इतिहास
पहिल्या महायुध्दात या विमानाची सुरवात झाली. आधी ही विमाने खुप लहान आणि हलकी होती. परंतु ती सशस्त्र होती. विमान एका लाकडी सांगाड्यावर बांधले जात असे. त्यास कापड्याने झाकले जात असे. त्यामुळे कमी वजनाचे विमान तयार होते. दुसऱ्या महायुध्दापर्यंत यांत सुधारणा होऊन धातूची विमान बांधली जाऊ लागली यांत मशिन गन बसवल्या जात असत. यांना पंख्याची इंजिने असत. काही विमान ताशी ४०० मैल वेग गाठत होते. यांना एकच इंजिन असत असे. दोन इंजिनांची विमानेही बांधली गेली पण तेव्हीढी कार्यक्षमता नव्हती. इ.स. १९५० नंतर या विमानांना रडार लावण्यास आले. त्यामुळे वैमानिक दूरवर पाहू शकत होते. १९६० नंतर मशिन गन्स जाऊन त्यात हवेतल्या हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जाऊ लागली.
स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे विमाने रडारपासुन काही प्रमाणात तरी लपून राहू शकतात. स्टेल्थ फायटर विमानाच्या पृष्ठभागावर खास पदार्थाचे आवरण दिलेले असते. हे आवरण रेडिओ लहरी शोषून घेतात. तसेच सर्वसाधारण विमानाप्रमाणे स्टेल्थ विमानाची इंजिने बाहेर नसतात. ती लपविलेली असतात. स्टेल्थ तंत्रज्ञान रडार विमान ओळखण्याची शक्यता कमी असते.
भारत
भारताचेही लढाऊ विमान बनवण्याचे प्रकल्प सुरू आहेत. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदूस्तान एरोनाॅटिक्स लिमिटेड या कंपन्या मिळून नवीन स्टेल्थ विमान बनवत आहेत. याला सुखोई-हाल FGFA -फिफ्थ जनरेशन फायटन एअररक्राफ्ट असे नाव देण्यात आले आहे. या शिवाय आडव्हास मीडियम काॅंबॅट एअरक्राफ्ट हे भारत स्वतःच्या बळावर पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान बनवत आहे.

No comments:
Post a Comment