Thursday, April 30, 2020

भितीदायक सत्य घटना


भयानक घटना म्हणटले की आपल्याला भिती वाटायला लागते. पण काही घटना सत्य ही असतात,आणि काही काल्पनिक ही असतात. जे आपण TV मलिका आणि सिनेमांमधून बघतो ते सर्व काल्पनिक असते. आपल्या अजुबाजूला भितीदायक घटना घडत असतात त्या ऐकुन आपल्याला विश्वास होवू लागतो, की भूतं, जादूटोणा वगैरे आहे. आज आपण आश्याच दोन सत्य घडलेल्या घटना पाहणार आहोत.

१. डीसुजा चाळ
                   
डीसुजा चाळ ही मुंबईच्या माहीम येथे आहे. ही चाळ खुप मोठी असुन त्या चाळींमध्ये एक विहीर आहे. अस सांगतात की २० वर्षा पुर्वी या विहीरीला कोणतीही कडा नव्हती. एकदा चाळीत राहनारी एक महिला पाणी घेण्यासाठी त्या विहीरीकडे गेली असताना, त्या विहीरीला कडा नसल्याने तीचा पाय घसरून ती विहीरीत पडली. ती स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती. तीची हाक कोणालाही ऐकु आली नाही. ती त्या विहीरी मध्ये बुडून मरन पावली. या घटनेला २० वर्ष झाली तरीही त्या विहीरी कडे जाण्यास लोक घाबरतात. त्या विहीरी भोवती तिची आत्मा फिरत असते असे तिथे राहणारी लोक सांगतात.
तिथे त्या विहीरीचा मालक दर आमावश्याला पुजा करतात. बऱ्याच लोकांनी एका महीलेची आकृती पाहिली ती नंतर अदृश्य होते. त्या आत्माने तिथे राहणाऱ्या लोकांना हाणी पोहचवली नाही. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. पण लोकांना बहुतेकदा सल्ला दिला जातो, की एकट्याने तिथे जाऊ नका. या चाळीत आणखी एक आत्मा आहे ती म्हणजे एका रक्षकाची असुन बहुतेकदा एका झाडाच्या जवळपास दिसते. तो रात्री येत असल्याचे दिसुन येत आहे. आणि काही लोक त्याला चाळीचे रक्षण करताना बघतात.

२. टाॅवर ॲाफ सायलेन्स

टाॅवर ॲाफ सायलेन्स हे नाव ऐकण्याईतकेच भीतीदायक आणि शांत आहे. दिवस रात्र इथे शांतता असते. आणि ही शांतता प्राणघातक आहे. याला शांततेचे क्षेत्र मानले जाते. हा जगातील सर्वात भयानक भाग मानला जातो. हे अश्या प्रकारचे एकमेव क्षेत्र आहे जेथे भितीदायक प्रवास केवळ पृथ्वीच्या अनुभवापुरते मर्यादित नाही तर त्या पेक्षा बरच काही आहे. दिवसा आपल्याला येथे एकापेक्षा जास्त भितीदायक दृश्य पाहायला मिळेल. इथली दृश्य भीतीदायक तसेच भिन्न आहेत.

इथल्या दृश्यांमध्ये लपलेल्या भीतीचे एक मोठे कारण आहे. आणि त्याचे कारण धार्मिक विधी आहे, ज्यामुळे येथे येणे म्हणजे वाईट गोष्टी स्वतःवर ओढावून घेतल्यासारखे होते. मुंबईच्या मलबार हिल भागांत स्थित टाॅवर ॲाफ सायलेन्स प्रत्यक्षात पारशी स्मशानभूमी आहे. इथल्या पारशी समाजातील लोक त्यांच्या मेलेल्यांचे अंतिम संस्कार करतात. त्यांच्या मध्ये मेलेल्या मानसाला जाळले किंवा पुरले जात नाही. ते मेलेल्या मानसाचे शरीर तिथे स्मशानभुमित सोडुन येतात. प्राण्याना खाण्यासाठी. गिधाडे आणि गरूड ते शरीर खाउन टाकतात.
विकृत शरीर, मानवी सांगाडे, शरीरातून देहाचे मांस पाहून आपले रक्त गोठेल. दिवसात ज्या ठिकाणी असे घडते, त्या ठिकाणी रात्री काय देखावे असतील. येथील स्थानिकांमध्ये प्रचंड भिती आहे. इथे जरी एखाद्याने दिवसा जाण्याची चूक केली तर रात्रीच्या वेळी कोणीही इथे जाण्याची हिम्मत करत नाही.

येथे एक मुलगी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसते. जे रात्रीच्या वेळी त्या रस्त्यातून येनाऱ्या जाणाऱ्यांना लिफ्ट मागत असते. या व्यतिरिक्त या ठिकाणी कार अपघातात ठार झालेल्या पारशी कुटूंबातील व्यक्तीनी त्या मुलीला पाहिले असल्याचा दावाही केला जात आहे.

तिथे बऱ्याचदा लोक येताना आणि जाताना दिसतात. ते गाडी खराब झाल्याच्या बहाण्याने लोक त्यांच्यकडे खेचतात आणि मदतीसाठी आवाहन करतात. या आत्म्यांनी इथून जाणाऱ्या काही लोकांचे नुकसान केले, त्यानंतर येथे अस सांगण्यात येते की तेथे जाणे धोक्याच ठरू शकत. आणि आजारपणाचे आव्हान आहे.

हे ऐकण्यासारखे किती आहे, आणि खरे किती आहे. काही लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण अज्ञान लोक घाबरतात

Wednesday, April 29, 2020

भारत आणि चीन


सध्याच्या काळात चीन मध्ये काही वेगळीच परिस्थिती आहे. चीन मध्येच नव्हे तर पुर्ण जगात कोरोना ने थैमान घातलाय. चीन मध्ये आताची बेताचा झाली आहे. त्यांनी केलेला करोनाचा सामना या सगळ्याबद्दल बोलले जात आहे.चीन ने हॅास्पिटल उभे केले ते ही फक्त ७ दिवसात आपल्या देश्यातील लोकं लवकर बरे व्हावे म्हणून. कित्येक रूग्णांचे जीव वाचवले.

ह्या बातम्या माहिती असतीलच, पण साधारण १९४० मध्ये भारतातल्या आणि खास म्हणजे महाराष्ट्रातल्या एका डाॅक्टरने चीनला जाऊन तिथल्या रूग्णांना बर केलं, त्यांची सेवा केली. हे कदाचित कोणाला माहीत नसावे.

चीनमधला कोणताही बडा नेतां भारतात आला की तो एका कुटूंबाशी हमखास भेटतो. मुंबईच्या कोटणीस कुटूंबाची. काही जणांची ज्यांच नाव ऐकल असेल अश्या डाॅ. व्दारकानाथ कोटणीस .

कोण होते डाॅ. कोटनीस, ज्यांना चीन मध्ये इतका मान दिला जातो.

दुसऱ्या महायुध्दावेळी चीन आणि जपान एकमेकांविरूध्द लढले होते. त्याचवेळी एका भारतीय डाॅक्टरांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चीनी सेनिकांचे प्राण वाचवले होते.

डाॅ. व्दारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांच नाव. जपान आणि चीनमधलं युध्द पेटल्यानंतर चीन चे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगच लागण झाली होती. त्या वेळी आपल्या इथे इंग्रज सरकार होत. चीन ने इंग्रज सरकारांकडून मदत मागितली होती. त्याचवेळी कोटणीसकरांना नुकतीच डाॅक्टर ची पदवी मिळाली होती. ते त्यांच्या गावी सोलापूरला जावून दवाखाना उभारणार होते. त्याचवेळी त्यांना इंग्रज सरकारच पत्र मिळाले की, चीन मध्ये तुम्हाला जाव लागणार आहे. ते घरच्यांची परवांगी घेण्यासाठी ते गावी गेले. घरच्यांनी चीन ला जाण्यास परवांगी दिली.

भारतीय वैद्यक मिशनंन एक टीम चीन ला पाठवली. त्या टीममध्ये डाॅ. कोटनीस हे एक होते. ते आपल काम अतिशय मन लावून करत असत. त्यांनी केलेल्या सेवेमुळे अनेक चीनी सैनिकांचे प्राण वाचले. युध्द भूमीवर प्लेगच भीषन लागन झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डाॅक्टर घाबरत असत.पण कोटनीस कधी घाबरले नाहीत. त्यांनी कीमान ८०० जणांवर उपचार केले असावेत. अस म्हणतात तिथल्या परीस्थितीमुळे त्यांच्या सोबत भारतातून आलेले डाॅक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्या समर्पण भावामुळेच त्याचा चीन मध्ये आदर केला जातो. वयाच्या यवघ्या ३२ व्या वर्षी १९४६ साली डाॅ. कोटनीस यांच अल्पशा आजारान निधन झालं.

“सैन्यानं एका चांगला सहकारी आणि देशान एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवन सदैव आपल्या मनांत  ठेवूया.” असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटनीसांना आदरांजली वाहताना काढले होते.

      
चीन मध्ये असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्किंगलन नावाच्या एका नर्सच्या प्रेमात पडले. २०१२ मध्ये त्यांच डालीयन या शहरात निधन झालं. त्यांना एक मुलगा होता. पण तो वैद्दकिय शिक्षण घेत असताना वयाच्या २४ वर्षीच त्याचा मृत्यु झाला.

डाॅ. कोटणीस यांच मुळ गाव सोलापूर. त्यांनी मुंबईच्या सेठ जी.एस. मेडिकल काॅलेजमध्ये वैद्दकीय शिक्षण घेतलं.

भारतात मात्र त्यांची फारशी आठवण कुणी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डाॅ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता.

चीनमध्ये आजही आदरणीय
चीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीननं त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट छापले आहे. हंबे या भागांत त्यांच स्मारक उभारण्यात आल आहे. या शतकातील चीनचे सर्वात जवळचे परदेशी मित्र अस सर्व्हेक्षन २००९ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आल होत. या यादीमध्ये डाॅ. कोटनीस यांचही नाव होतं. डाॅक्टरांचा आजही चीनमध्ये खुप आदर केला जातो अस चायना डेली या वृत्तपत्रात म्हटल आहे.

डाॅ. कोटनीस यांच्या लोकप्रियतेच कारण काय? १९५० सालापासुन आजपर्यंत त्यांच्या कुटूंबियांना चीनचे नेते का भेट देतात?

“१९६२ साली भारत आणि चीन चे संबंध बिघडले. पण कधीकाळी दोन्ही देशांनी परदेशी राजवटीविरूध्द आणि वसाहतवादाविरूध्द लढा दिला आहे. या भेटीमागे हा देखील समान धागा आहे.” अस चीनविषयक धोरणांचे अभ्यासक श्रीकांत कोंडापल्ली यांच म्हणणं आहे.
“भारत आणि चीन एकाच वेळी वसाहतवाद आणि साम्राज्यवादी लढत होते. कोटनीस कुटूंबीयांचि भेट धेऊन चीनी नेते दोन्ही देशांत असलेल्या एकतेच्या भावनेची पुन्हा आठवन करून देतात.” असही कोंडापल्ली म्हणतात.

१९४० साली म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या सात वर्ष आधी आणि चीनच्या क्रांतीनंतर सात वर्षांनी माओ यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहीले आणि सांगितलं, “चीनी आणि भारतीय लोकांचा उध्दार म्हणजे सर्व शोषितांचा उध्दार करणे आहे.

१९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी चॅंग काय शेक यांना एक पत्र लिहीले, पत्रात ते लिहीतात, “तुमच्याबद्दल आणि तुमच्या स्वतंत्र्य युध्दाबद्दल कायमच आस्था होती. हा संदर्भ आणि आपल्या संवादामुळे मला चीन च्या समस्या आणखी चांगल्या समजल्या.”

प्रा. कोंडापल्ली सांगतात, ते जेव्हा डाॅ कोटनीस यांना आदरांजली वाहतात तेव्हा भारत आणि चीनच्या सौहार्दापुर्व संबंधाची आठवन येते.

त्यानंतर आता जग फार बदललं आहे

चीन आणि जपान या जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारताचे दोघांशीही आर्थिक संबंध आहेत. भुतकाळातील काही बाबी आणि सीमाप्रश्नामुळे जपान आणि चीन यांचे संबंध कायम तानलेले असतात. भारत आणि चीन यांच्यातही सिमावाद आहे.

तरीही डाॅ. कोटणीस यांची आठवण आहेच.

Tuesday, April 28, 2020

छत्रपतींचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”

बहीर्जी नाईक

बहिर्जींकडे फक्त वेषांतरचीच कला होती असे नाही तर समोरच्याचा आपल्या शब्दांनी वेध घेऊन त्यांच्या नकळत सर्व माहिती काढून घेण्याचे कसब त्यांना पुरते अवगत होती.

अहो चक्क दिल्लीचा बादशाह आणि विजापुरचा आदिलशाह यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत.
  जराशीही शंका आली तरी समोरच्याला शत्रु पक्षाचा माणूस ठरवून देहदंड देणाऱ्या भेदक नजर कधीही बहिर्जींचा ठाव घेऊ शकली नाहीत यातच बहिर्जींचे असामान्य कर्तुत्व सामावलेले होते. शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी देखील अतिशय प्रमाणीकपणाने ते खाते चालवत असत. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता.  

    खोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकाऱ्यासह कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीत बहिर्जींना दिली होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेरखाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे. 
  बहिर्जीनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा विकसित केली होती. ही भाषा केवळ गुप्तहेर खात्यालाच कळे. त्यामुळे गुप्तहेर खात्याची माहिती बाहेर फुटली जात नसे. अगदी महत्त्वपूर्ण माहिती द्दायची असल्यास बहिर्जी स्वतःहून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस पडायचे नाहीत.
असे म्हटले जाते की बहिर्जी नाईक असा कोणी माणूस नाहीच, असे काही लोकांना वाटत असे. इतके बेमालूमपणे आणि अज्ञातवास असल्यासारखे ते वापरायचे. 
अनेकांना असे वाटत असेल की बहीर्जी नाईक हे फक्त गुप्तहेराचेच काम करायचे त्यात काय कर्तुत्व? तर अश्यांना सांगावेसे वाटते की,ते लढण्यात देखील तरबेज होते. पण तरीही गुप्तहेराचे काम म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे
शत्रुच्या गोटात असताना कधी कोणाला संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा. त्यमुळे बहिर्जी दांडपट्टा, तलवारबाज यांसारखी युध्द तंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्यांच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगांमधून एकट्याने शत्रुला धूळ चाखवत बाहेर पडायचे.

 अफझल खानाचा वध ही स्वराज्याच्या इतिहासातील मोठी घटना. त्यात बहीर्जींनी फार मोठी कामगीरीच बजावली होती

शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये दिली गेलेली उपाधी सर्वच दृष्टीने सार्थ ठरते 
महाराष्ट्रच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालूक्यामध्ये बाणूरगड नावाचा किल्ला आहे. कधी भेट दिली तर तुम्हाला या गुप्तहेराची समाधी आढळून येईल. तेव्हा न चुकतां या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करण्यास विसरू नका.

                                            Reference by, google.com,  times of Maharashtra, news paper 


Monday, April 27, 2020

छत्रपतींचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”

बहिर्जी नाईक

छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. ज्यांना कश्याचीही भीती नव्हती, जोवर आपला राजा बरोबर आहे तोवर आपण मोठी मजल मारू शकतो हे जणू त्यांनी मनावर बींबवून घेतलच होतं

या भावनेतून त्यांनी रचलेल्या शूर पराक्रमाच्या गाथांमधुन उभं राहील हिंदवी स्वराज्य!

हिंदवी स्वराज्याच्या अश्या मावळ्याला मागोवा घेताना इतिहास आपल्यासमोर अश्या एका अज्ञात शिलेदाराचे नाव उलघडतो ज्याच्या बद्दल सध्याच्या युगातील शिव आणि स्वराज्यप्रेमींना देखील फारशी माहिती नसावी.अर्थात त्यांच नाव बरेच जण ऐकून असतील पण त्यांचे कर्तुत्व मात्र अजुनही इतिहासाच्या पानांमध्येच कैद असल्याचे आढळते. 

शिवाजी महाराजांच्या या थोर मावळ्यांचा जिवनप्रवास आणि स्वराज्यनिर्मितीमधील त्याचे योगदान या संक्षिप्त लेखाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न!

हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहूरूपी आणि गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’ होय.


बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा ‘गुप्त’ आधारस्तंभ म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते सांभाळत असतं. या गुप्तहेर खात्याच्या साहाय्यशिवाय शत्रुप्रदेशामध्ये मोहीमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.

कारण शत्रु गोटातील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्ताची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींची कमकुवत स्थाने आणि युध्द प्रसंगी रामबान इलाज ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम गुप्तहेर खाते करत असे.

 म्हणजे एक प्रकारची विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यांवर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराजांच्या शूर शिलेदारांचे असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्त्व माहित असल्याने अगणित निधी ते या खात्यावर खर्च करीत असत.

महाराज्याच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल ३-४ हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि त्यांचे म्होरक्या होते बहिर्जी नाईक. त्यांच्याच माध्यमातून महाराजांनी आज इतिहासामध्ये प्रसिध्द असलेल्या सर्वच मोहीमा यशस्वी करून दाखवल्या.

तर अश्या या नेहमी पडद्याआड असणाऱ्या महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नाईक म्हणजे कणा होते.

महाराजांनी जेव्हा रायरेश्र्वरच्या मंदीरामध्ये स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःला वाहून घेण्याची शपथ घेतली तेव्हापासून महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बहिर्जी नाईक यांनी स्वराज्याची सेवा केली. बहिर्जी नाईक यांना लहानपणापासूनच बहुरूप्याची कला अवगत होती.
विविध वेषांतरे करून ते समोरच्याला पुरते अचंबित करून सोडायचे. पुढे पोटापाण्यासाठी त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहूरूपाची त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहूरूप्याची कला दाखवण्यास सूरवात केली.

तेव्हाच एका क्षणी महाराजांची आणि बहिर्जींची नजरानजर झाली आणि पहिल्याच नजरेत महाराजांनी हा व्यक्ती खेळ करण्यासाठी नव्हे तर शत्रुच्या गोट्यात राहून त्यांना खेळण्यासाठी जन्माला आली आहे.

हे ताडकन ओळखले आणि बहिर्जींना आपल्या सेनेत सामील करून घेतले. वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेष म्हणा बहिर्जी कोणाचीही अगदी उत्तम नक्कल करीत. एखाद्या व्यक्तीनं त्यांना एका वेशात पाहिले आणि नंतर अगदी काही मिनीटांत दुसऱ्या वेश्यात पाहिले तर त्याला ते किंचीतही ओळखतां आले नाही इतका जबरदस्त वेश ते पलटायचे.

To be continues next blog……….

 Reference by    google.com,  times of Maharashtra, news paper 
      

Sunday, April 26, 2020

शापित बाहुली एक सत्य घटना



शापित बाहूली ओकलट म्युझियम पोहोचणे

त्या घरीच त्या शापित बाहूलीपासून सुटका करण्यासाठी वाॅरेन दाम्पत्य फादर कुकबरोबर मिळून एक अभिमंत्रित क्रिया करतात आणि बाहुलीला आपल्याबरोबर घेऊन जातात. गाडीतून जाताना त्यांच्या लक्षात येते की, गाडीचे पाॅवर ब्रेक और स्टेरिंग काम करत नाहीत. ते बाहूलीवर पवित्र जल टाकतात, त्यामुळे ती शांत होते वाॅरेन दाम्पत्य सुखरूप घरी पोहोचतात. एक दोन दिवसात बाहुली परत पहिल्यासारखी करू लागते.
घराबाहेर जाताना हे दाम्पत्य त्या बाहूलीला ज्या ठिकाणी ठेवत असत, घरी आल्यावर ती बाहुली त्या जागेवर नसून भलत्याच ठिकाणी त्यांना मिळत असे. त्यांच दरम्यान एक घटना घडते.

 एकदा फादर जॅसन वाॅरेनला त्याच्या ॲाफिसमध्ये येतात आणि त्या बाहुलीला उचलून बोलतात की, ही तर फक्त एक बाहूली आहे आणि ही कोणाला नुकसान करू शकत नाही.

घरी जाताना त्यांचा मोठा अपघात होतो आणि ते जखमी होतात. त्यानंतर वाॅरेन त्या बाहूलीला एका अभिमंत्रित बाॅक्समध्ये टाकतात आणि आपल्या म्युझियममध्ये ठेवतात. त्या बाॅक्समधे ठेवल्यानंतर बाहुली कोणतीही हालचाल करायची नाही. पण त्यानंतर सुध्दा वाॅरेन त्या बाहुलीला अजुन एकाच्या मृत्यूचे कारण मानतात.

 एकदा एक तरूण आणि त्याची प्रेमिका वाॅरेन यांचे म्युझियम पाहण्यासाठी आले. ज्यावेळी वाॅरेन त्यांना या बाहुलीच गोष्ट सांगितली तेव्हा त्या तरूणाने या बाहुलीची खूप मस्करी केली


तो तरून बोलला की, जर ही बाहुली एखाद्या माणसाच्या शरीरात घाव करू शकते तर मी नक्कीच ते अनुभवू इच्छितो. वाॅरेनने त्या दोघांना तिथून बाहेर जाण्यास सांगितले. म्युझियम बाहेर गेल्यानंतर काही वेळातच त्या दोघांचा अपघात होतो, त्यामध्ये त्या तरूणाचा मृत्यु होतो आणि ती मुलगी गंभीर जखमी होते.

वाॅरेनचे म्हणणे होते की,

“तुम्ही कधीही राक्षसी ताकदीला आव्हान करू नका, कारण त्या शक्ती माणसापेक्षा खूप शक्तिशाली असतात.”

एड और लाॅरेन वाॅरेन

एडवर्ड वाॅरेन आणि लाॅरेन रीटा वाॅरेन अमेरिका पॅरानाॅर्मल एक्टिविटीज इन्वेस्टिगेटर्स होते. एडवर्ड दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी अमेरिका नौसेनेचे अधिकारी होते. त्यांची पत्नी लाॅरेन रीटा वाॅरेन पॅरानाॅर्मल एक्सपर्ट होती.
या दाम्पत्यांनी ‘द वाॅरेंस ॲाकल्ट’ नावाचे म्युझियम उघडले होते आणि त्यांनी आतापर्यंत जवळपास १०,००० भूतांची प्रकरणे सोडवली होती. एडवर्ड वाॅरेनचा २००६ मध्ये मृत्यू झाला.

आजही ती बाहुली त्या म्युझियम मध्ये पाहायला मिळते.

Saturday, April 25, 2020

शापित बाहुली एक सत्य घटना

        

एनाबेल हा हाॅलिवूड चा चित्रपट आहे. या चित्रपटाने आणि त्याचाच दुसरा भाग असलेल्या एनाबेल क्रिएशन या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच घाबरवले.

या चित्रपटामध्ये दाखवलेली बाहुली खुप विचित्र आणि भीतीदायक आहे. एनीबेल हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. 

या चित्रपटामधे जसे लोकांना बाहुली त्रास देते, तसेच खऱ्या आयुष्यामध्ये देखील झाले आहे. चित्रपट फक्त बघूनच ते एवढे भयानक वाटते, मग विचार करा की, खऱ्या आयुष्यामध्ये ज्यांनी अनुभवलेल असेल त्यांच्यावर काय परीस्थिती ओढवली असेल.

गोष्टींची सुरूवात :——

१९७० मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणारी डोना जी तिची मैत्रीण अनंगीबरोबर एका अपार्टमेंट मध्ये राहत होती. त्यांच्याबरोबर लू नावाचा मुलगा सुध्दा राहत असे.

डोनाच्या आई ने तिच्या वाढदिवसाला तिला एन्टिक बाहुली गिफ्ट केली होती. पण तिच्या आई ला आणि तिला हे माहीत नव्हत की, काही दीवसामध्ये ती बाहुली त्यांचे जगणे कठीण करून ठेवेल.

डोना आपल्या आईने दिलेली बाहुली आपल्या बेडवर एका कोपऱ्यात सजवून ठेवत असे.
 काही दिवसांमध्ये डोनाला आणि तिच्या मैत्रीणीला त्या बाहूलीचा वाईट अनुभव येऊ लागला. त्याच्या लक्षात आले की, बाहुली स्वतःहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. त्या दोघी ज्या ठिकाणी बाहूलीला ठेवून जात असत, घरी आल्यावर बाहुली त्या जागेवर नसायची. ती बाहुली दूसऱ्याच ठिकाणावर असे. बाहूलीला एखाद्या रूम मध्ये जर दरवाजा बंद करून जरी त्या दोघी बाहेर गेलेल्या असल्या तरी सुध्दा तरी ती बाहुली आपली जागा सोडून बाहेर जात असे.

हळू हळू रूम मध्ये काही चिट्या मिळू लागल्या. त्याच्यावर ‘हेल्प मी’ असं लिहीलेल असायच. ते अक्षर एखाद्या लहान मुलाच असावे. त्यानंतर त्यांनी एक आत्माशी संवाद साधणाऱ्या एका व्यक्तींला बोलावले. त्या व्यक्तीने सांगितलेकी, या बाहूलीमध्ये लहान मुलीची आत्मा आहे. तिचे नाव एनाबेल होते. ती मुलगी इथेच खेळायची आणि तिचा मृत्यू देखील येथेच झाला आहे. तिला डोना आवडते तिला तिच्याबरोबर राहायच आहे. डोनाने तिला ठेवण्यास होकार दिला.

थोडे दिवस गेल्यानंतर परत डोनाला भयानक अनुभव यायला सूरूवात झाली. तिच्याबरोबर राहणाऱ्या लू ने सांगितले की, या बाहुलीमध्ये राक्षसी ताकत आहे आणि तिला जवळ ठेवने खूप भारी पडू शकते.

 एकदा लू वर त्या बाहूलीने हल्ला केला. हे त्याने डोना आणि अनंगीला सांगितले पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हळूहळू डोनाला लक्षात आले की, त्या बाहूलीमध्ये लहान मुलीचा आत्मा नाही. ऐके दिवशी दुपारी लू आणि अनंगी घरात गप्पा मारत असताना त्यांना डोनाच्या रूममधून किंचाळण्याचा आवाज आला, परंतु डोना तर घरात नव्हती. त्या दोघांनी घाबरतच तिच्या रूममध्ये प्रवेश केला, पण तिथे ती बाहूली सोडून कोणीच नव्हत. बाहूलीने लू वर हल्ला केला आणि त्याला जखमी केले. या घटनेनंतर लू शाॅकमध्ये गेला.

पॅरानाॅर्मल इन्वेस्टीगेशन :——-

लू वर हल्ला झाल्यानंतर डोनाच्या लक्षात येते की, ही मुलगी शापित आहे आणि तिच्यामध्ये राक्षसी आत्मा आहे.

डोना मदत मिळवण्यासाठी एक बिशप “फादर हेगन” कडे जाते. फादर हेगन ला ती बाहूली शापित असल्याचे कळते. म्हणून तो डोनाला आपल्यापेक्षा वरिष्ठ “फादर कुक” कडे पाठवतो.

फादर कुक इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पॅरानाॅर्मल एक्सपर्ट वाॅरेन दाम्पत्याला बोलवतात. 

वाॅरेन दाम्पत्य त्या तिन्ही मित्रांचे म्हणणे ऐकतात आणि एक आठवडा त्या बाहूलीच्या व्यवहाराचे निरीक्षण करतात. तेव्हा त्यांना समजते की, त्या बाहुलीला डोनाच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी त्या बाहूलीने एवढा खटाटोप केला होता.

तिला लू आवडत नसे म्हणून तिने त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्यांनी बोलवलेल्या माणसाला सुध्दा त्या बाहूलीने खोटे सांगितले.

To be continue next blog ……….

Friday, April 24, 2020

श्रीलंकेत रामायण


सोशल मीडीयामध्ये “जा पाकिस्तानात” चा गजर घुमत असतो. वंदेमातरम म्हणायच नाही? जा पाकिस्तानात! राष्टगीताला उभं राहायच नाही? पाठवा पाकिस्तानात!

अर्थात, हा काही प्रेमळ सल्ला नसतो. विविध कारणांनी “देश्याशी गदारी” करणाऱ्या लोकांना शिक्षा म्हणून पाकिस्तानात पाठवायला पाहीजे असा स्वयंघोशीत देशभक्त न्यायाधीशांचा हा ॲानलाईन दम असतो. असो आपल्या हिंदू धर्मात दोन ग्रंथाना प्रचंड महत्व दिल आहे. ते म्हणजे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’. रामायण म्हणजे ‘आदर्शवाद’ आणि महाभारत म्हणजे ‘वास्तववाद’.
पण तात्पुरत तरी या दोन्ही ग्रंथांबाबतच्या आख्यायिका किंवा त्यात सांगितलेले चमत्कार यांकडे आपण दुर्लक्ष करायचं जरी ठरवल तरी यांची पाळं मुळ किती खोलवर गेली आहेत याचा आपल्याला अंदाज सुध्दा यायचा नाही! पण, खरच वाटत की रामायणावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी एकदा श्रीलंकात जाऊन यांवच. रामायनातील चमत्कार बाजुला ठेऊया क्षणभर. परंतु, रामायण घडले नाही,असं ठामपणे म्हणणाऱ्याना लोकांनी रामायणातील विविध प्रसंगांचे श्रीलंकेत सापडणारे पुरावे आवर्जून बघायला हवेत.

                                          

रामायणामधील लंका म्हणजे आजची श्रीलंका. भारत आणि श्रीलंकामधील भल्यामोठ्या समुद्राच अंतर भगवान रामाने सेतू बांधून पार केल्याच आपण ऐकत आलो आहोत. त्यानंतर प्रभूंनी श्रीलंकेत जाऊन रावणाशी युध्द केले आणि विजय मिळवला. रावणाची लंका म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर असे देखील म्हटले जाते. रामायणामधे लंकेचा अर्थात आजच्या श्रीलंकेचा थेट उल्लेख असल्यामुळे आपल्याला या देशाबद्दल खूप अप्रूप ही वाटत. अर्थात सध्याची श्रीलंका सोन्याची नाही. पण तिथे आपल्याला रामायनामधील बरीचशी ठिकाणी आणि काही गोष्टी आजही अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात.
 

अश्या काही ठिकाणांची माहिती घेऊ या.

मंदोदरी महाल
——
श्रीलंकामध्ये मंदोदरी महाल पाहायला मिळतो. या महालाच्या चारी बाजुला धबधबे आणि घनदाट जंगल आहे. रावणाने माता सितेच हरण केल्यानंतर तिला याचं मंदोदरी महलामधे ठेवले होते. याला स्थानिक भाषेत ‘सीता कोटूवा’ अर्थात सीतेचा किल्ला असे म्हटले जाते.

पुष्पक विमान स्थळ ——

याचं सिंहाला शहरामध्ये वेरागनटोटा नावाचे ठिकाण आहे. याचा अर्थ आहे ‘विमान उतरण्याचे ठिकाण’ असे म्हणतात की हीच जागा आहे जेथे रावण त्याचे पुष्पक विमान उतरवायचा.

अशोक वाटीका ——

रावणाने येथेच माता सीतेला कैद करून ठेवले होते. बाजूलाच पाण्याचा ओढा देखील आहे. म्हणतात की माता सीता याचं ओढ्यामध्ये स्नान करायची. या ओढ्याच्या आसपासच्या दगडांवर भले मोठे पायांचे निशान आढळून येतात. हे निशान हनुमानाचे असल्याचे सांगितले जाते. या ओढ्याच्या काठावर राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे मंदीर आहे.

सीता तलाव ——

श्रीलंकामध्ये आजही तो दूरवर जाणारा रस्ता पाहायला मिळतो ज्यावरून रावणाने माता सीतेच हरण करून लंकेत प्रवेश केला. त्या रस्त्यावर झाड या एकही लहानस रोपट ही नाही. याचं मार्गावर हा सीता तलाव आहे. असे म्हणतात की माता सीतेच्या अश्रुंनी या तलावाची निर्मिती झाली. दुष्काळ पडलाकी आसपासच्या नद्या कोरड्या पडतात पण हा तलाव मात्र कधीही आटत नाही. हे विशेष! या सीता तलावाच्या आजूबाजूला सीता फुल आढळतात. या फुलांची खासीयत ही आहे की या फूलांना अगदी जवळून पाहील्यास कोणीतरी व्यक्ती हातात धनुष्य घेऊन उभा असल्याचा भास होतो. स्थानिकांच्या मते माता सीता या फुलांच्या माध्यमातून प्रभू रामाचे दर्शन घ्यायची. हे फुल पृथ्वीतलावर केवळ याचं जागेत आढळते.

जेथे रावणाने सीता मातेला लपवून ठेवले होते: ———
श्रीलंकेमधे रावणगोडा नावाचे ठिकाण आहे. म्हणतात की जेव्हा हनूमानाने आपल्या शेपटीने संपुर्ण लंका उध्वस्त केली तेव्हा याचं जागी रावणाने माता सीतेला लपवून ठेवले होते. या जागी अनेक गुहा आणि भुयारे आहेत. ही भुयारे थेट रावणाच्या शहराला जोडतात. मुख्य म्हणजे ही भुयारे नैसर्गिक नसून तयार करण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी हनुमानाने रावणाचे विमान जाळले होते तेथे आजही जळल्याचे डाग आहेत आणि तेथील माती करड्या रंगाची आहे.

श्रीलंकेच्या अनेक पर्वतावर आजही संजीवनी वनस्पती आढळते.
                 
        
ही सगळी फार मोजकीच उदाहरणं आहेत. तुम्हाला श्रीलंकामध्ये अशी इतर अनेक ठिकाणे आढळतील ज्यांचा उल्लेख रामायणामध्ये आहे, किंवा रामायनातील विविध घटनांचा संदर्भ आहे.

म्हणूनच म्हटल ना, - रामायणावर विश्वास नसनाऱ्यांना एकदा श्रीलंकेत पाठवायला हवे!