Tuesday, April 28, 2020

छत्रपतींचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”

बहीर्जी नाईक

बहिर्जींकडे फक्त वेषांतरचीच कला होती असे नाही तर समोरच्याचा आपल्या शब्दांनी वेध घेऊन त्यांच्या नकळत सर्व माहिती काढून घेण्याचे कसब त्यांना पुरते अवगत होती.

अहो चक्क दिल्लीचा बादशाह आणि विजापुरचा आदिलशाह यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत.
  जराशीही शंका आली तरी समोरच्याला शत्रु पक्षाचा माणूस ठरवून देहदंड देणाऱ्या भेदक नजर कधीही बहिर्जींचा ठाव घेऊ शकली नाहीत यातच बहिर्जींचे असामान्य कर्तुत्व सामावलेले होते. शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी देखील अतिशय प्रमाणीकपणाने ते खाते चालवत असत. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता.  

    खोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकाऱ्यासह कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीत बहिर्जींना दिली होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेरखाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे. 
  बहिर्जीनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा विकसित केली होती. ही भाषा केवळ गुप्तहेर खात्यालाच कळे. त्यामुळे गुप्तहेर खात्याची माहिती बाहेर फुटली जात नसे. अगदी महत्त्वपूर्ण माहिती द्दायची असल्यास बहिर्जी स्वतःहून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस पडायचे नाहीत.
असे म्हटले जाते की बहिर्जी नाईक असा कोणी माणूस नाहीच, असे काही लोकांना वाटत असे. इतके बेमालूमपणे आणि अज्ञातवास असल्यासारखे ते वापरायचे. 
अनेकांना असे वाटत असेल की बहीर्जी नाईक हे फक्त गुप्तहेराचेच काम करायचे त्यात काय कर्तुत्व? तर अश्यांना सांगावेसे वाटते की,ते लढण्यात देखील तरबेज होते. पण तरीही गुप्तहेराचे काम म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे
शत्रुच्या गोटात असताना कधी कोणाला संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा. त्यमुळे बहिर्जी दांडपट्टा, तलवारबाज यांसारखी युध्द तंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्यांच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगांमधून एकट्याने शत्रुला धूळ चाखवत बाहेर पडायचे.

 अफझल खानाचा वध ही स्वराज्याच्या इतिहासातील मोठी घटना. त्यात बहीर्जींनी फार मोठी कामगीरीच बजावली होती

शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये दिली गेलेली उपाधी सर्वच दृष्टीने सार्थ ठरते 
महाराष्ट्रच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालूक्यामध्ये बाणूरगड नावाचा किल्ला आहे. कधी भेट दिली तर तुम्हाला या गुप्तहेराची समाधी आढळून येईल. तेव्हा न चुकतां या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करण्यास विसरू नका.

                                            Reference by, google.com,  times of Maharashtra, news paper 


No comments:

Post a Comment