Sunday, May 10, 2020

विलिस टाॅवर

विलिस टाॅवर ही अमेरीकेच्या शिकागो शहरातील गगनचूंबी इमारत आहे. विलिस टाॅवर अमेरीकेतील सर्वात उंच इमारत आहे. ह्या इमारतचे बांधकाम १९७४ साली पूर्ण झाले व तेव्हापासून १९८८ पर्यंत विलिस टाॅवर जगातील सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीत १०८ मजले आहेत व एकूण उंची ४४२ मीटर आहे. जेव्हा ही इमारत बांधली गेली त्यावेळी ही जगातील सर्वात उंच इमारत होती. या इमारतीचे पूर्वीचे नाव ‘सिअर्स टाॅवर’ असे होते. पण २००३ मध्ये ‘सिअर्स, रिबक &कं.’ चे ‘सिअर्स’ नावाचे अधिकार संपले पण नविन नाव काही लागले नाही. मार्च  २००९ मध्ये ‘विलिस ग्रुप होल्डिंग ली.’ या लंडनमधील कंपनीने यांचे अधिकार घेतले आणि दि. १६ जुलै २००९ रोजी सकाळी १० वाजता याचे नाव ‘विलिस टाॅवर’असे अधिकृत रित्या बदलले. जगातील असंख्य ‘सिअर्स टाॅवर’ च्या चाहत्यांसाठी हा एक धक्का होता.

इतिहास

‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ ही कंपनी इ.स. १९६० साली जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी होती. त्यांची अनेक ॲाफिसे शिकागो शहरामध्ये पसरलेली असुन त्यात त्याकाळी ३,५०,००० लोक काम करत असत. ‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ च्या उच्च अधिकाऱ्यांनी आपले सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी कामास बसतील, अश्या वास्तुरचनेवर विचार करण्यास आरंभ केला. या कल्पनेतुन पुढची पावले टाकले गेली या इमारतीचे चित्र तयार झाले.
                                                                                              
कंपनीचा भविष्यकालीन विस्तार लक्षात घेता साधारण ३० लाख चौरस फूट एवढी जागा लागेल असा अंदाज करून विचार चालू झाला. भविष्यकालीन विस्तार होईपर्यंत मोकळी असलेली जागा छोट्या व्यावसायीकांना देण्याचा विचार झाला. त्यांना ती जागा परवडायला हवी असेल तर जागा लहान हवी. जागा लहान पण खिडक्या आणि बाहेरचे दृश्य मात्र चांगले दिसायला हवे, यासाठी प्रत्येक मजल्यावर कमी क्षेत्रफळाची पण जास्त उंच अशी इमारत बनवण्याची कल्पना पुढे आली. ९ मोठ्या नळ्या एकत्र करून जशी भौमितीक आकृती, तसे एक चित्र तयार झाले. सर्वात खाली ५५००० चौरस फूट आणि हळूहळू वरती कमी होत जाणारे क्षेत्रफळ असे चित्र करताना ही इमारत १०० मजल्याहून अधिक उंच होणारं अस लक्षात आले.
                                                                                   
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या नियमाचे पालन करत इ.स. १९६९ साली यांचे काम सुरू झाले आणि मे इ.स. १९७३ ला पुर्ण झाले. त्याकाळी या इमारतीला १५ कोटी अमेरीकन डाॅलर खर्च आला होता. हा सर्व खर्च ‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ ने उचलला होता. इ.स. १९८२ साली २ ॲंटेना तेथे बसवण्यात आले त्यामुळे त्याची उंची १७०७ फूट झाली. दूरचित्रवाणी प्रसारण चांगले होण्यासीठी नंतर तिथे एक ॲंटीना अवाढविल्यानंतर ती १७३० फूट अर्थात ५२७ मीटर झाली.

पर्यटन सुविधा

या इमारतींचा १३५३ फूट उंचीवर असलेला १०३ वा मजला सार्वजनिक रित्या खुला असुन तिथे पर्यटकांना नेण्यासाठी २६ फूट प्रतिसेकंद या वेगाने चालणारी लिफ्ट आहे. या मजल्यावरून भोवतालचे विहंगम दृश्य न्याहाळण्यास ‘द स्काय डेक’ नावाने ओळखली जाणारी गच्ची आहे. आकाश स्वच्छ असेल, तर या गच्चीवरून शिकागो शहर व परीसरातला ५० मैल एवढ्या अंतरापर्यंतचा प्रदेश पाहता येतो. ईल्लिनोइस, इंडियाना, मिशिगन आणि विस्काॅन्सिन या ४ राज्यांतील बराचसा प्रदेश नजरेच्या टप्यात येतो.

                                            
या गच्चीवर पर्यटकांना उंचीवरील थरार अनुभवण्यासाठी संपूर्णतः काचेची बाल्कन्या बांधल्या आहेत. जानेवारी २००९ मध्ये यांचे काम चालू झाले. सुमारे ४ फूट बाहेर काढलेल्या या ३ बाल्कन्या संपुर्णपणे काचेच्या बनवल्या आहेत. प्रत्येक बाल्कनीत ५ टन वजन घेण्याची क्षमता आहे. २ जुलै २००९ रोजी या बाल्कन्या सार्वजनिक वापरासाठी खुल्या करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment