Tuesday, May 12, 2020

स्थापत्य अभियांत्रिकी

 स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी अभियांत्रीकी शाखा आहे. यांत नागरी आयोजन, बांधकाम, आणि बांधलेल्या इमारतीचे अनुरक्षण व इतर सामाजीक प्राधिकरण संबंधित क्षेत्रे येतात. पृथ्वी, जल, किंवा संस्कृती आणि त्यांच्या क्रिया यांच्या संबंधित असलेल्यानेच इंग्रजीत याला ‘सिव्हील’ म्हटले जाते. आजच्या याच्या क्षेत्रात पाणीपुरवठा मलनिःस्सारण, पूर व्यवस्थापन आणि वाहतूक याचा ही अंतर्भाव होतो. थोडक्यात स्थापत्य अभियांत्रिकी असे क्षेत्र आहे की जे आपल्या विश्वाला, राहत्या जागेला अधिक सुखकर बनवण्यास मदत करते.


स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास

स्थापत्य अभियांत्रिकी हे भौतिकशास्त्रातिल नियंमांचे उपयोजन असुन याचा इतिहास भौतिकशास्त्र आणि गणिताच्या सखोल अध्यायानाशी संबंध दाखवतो. स्थापत्य अभियांत्रिकी हा भव्य व्यवसाय असल्यामुळे या शाखेचा इतिहास संरचनात्मक, अभियांत्रीकी, पदार्थविज्ञान, भुगोल, भूगर्भशात्र, मृदा यांत्रिकी, जल, विज्ञान, पर्यावरण, उपयोजित यंत्रशात्र संबंधित आहे.


पुराणकाळापासून रचना आणि बांधकामाचे बहुतेक कार्य हे शिल्पकार आणि सुतार यांच्यासारख्या कारागिरांनी केले. उत्तरोत्तर काळात चतुर बांधकाम कारागिराची गरज वाढत गेली. बांधकामासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान हे अश्या कारागीरांच्या संघटनेत जतन केले जात असे. इमारती, रस्ते आणि इतर बांधकाम हे पुन्हा पुन्हा त्यांच पद्धतींनी बांधले जात होते. आणि त्याची मागणी खूप जास्त प्रमानात वाढत होती.

भौतिकशास्त्र्यातील आणि गणितातील उदाहरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये वापर करून घेण्याचे पुरातन उदाहरण म्हणजे आर्किमिडीजच्या सिध्दांताचा, ज्यामुळे आपण उल्हासित वृत्ती समजून घेऊ शकतो तसेच काही समस्यांच्या व्यावहारीक निवारणांचा समावेश होतो. ब्रम्हगुप्त या भारतीय गणितज्ञाने सातव्या शतकात उत्खननाच्या परिनामाच्या आकडेमोडीसाठी हिंदू-अरेबिक अंकावर अवलंबून असणाऱ्या अंकगणिताचा वापर केला होता.

No comments:

Post a Comment