Tuesday, June 16, 2020

‘पार्ले जी’ - या बिस्किटाच्या पॅकेटवर असणाऱ्या फोटोवरून अजुनही वाद चालु

  आपण लहानपणापासून पार्ले-जी बिस्कीट खात आहोत. आपण काय, आपल्या आई वडिलाही तेच खाऊन मोठे झाले आहेत. पार्ले-जीचे पॅकेट एकेकाळी जगातील सर्वात प्रसिद्ध बिस्कीट होते, ते बदलले नाही तर. त्यानंतर पार्ले यांनी बरीच उत्पादने बाजारात आणली असली तरी त्यांनी मुळ पार्ले-जीशी छेडछाड केली नाही. गेल्या दोन पिढ्यांच्या आठवणी या बिस्किटशी संबंधित आहेत. आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. नीलसनने २०११ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक विक्री होणारी बिस्कीट आहे. 

     आपण जेव्हा त्याचे मुखपृष्ठ पाहतो तेव्हा आपल्या मनांत एक प्रश्न पडतो. प्रश्न असा की त्याच्या मुखपृष्ठावर दिसनारी मुलगी कोण आहे? त्याहुनही महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे ती आजकाल कुठे आहे आणि काय करते? आपण बिस्कीटे संपवून तो कागद भेकुन देतो. पण मला आज हा प्रश्न पडला आहे.

     या बिस्कीटाच्या मुखपृष्ठावर मुलगी दिसण्यावरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. हा फोटो असलेल्या मुलीसाठी तीन महीलांचा दावा करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तीन लोकांबद्दल असे म्हटले गेले आहे की ते त्या फोटोमध्ये दिसतात. 

ती मुलगी कधीपासून या कवर वर दिसत आहे

      मुंबईतील विलेपार्ले येथे राहणाऱ्या चौहान कुटूंबाने १९२९ मध्ये ‘पार्ले’ नावाची कंपनी सुरू केली. सुरूवातीला फक्त मिठाई म्हणजे केक, पेस्ट्री आणि कुकीज यासारख्या गोष्टी विकल्या जात होत्या. पण बाजारात बिस्कीटांना मागनी होती. आणि ती ब्रिटिश कंपन्या पूर्ण करत होती. सन १९३९ पासुन पार्ले यांनी भारतात बिस्कीटे बनविणे आणि विक्री करण्यास सुरवात केली. १९८० पर्यंत ‘पार्ले ग्लुको’ बिस्कीट म्हणून ओळखले जात असे. नंतर त्याचे नाव बदलून ‘पार्ले जी’ करण्यात आले. कालांतराने, ‘जी’ ज्याला ग्लुकोज म्हणून ओळखले जायचे, ते बदलून जिनियस झाले. तसेच त्याच्या कवर वर दिसनारा फोटोही बदलला. पूर्वी गाय चे चित्र या बिस्कीटच्या कवर वर असायचे. परंतु नंतरच्या दशकात गायची जागा या गोंडस चिमुरडीचे घेतली. कंपनीची ही जाहिरात करण्याचे धोरण होते. 

  

  

 त्याच्या रॅपरचा रंग सुरवातीपासुन पांढरा आणि पिवळा आहे. पण या छोट्या चिमुरडीवरून बरीच चर्चा रंगली होती. नीरू देशपांडे, सुधा मुर्ती (आयटी उद्योगपती नारायण मुर्ती यांची पत्नी), आणि गुंजन गंडानिया या तिनं महीला या बिस्कीटावरच्या कवर वर असनारी मुलगी असण्याचा दावा करत आहेत. पण, त्या नीरू देशपांडे आहेत असे मानले जाते. नीरूच्या या फोटोमागची कहाणी अशी आहे की, जेव्हा त्या साडेचार वर्षीच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी हा फोटो घेतला होता. ते व्यवसायीक छायाचित्रकार नव्हते. परंतु ज्यांनी हा फोटो बघितला त्यांना हा फोटो खुप आवडला. हा फोटो अशा माणसाने पाहीला जो पार्ले वाल्यांचा ओळखीचा होता. अशा प्रकारे त्यांना पार्लेच्या पॅकेटवर झळकण्याची संधी मिळाली. मात्र आता नीरू ६३ वर्षांच्या झाल्या आहेत. 

       पण अजुनही त्या पार्लेजीच्या पॅकेटवर दिसनारी छोटीशी चिमुरडी कोण आहे. त्या पॅकेटवर दिसणाऱ्या मुलगीच नाव नीरू देशपांडे असल्याचे सांगीतले जाते. परंतु हे ही सांगितले जाते हा फोटो सुधा मूर्तींचा आहे .

सुधा मुर्ती ह्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांचा पत्नी आहेत. पण हेही सत्य आहे की, नीरूंचा फोटो शोधूनही सापडत नाही कारण सुधांचा फोटो सर्वत्र आहे. ह्या सगळ्या अफवा आहेत असही म्हणाले जाते पार्ले कंपनी चे प्रोडक्ट मॅनेजर मयंक जैन यांच म्हणने आहे की हा फोटो कुठल्याही मुलीचा फोटो नाही तर एक कल्पनाकेलेले चित्र आहे. हे ६० च्या दशकात मगनलाल दहीया नावाच्या कलाकाराने तयार केले आहे.

               

Thursday, June 11, 2020

मुंबईची गाॅडमदर - हसीना पारकर



२०१७ मध्ये निर्देशक अपूर्वा लाखीया यांची फिल्म ‘हसीना पारकर’ रीलीज झाली होती. ही फिल्म भारतामधील मोस्ट वाॅन्टेड अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम ची बहीन हसीना पारकर च्या जीवनावर आधारीत आहे. हसीना पारकर हे नाव आहे जे १९९१ च्या नंतर मुंबईमध्ये दहशदीचे दुसरे नाव होते. हसीना पारकर म्हणजे दाऊद इब्राहीम ची बहीन आणि इब्राहिम इस्माईल पारकर यांची पत्नी, पण हसीना या दोघांच्या व्यतिरीक्त बरेच काही होती. हसीनाला मुंबईची गाॅडमदर म्हणून ओळखले जात होते. 

कशी बनली गाॅडमदर 

अंडरवर्ल्ड ची रिपोर्टिंग करत असलेले हुसैन जैदी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ‘माफीया क्वीन्स ॲाफ मुंबई’ या पुस्तकामध्ये हसीना पारकरचे काही खुलासे केले आहेत. दाऊद ची बहीन हसीना मुंबईची रानी होती. काही जाग्यांवरती तिची दहशत होती. 

पतीच्या खुन्या नंतर बनली डाॅन

   

हसीनाचे नाव नागपाडा ची गाॅडमदर १९९१ सालानंतर पडले. याच्या पहिले हसीनाचे आणि अंडरवर्ल्ड चे काहीही संबंध नव्हते. १९९१ मध्ये त्यांच्या पती इब्राहिम पारकर यांचा खुन झाला. जुलै १९९१ मध्ये अरून गवळी ने त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दाऊच्या बहीणीचा नवरा म्हणजे हसीनाचे पती इब्राहिम ला मारले. नंतर दाऊद ने या खुनाचा बदला घेण्यासाठी जेजे हाॅस्पिटल मध्ये शुटआऊट केले होते. या सगळ्या प्रकरणानंतर हसीना ने अंडरवर्ल्ड च्या दुनियेत पाय ठेवला. 

मनपसंत घर

 हसीनाने स्वतःचा आशीयाना बनवला. मुंबईच्या नागपाडा इलाक्यामधले गार्डन हाॅल नावाच्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाली. अस बोलेजाते की हसीनाला हे घर इतके आवडले की त्यांनी घराचे कुलूप तोडून ती त्या घरमध्ये राहायला गेली आणि ते घर स्वतःच्या नावावर करून घेतले. या वरती कोणी तक्रार नाही केली. 

विधवा झाल्यानंतर बनवली गैंग

 दाऊद च्या बहीन-भावामध्ये हसीना सातव्या नंबरची होती. गार्डन हाॅल च्या इमारत च्या शानदार फ्लाट मध्ये राहत असलेली हसीनाच दाऊद च्या संपुर्ण संपत्तीची देखरेख करत होती. तिन मुलांची आई हसीना च्या नावावर करोडोची प्रोपर्टी आहे. अंडरवर्ल्ड मध्ये गैंगवाॅर ची सुरवात हसीनाचे विधवा होने हेच कारन आहे. दाऊद ने हसीनाच्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अरून गवळी च्या शुटर चा खुन केला. यानंतर या दोघांच्यात मारामारीझाली आणि या मारामारीत खुप लोक जखमी झाले. काही लोक मरन पावले. 

दहशीदीचे दुसरे नाव होते हसीना पारकर

 

आतापर्यंत च्या रिपोर्ट नुसार हसीना खुप बेकायदेशीर कामामध्ये तिचा हात होता. याच्या सोबत तिच्या आसपासच्या लोकांसाठी गाॅडमदर पेक्षा जास्त होती ती. एक लोकल दुकानदाराच्या हिशोबाने हसीना आपा ने त्यांची मदत केली त्यांची पळून गेलेली बहीन हसीनाने परत आणली. हे काम करण्यासाठी हसीनाने स्वतःहून फोन केला होता. हसीनाचे नाव झोपड पट्टीतले धंदे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये वसुली आणि विदेशामध्ये रिलीज साठी मोलभाव करणे, हवाला रॉकेट,केबल ॲापरेटर चा धंदा या सगळ्या कामासाठी ती प्रसिध्द होती. या सगळ्याच्या व्यतरीक्त आजपर्यंत फक्त एकच एफआयआर तिच्या विरोधात लिहीली गेली आहे. 

दाऊदचे सुध्दा ऐकले नाही

 

पोलीस रेकाॅर्ड च्या हिशोबाने हसीना तिच्या भावाची ५४ बेमानी प्रोपर्टीची देखभाल करत होती. नागपाडामध्ये ६ हाॅटेल, पीर खान रोड ला गुड लक लाॅज. बोल्ले जाते की हसीनाची नजर स्लम रीडवलपमेंट अथाॅरीटी (SRA) च्या प्रोजेक्ट वर होती. या गोष्टीसाठी हसीनावर तक्रार नोंदवली होती. दाऊद ने याच्यासाठी हसीनाला मना केले होते. पण हसीनाने ऐकले नाही. हसीना प्रोपर्टीचे मसले पण सोडवायला लागली. याच्या साठी ती भरपुर कमिशन पण घेत होती.

                             

हुसैन जैदी ने घेतलेल्या इंटरव्यू मध्ये हसीना बोलत होती तिचा भाऊ चूकीचा आहे पण एवढा पण नाही जेवढे त्याला लोकांनी बनवले आहे. हसीनाच्या हिशोबाने दाऊदच्या विरोधात खुप चूकीच्या केसेस लावल्या गेल्या आहेत. हसीना पारकर एक दबंग महीला होती. गैंग ला चालवनारी. लाखो लोकांची गाॅडमदर होती. हसीना पारकर चा मृत्यु २०१४ मध्ये ह्रदय झटक्याने झाला. आणि त्यांच्या अंतीम यात्रामध्ये ५ हजार पेक्षा जास्त लोक आले होते.

Wednesday, May 20, 2020

तारक मेहता का उल्टा चश्मा


 तारक मेहता का उल्टा चश्मा म्हटले की आपल्याला sub tv वरची मालीका आठवते. ती मालीका आपल्याला इतकी आवडते की अस वाटत त्यामधले सगळी पात्र आपल्या आसपास आहेत. ती मालीका २००८ मध्ये sub tv वर सुरू झाली. त्या मालीकेने खुप कमी वेळात प्रेक्षकांचे मन जिंकले. ती मालीका १२ वर्ष झाली अजुन पण चालू आहे. आज आपण या मालीकेवर एवढ बोलतोय याच कारण, की तारक मेहता का उल्टा चश्मा मधले real मेहता ते आपल्याला माहीतच नाहीत. तारक मेहता हे कोण होते. ते काय करत होते. ते आपण पाहणार आहोत.

तारक जानूबाई मेहता हे भारतीय स्तंभलेखक, विनोदी, लेखक आणि सर्वोत्तम नाटककार म्हणून प्रसिध्द होते. ते अनेक विनोदाचे गुजराती भाषांतर केले, आणि रूपांतर केले. ते गुजराती नाट्यसृष्टीतील एक प्रसिध्द व्यक्तिरेखा होते. तारक मेहता गुजरात मधील अहमदाबादमध्ये जन्मले आणि जैन कुटूंबात वाढले आहेत. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ मध्ये झाला.

मार्च १९७१ मध्ये चित्रलेखनामध्ये हास्यास्तद साप्ताहिक स्तंभ प्रथम प्रकाशित झाला आणि तेव्हापासून समकालीन विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्यांनी ८० पुस्तके प्रकाशीत केली, तिन पुस्तक त्यांनी दिव्य भास्कर या गुजराती वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभावर आधारीत आहेत तर उर्वरीत तारक मेहता का उल्टा चेश्मा कथा संग्रहित केली आहे.
वैयक्तिक जीवन

                  
तारक मेहता गुजराती जैन समुदयाचे होते. ते गुजरात मध्ये अहमदाबाद येथे वास्तव करीत होते, जेथे ते २००० पासुन दुसऱ्या पत्नी इंदूसह ३० वर्षा पेक्षा जास्त काळ ते तेथे राहिले. नंतर मनोहर दोशींशी लग्न करणारी त्यांची पहिली पत्नी इला(died 2006) त्यांच अपार्टमेंट मध्ये राहत होती. पहील्या लग्नापासुन त्यांना एक मुलगी आहे. इशानी ती अमेरीकेत राहते. आणि तिला दोन मुले आहेत कुशल आणि शौली.
पुरस्कार

                    
२०१५ मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुजरात साहित्य अकादमीने २०११ मध्ये त्यांना साहित्य गौरव पुरस्कार आणि २०१७ मध्ये रमनलाल नीलकंठ हस्या पारितोषिक प्रदान केले.
ग्रंथसंग्रह

१. दुनिया ने ओंधा चश्मा

२. आ दुनिया पंजारापोले

३. ॲक्शन रीप्ले

४. अल्बेलून अमेरिका व्हॅंथेलून अमेरिका

५. चंपकलाल तापुनी जुगलबंदी

६. बेताज बटाली बाज पोपटलाल ताराज

७. तारक मेहता का उल्टा चश्मा
मृत्यु
                          
तारक जनुभाई मेहता यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी १ मार्च २०१७ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटूंबीयांनी त्यांचे शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दान केले होते.

Saturday, May 16, 2020

टिकटाॅक vs युट्युब :- कॅरीमिनाटी

इंटरनेट ही मजा करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आणि एखाद्या गोष्टींची पटकन माहिती मिळवण्याचे साधन आहे. परंतु इंटरनेट च्या जगावर बऱ्याच मारामारी देखील होतात. बरेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहेत आणि बरेच लोक या प्लॅटफॉर्मवर त्यांच content पोस्ट करून नशीब बनवण्याचा प्रयत्न करतात परंतु केवळ काही लोकांना प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक मिळते. असेच ते हळू हळू इंटरनेटच्या दुनयेत नाव कमवतात. आणि ते स्वतः एक ब्रॅंड तयार होतात.

आपण आज अश्या मुलाबद्दल बोलनार आहोत जो स्वतः एक इंटरनेटच्या दुनियेचा ब्रॅंड आहे. त्याचे video बघून मोठमोठ्या लोकांची पायाखालची जमिन सरकते. त्या मुलाच नाव आहे. अजय नागर . काहींनी नावावरून ओळखले असेलच.

                                  

अजय नागर, व्यावसायीक रित्या कॅरीमिनाटी म्हणून ओळखले जाते, एक भारतीय काॅमिडीयन, गेमर, रेपर आणि युट्यूबचे व्यक्तीमत्व आहे. तो भारतातील सर्वात लोकप्रिय युट्यूबर्सपैकी एक आहे. आणि कॅरीमिनाटी आणि कॅरीसलाइव्ह हे त्याचे युट्यूब channels आहेत. त्याच्या व्हिडीओंमध्ये मुख्यतः गेमप्ले आणि पॅरोड, काॅमेडी आणि व्हायरल व्हीडीओ आहेत

कॅरीमिनाटी १० वर्षाचा असल्यापासुन युट्यूब व्हिडीओ पोस्ट करण्यास सूरवात केली. त्याने व्हिडीओ गेम्स व त्याच्याव्दारे सादर केलेल्या सनी देओलची नक्कल करणारे व्हिडीओ पोस्ट केले. त्याचे मुळ युट्यूब channel कॅरीमिनाटी हे २०१४ मध्ये सुरू झाले. आणि दुसरे कॅरीसलाइव्ह हे युट्युब channel त्याने २०१७ मध्ये गेमिंग साठी सुरू केले. सध्या कॅरीमिनीटी या चॅनेलवर 1.04B इतके views आहेत आणि त्याचे 12.2 M subscribers आहेत. दुसऱ्या चॅनेलवर 4.28M subscribers आहेत. त्याच्या आकडेवारीनुसार आणि प्रेक्षकांच्या प्रभावानुसार तो भारतातील सर्वात मोठा You Tuber आहे.
                                  
सध्या, युट्यूब आणि टिकटाॅकर्स आणि त्यांच्या content निर्माते यांच्यात अनुक्रमे इंटरनेटवर मोठी लढाई चालू आहे.

युट्यूबला सुमारे दशकांहून अधिक काळ लोटला आहे, तर काही वर्षांपूर्वी टिकटोक ने प्रवेश केला.आणि बघतां बघतां टिकटोक ची लोकप्रीयता खूप उच्च दराने वाढली. हे दोन्ही प्लॅटफॉर्म एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत परंतु आजकाल या प्लॅटफॉर्मचे वापरकरते तोंडी युध्दामध्ये व्यस्थ आहेत. आणि एकमेकांना रोस्ट करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

युट्युब VS टीकटॅाक

मागिल काही आठवड्यांपासून युट्युब आणि टिकटॅाक यांच्यात व्हर्चुअल युध्द चालू आहे ते भारतातील सर्वात लोकप्रिय व्यासपिठ आहे. हा विषय गेल्या २ वर्षापासून चर्चेचा विषय आहे. बऱ्याच लोकांना टिकटॅाकर्स बहुतेक आवढत नाहीत. कारण ते content च्या नावाखाली कसलेपण फालतु व्हिडीओ पोस्ट करतात. आणि लोक त्या content ला चांगले बोलतात.
                                   
टीकटाॅक वरून ही बाब उधळली गेली की, अमिर सिध्दिकी याने IGTV व्हिडिओ पोस्ट केला जेथे त्याने या परिस्थिती बद्दल सांगितले आहे. काही सत्य शेअर केली त्यामुळे त्याच्या व्हिडीओमुळे काही प्रसिद्ध युट्युबर्स रोस्ट झाले. मग काही प्रेक्षकांनी युट्युबर्स कडून प्रतीउत्तराची मागनी केली. बऱ्याच युट्युबर्सनी या विषयावर Angry prash, saiman says इत्यादींसारखा युट्यबर्स ने व्हीडीओ बनविले पण कॅरीने यांवर एक व्हिडीओ बनवावा अशी लोकांची इच्छा होती. लोकांच्या विनंती वरून कॅरीने एक व्हिडिओ बनवला TikTok vr you tube आणि पोस्ट केला.

१२.३७ सेकंदाचा व्हिडीओ त्वरित व्हायरल झाला आणि त्या व्हीडीओ ने कॅरीच्या चॅनेलचे आत्तपर्यंतचे viewes चे रेकाॅर्ड तोडून टाकले. त्याच्या चॅनेल चे subscribers ची संख्या वाढली.

Thursday, May 14, 2020

एक असा माणूस जो स्वतःच्या पैशाने दुसऱ्यांच्या घरची नळ ठिक करतो


                                                  
 आपण कीती पाणी वाचवतो दिवसात? आणि किती वाया घालवतो? हे आपल्याला कळत नाही. आपण लहानपणापासुन ऐकत आलोय की पाणी वाचवा पाणी जिरवा. पण हा नारा कितीजण अंमलात आणतात कोणास ठावूक. आपण नेत्यांची भाषण ऐकतो की पाणी जमवण्यासाठी आम्ही हे करू ते करू …. पण सत्य काय आहे निवडून आल्या नंतर दुष्काळ भाग हा दुष्काळच राहतो. तिथले लोक दरवर्षी पाण्यासाठी झगडतात. दरवर्षी तिच परिस्थिती राहते…. असो. मला एवढच म्हणायच आहे की थोडंसं आपण घरामधे पाणी वाचवले तर खुप पाणी वाचेल ते नंतर आपल्यालाच उपयोगी येईल.

मी पाण्याबद्दल एवढ बोलते कारण एक अशी व्यक्ती आहे की या जगामध्ये की तिने एक वेगळा मार्ग शोधला. त्यांच नाव आहे आबिद सुरती. राष्ट्रीय पारितोषिक विजेता लेखक सुप्रसिध्द चित्रकार, नाटककार, कार्टूनिष्ट. खर तर एवढी ओळख पुरेशी आहे, किंबहुना जास्तच आहे.निवरूत्ती नंतरच आयुष्य आठवणी काढत जगायला. पण आबिद सुरती हे स्वस्थ बसणारे नव्हते. खरतर आपल्याकडे कोणीच स्वस्थ बसत नाही. नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करत बसणं हाच उद्योग बऱ्याच लोकांचा पण स्वस्थ न बसणारा प्रत्येक माणूस अस्वस्थ असतो असही नाही. आबिद सुरती मात्र अस्वस्थ होते.तिथल्या बेसिन च्या नळाची टपटप त्यांना अस्वस्थ करायची. समाजसुधारण्याच्या गप्पा करणारे लोक साधा घरातला नळ दुरूस्त करत नाहीत ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. म्हणून ते उपदेश करत बसले नाहीत.
                                    
ऐका सकाळी प्लंबर ला घेऊन ते निघाले नळ दुरूस्तीच्या मोहीमेला आणि त्या दिवसा पासून आबिद सुरती गेले कित्येक वर्ष दर रविवारी हे काम ते स्वखर्चाने करतात. रस्त्याच्याकडेला अतिशय गरीबीत बालपण गेलेले आबिद सुरती पाण्याचे महत्व जाणून होते. तासंनतास आई हांडाभर पाण्यासाठी कशी रांगेत उभी राहायची हे त्यांनी बघीतल होत. म्हणून पाण्याचा थेंब जरी वाया गेला तरी ते अस्वस्थ होतात. पण आज पाणी टंचाई आहे म्हणून सगळे अश्रु गाळत बसले तसं त्यांनी केलं नाही. लोक जमवून भाषण देत बसले नाहीत. Drop dead foundation ही त्याची संस्था म्हणजे one man army आहे.

दर रविवारी एक प्लंबर आणि एक साहाय्यक स्त्री घेऊन ते नवनविन घरांमध्ये जातात. लोकांच्या परवांगीने त्यांच्या घराचे नळ दुरूस्त आहेत का ते तपासतात. लिकेज असेल तर त्वरित बंद करून दिल जात. आणि ते ही पुर्णपने मोफत. आश्या प्रकारे आबिद सुरती या एका माणसाने आजवर लाखो लिटर पाणी वाचवलय. आणि ते ही एकट्याच्या बळावर आणि स्वखर्चाने. ही खुप मोठी जलक्रांती आहे. पाण्याचे वाया जानारे थेंब ही दुःखी माणसाचे आश्रू पुसने एवढच महत्त्वाचे काम आहे. आबिद सुरती यांच्या कार्याला सलाम. शाहरूख खान च्या शब्दातच सांगायच झालं आबिद सुरती हे देवदूत आहेत.
 
ते असे का करतात?
           
 “ कारण आमच्या कुटूंब सर्वकाही गमावल होत. आज या उत्कट मानसाच्या आत्म्यात आणि इच्छाशक्तिला कधीही रोखले नाही, ज्यांचा भूतकाळ त्याने हाती घेतलेल्या अविश्वसनीय सेवेमध्ये मोठा वाटा आहे. Drop dead सोबतचा प्रवास त्यांचा कसा सुरू झाला. त्याचा विचार आणि ॲबिड आपल्याला सांगते..... तो बालपणाचा आघात होता. पाण्याच्या प्रत्येक  थेंबासाठी लढा होता, आम्हाला प्रत्येक बाल्टीसाठी संर्घष करावा लागला. आणि तो वारसा माझ्याकडेच राहिला. एकदा मी एका मित्र आणि मी एका ठिकाणी गेलो तेव्हा मला नळ गळताना दिसला, ते पाहून खुप दुःख झाले.” 
 तो गळत असलेला नळ त्याला खुप त्रास देत होता, तेव्हापासुन आबिद थांबत नाहीत. Drop dead foundation च्या अस्तित्वाच्या पहील्या वर्षात, मीरा रोड वरील १६६६ घरांना त्यांनी भेट दिली. ४१४ नळ ठिक करून त्यांनी ४.१४ लाख लिटर पाण्याची बचत केली.
आबिद सुरती ते त्यांच्या प्रतिक्रिया सांगतात की, “ गावा गावातून मला पत्र मिळाले की आमच्या गावामध्ये चालू करतोय. एकदा मी वर्तमान पत्रात वाचले की आपल्या दरवाज्याची घंटी कोण वाजवत असेल आणि तुम्ही दरवाजा उघडता, आणि तुमच्या समोर विलन उभा असेल तर तुम्ही घाबरू नका. तो तुमची सेवा करण्यासाठी घरचे नळ ठीक करण्यासाठी आला आहे. की पाणी वाया जावू नये म्हणून. पहिला माझ्या घराजवळ पक्ष्यांचा मोठाच्या मोठा थवा यायचा पण आता एक पक्षी कधीतर दिसतो. आपण त्याच्याविषयी विचार केला पाहीजे त्याच्यावर काम केलं पाहीजे. काही लोक करत आहेत. एक पाण्याचा ठेंब वाया जातेय तर एका महिण्यात एक हजार लिटर पाणी गटारीत वाहून जातय. तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय, की पाणी वाचवन पाणि वाया घालवून न देणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.”

Tuesday, May 12, 2020

स्थापत्य अभियांत्रिकी

 स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी अभियांत्रीकी शाखा आहे. यांत नागरी आयोजन, बांधकाम, आणि बांधलेल्या इमारतीचे अनुरक्षण व इतर सामाजीक प्राधिकरण संबंधित क्षेत्रे येतात. पृथ्वी, जल, किंवा संस्कृती आणि त्यांच्या क्रिया यांच्या संबंधित असलेल्यानेच इंग्रजीत याला ‘सिव्हील’ म्हटले जाते. आजच्या याच्या क्षेत्रात पाणीपुरवठा मलनिःस्सारण, पूर व्यवस्थापन आणि वाहतूक याचा ही अंतर्भाव होतो. थोडक्यात स्थापत्य अभियांत्रिकी असे क्षेत्र आहे की जे आपल्या विश्वाला, राहत्या जागेला अधिक सुखकर बनवण्यास मदत करते.


स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास

स्थापत्य अभियांत्रिकी हे भौतिकशास्त्रातिल नियंमांचे उपयोजन असुन याचा इतिहास भौतिकशास्त्र आणि गणिताच्या सखोल अध्यायानाशी संबंध दाखवतो. स्थापत्य अभियांत्रिकी हा भव्य व्यवसाय असल्यामुळे या शाखेचा इतिहास संरचनात्मक, अभियांत्रीकी, पदार्थविज्ञान, भुगोल, भूगर्भशात्र, मृदा यांत्रिकी, जल, विज्ञान, पर्यावरण, उपयोजित यंत्रशात्र संबंधित आहे.


पुराणकाळापासून रचना आणि बांधकामाचे बहुतेक कार्य हे शिल्पकार आणि सुतार यांच्यासारख्या कारागिरांनी केले. उत्तरोत्तर काळात चतुर बांधकाम कारागिराची गरज वाढत गेली. बांधकामासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान हे अश्या कारागीरांच्या संघटनेत जतन केले जात असे. इमारती, रस्ते आणि इतर बांधकाम हे पुन्हा पुन्हा त्यांच पद्धतींनी बांधले जात होते. आणि त्याची मागणी खूप जास्त प्रमानात वाढत होती.

भौतिकशास्त्र्यातील आणि गणितातील उदाहरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये वापर करून घेण्याचे पुरातन उदाहरण म्हणजे आर्किमिडीजच्या सिध्दांताचा, ज्यामुळे आपण उल्हासित वृत्ती समजून घेऊ शकतो तसेच काही समस्यांच्या व्यावहारीक निवारणांचा समावेश होतो. ब्रम्हगुप्त या भारतीय गणितज्ञाने सातव्या शतकात उत्खननाच्या परिनामाच्या आकडेमोडीसाठी हिंदू-अरेबिक अंकावर अवलंबून असणाऱ्या अंकगणिताचा वापर केला होता.

Sunday, May 10, 2020

विलिस टाॅवर

विलिस टाॅवर ही अमेरीकेच्या शिकागो शहरातील गगनचूंबी इमारत आहे. विलिस टाॅवर अमेरीकेतील सर्वात उंच इमारत आहे. ह्या इमारतचे बांधकाम १९७४ साली पूर्ण झाले व तेव्हापासून १९८८ पर्यंत विलिस टाॅवर जगातील सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीत १०८ मजले आहेत व एकूण उंची ४४२ मीटर आहे. जेव्हा ही इमारत बांधली गेली त्यावेळी ही जगातील सर्वात उंच इमारत होती. या इमारतीचे पूर्वीचे नाव ‘सिअर्स टाॅवर’ असे होते. पण २००३ मध्ये ‘सिअर्स, रिबक &कं.’ चे ‘सिअर्स’ नावाचे अधिकार संपले पण नविन नाव काही लागले नाही. मार्च  २००९ मध्ये ‘विलिस ग्रुप होल्डिंग ली.’ या लंडनमधील कंपनीने यांचे अधिकार घेतले आणि दि. १६ जुलै २००९ रोजी सकाळी १० वाजता याचे नाव ‘विलिस टाॅवर’असे अधिकृत रित्या बदलले. जगातील असंख्य ‘सिअर्स टाॅवर’ च्या चाहत्यांसाठी हा एक धक्का होता.

इतिहास

‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ ही कंपनी इ.स. १९६० साली जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी होती. त्यांची अनेक ॲाफिसे शिकागो शहरामध्ये पसरलेली असुन त्यात त्याकाळी ३,५०,००० लोक काम करत असत. ‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ च्या उच्च अधिकाऱ्यांनी आपले सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी कामास बसतील, अश्या वास्तुरचनेवर विचार करण्यास आरंभ केला. या कल्पनेतुन पुढची पावले टाकले गेली या इमारतीचे चित्र तयार झाले.
                                                                                              
कंपनीचा भविष्यकालीन विस्तार लक्षात घेता साधारण ३० लाख चौरस फूट एवढी जागा लागेल असा अंदाज करून विचार चालू झाला. भविष्यकालीन विस्तार होईपर्यंत मोकळी असलेली जागा छोट्या व्यावसायीकांना देण्याचा विचार झाला. त्यांना ती जागा परवडायला हवी असेल तर जागा लहान हवी. जागा लहान पण खिडक्या आणि बाहेरचे दृश्य मात्र चांगले दिसायला हवे, यासाठी प्रत्येक मजल्यावर कमी क्षेत्रफळाची पण जास्त उंच अशी इमारत बनवण्याची कल्पना पुढे आली. ९ मोठ्या नळ्या एकत्र करून जशी भौमितीक आकृती, तसे एक चित्र तयार झाले. सर्वात खाली ५५००० चौरस फूट आणि हळूहळू वरती कमी होत जाणारे क्षेत्रफळ असे चित्र करताना ही इमारत १०० मजल्याहून अधिक उंच होणारं अस लक्षात आले.
                                                                                   
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या नियमाचे पालन करत इ.स. १९६९ साली यांचे काम सुरू झाले आणि मे इ.स. १९७३ ला पुर्ण झाले. त्याकाळी या इमारतीला १५ कोटी अमेरीकन डाॅलर खर्च आला होता. हा सर्व खर्च ‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ ने उचलला होता. इ.स. १९८२ साली २ ॲंटेना तेथे बसवण्यात आले त्यामुळे त्याची उंची १७०७ फूट झाली. दूरचित्रवाणी प्रसारण चांगले होण्यासीठी नंतर तिथे एक ॲंटीना अवाढविल्यानंतर ती १७३० फूट अर्थात ५२७ मीटर झाली.

पर्यटन सुविधा

या इमारतींचा १३५३ फूट उंचीवर असलेला १०३ वा मजला सार्वजनिक रित्या खुला असुन तिथे पर्यटकांना नेण्यासाठी २६ फूट प्रतिसेकंद या वेगाने चालणारी लिफ्ट आहे. या मजल्यावरून भोवतालचे विहंगम दृश्य न्याहाळण्यास ‘द स्काय डेक’ नावाने ओळखली जाणारी गच्ची आहे. आकाश स्वच्छ असेल, तर या गच्चीवरून शिकागो शहर व परीसरातला ५० मैल एवढ्या अंतरापर्यंतचा प्रदेश पाहता येतो. ईल्लिनोइस, इंडियाना, मिशिगन आणि विस्काॅन्सिन या ४ राज्यांतील बराचसा प्रदेश नजरेच्या टप्यात येतो.

                                            
या गच्चीवर पर्यटकांना उंचीवरील थरार अनुभवण्यासाठी संपूर्णतः काचेची बाल्कन्या बांधल्या आहेत. जानेवारी २००९ मध्ये यांचे काम चालू झाले. सुमारे ४ फूट बाहेर काढलेल्या या ३ बाल्कन्या संपुर्णपणे काचेच्या बनवल्या आहेत. प्रत्येक बाल्कनीत ५ टन वजन घेण्याची क्षमता आहे. २ जुलै २००९ रोजी या बाल्कन्या सार्वजनिक वापरासाठी खुल्या करण्यात आल्या.