सांगकामे आपली मदत करताना दिसतात. अशीच एक घटना केरळ मध्ये घडली आहे.
जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या या प्राणघातक कोरोनाव्हायरस विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केरळमध्ये एक अनोखी कल्पना समोर आली.
केरळ स्टार्टअप मिशन (केएसयुएम) नावाच्या सहकारी एजन्सीने मुखवटा, सॅनिटायझर्स वाटप करणारे आणि जीवघेणा रोगाबद्दल लोकांना शिक्षित करणारे दोन रोबोट बाजारात आणले आहेत.
असीमोव रोबोटिक्स विकसीत केएसयुएम काॅम्प्लेक्समध्ये हे दोन रोबोट कार्यरत आहेत. एक रोबोट मुखवटे आणि सॅनिटायझर्स वितरित करीत असताना, दुसरा धोका टाळण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ॲार्गनायझेशनच्या मोहीमेविषयी तपशिल करतो.

रोबोट इतर कामे ही करतात जसे की दरवाजा साफ करणे आणि कोरोनाव्हायरसच्या प्रश्नाना उत्तर देणे.
सगळेजण आपली कामे नियमाने पार पाडत आहेत. ते डाॅक्टर असो वा पोलीस. थोडी साथ आपणही देऊया. घरात राहूया, आणि सुरक्षित राहूया.



No comments:
Post a Comment