Friday, May 8, 2020

हरनाम कौर


                                   

महिलांच्या शरीरावर केस फक्त आणि फक्त डोक्यावर बघायला भेटतात, म्हणून शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी महिला ब्युटी पार्लर मध्ये पैसे खर्च करून त्यांच दुखन सहन करते. आणि अजुन छान दिसण्यासाठी सर्जरी करून घेते. परंतु आपल्या देश्यामध्ये एक माॅडेल आहे तिला दाडी आणि मिशी येते. आणि त्याच्यासाठीच ति ओळखली जाते.

आपण बोलत आहे ती माॅडेल हरनाम कौर हिला लोक दाडी वाली माॅडेल म्हणतात. हरनाम ला स्वतःच्या दाडीची लाज नाही वाटत पण गर्व वाटतो. शेवटी हरनाम ला दाडी का आहे? आणि काय आहे कहाणी तिला सफलता मिळण्याची….

पोलीसायटीक सिंड्रोम आजार झाला होता
                                 
हरनाम कोर ला ११ व्या वर्षी  कळाले की तिला पोलिसायटीक सिंड्रोम हा आजार झाला आहे. त्याच्यामूळे तिच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत होते, म्हणून तिच्या शरीरावर पुरषांसारखे केस उगवत आहेत 

हारली नाही ती

हरनाम कधीच आयुष्यात हरली नाही तिने जिद्दीने सगळ्या गोष्टींचा सामना केला. तिने स्वतःच्या शरीरावर आलेल्या केस कधीच वैक्स नाही केले. आणि तिने ते केस वाढवले.

रचली एक नविन सुंदरतेची परीभाषा

मोठी झाल्यानंतर हरमन ने अस प्रोफेशनची निवड केली की तिथे फक्त सुंदरता पाहीजे असते. तिने माॅडलिंग करायला सुरवात केली

हरमन ने बदलले विचार
                          
स्वतःच्या विचाराने आणि मेहनतीने तिने माॅडल्स चे विचारच बदलून ठेवले. तिने सेलेब्रिटी ज्वेलरी डिजाइनर मैरीयाना हरूटूनिएन च्या शो मध्ये कैट वाॅक केला.

स्वतःच्या जिवावर जिंकुन घेतले जगाला



हरनाम कौर आज फक्त बोलण्याचा विषय नसून तिच्या घरातल्यांचा गर्वाचा विषय आहे. हरनाम कौर ही एक आत्मविश्वासी आणि काबील महीला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड

आयकाॅनिक गिनीज वर्ल्ड रेकाॅडने आपली ६२ वी आवृत्ती प्रकाशीत केली आहे. या वेळी जगभरातील चार हजाराहून अधिक आश्चर्यकारक नोंदीचा या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे, परंतु सर्वात अनोखा विक्रम दाढी मिशी असलेल्या महीलेचा, हरनाम कौर आहे.
                                 
स्वतःला ओळखायला आले पाहीजे

हरनाम म्हणली की “पहिला लोक माझी चेष्टा करत होते. तेच लोक आता माझी इज्जत करतात. मी महीलांना फक्त एवढच सांगेन दूसऱ्यांसाठी नाही तर स्वतः साठी जगायला शिकले पाहिजे. आपले विचार बरोबर असतील तर कोणाच्यातरी लाख बोलण्याने तुमची सफलता कोणी थांबवू नाही शकत.”

Wednesday, May 6, 2020

लढाऊ विमान


एक लढाऊ हे प्रामुख्याने इतर विमानाच्या विरोधात हवेतल्या हवेत लढण्यासाठी रचना केलेले लष्करी विमान आहे. या लढाऊ विमानाचा मुख्य उद्देश रणांगणात हवाई प्राबल्य प्रथापित करण्यासाठी आहे. हे बाॅंबफेकी विमाने (bombers) आणि इतर विमाने ज्यांचे मुख्य ध्येय जमीनीवर हल्ला आहे अशा हल्ला विमानांपेक्षा निराळे असते. तरी अनेक विमानांना जमिनीवर हल्ला करता येईल अशी दुय्यम क्षमता असते. काही विमाने अनेक हेतू सैनिक हाताळणी आणि बाॅंबफेकी विमाने म्हणूनही रचना केलेली आहेत. यामुळे अनेकदा लढाऊ विमान अशी मानक व्याख्या पूर्ण अशी आहे. पहिल्या महायुद्धा पासून हवाई प्राबल्य हे परंपरागत युध्दामध्ये विजयासाठी आवश्यक मानले गेले आहे. हवाई सर्वाधिकार प्राप्त करण्यासाठी यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न हे त्या वैमानिकाच्या कौशल्यावर, विमानाच्या वापरावर, रणनीती विमानाची संख्या आणि कार्यक्षमता या अनेक घटकांवर अवलंबून असते. लढाऊ विमाने हे आधूनिक सशस्त्र दलांच्या संरक्षण खर्चाच्या अंदाजपत्रकात एक मोठा भाग व्यापतात.

इतिहास
पहिल्या महायुध्दात या विमानाची सुरवात झाली. आधी ही विमाने खुप लहान आणि हलकी होती. परंतु ती सशस्त्र होती. विमान एका लाकडी सांगाड्यावर बांधले जात असे. त्यास कापड्याने झाकले जात असे. त्यामुळे कमी वजनाचे विमान तयार होते. दुसऱ्या महायुध्दापर्यंत यांत सुधारणा होऊन धातूची विमान बांधली जाऊ लागली यांत मशिन गन बसवल्या जात असत. यांना पंख्याची इंजिने असत. काही विमान ताशी ४०० मैल वेग गाठत होते. यांना एकच इंजिन असत असे. दोन इंजिनांची विमानेही बांधली गेली पण तेव्हीढी कार्यक्षमता नव्हती. इ.स. १९५० नंतर या विमानांना रडार लावण्यास आले. त्यामुळे वैमानिक दूरवर पाहू शकत होते. १९६० नंतर मशिन गन्स जाऊन त्यात हवेतल्या हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जाऊ लागली.

 
स्टेल्थ फायटर 
स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे विमाने रडारपासुन काही प्रमाणात तरी लपून राहू शकतात. स्टेल्थ फायटर विमानाच्या पृष्ठभागावर खास पदार्थाचे आवरण दिलेले असते. हे आवरण रेडिओ लहरी शोषून घेतात. तसेच सर्वसाधारण विमानाप्रमाणे स्टेल्थ विमानाची इंजिने बाहेर नसतात. ती लपविलेली असतात. स्टेल्थ तंत्रज्ञान रडार विमान ओळखण्याची शक्यता कमी असते.

भारत
भारताचेही लढाऊ विमान बनवण्याचे प्रकल्प सुरू आहेत. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदूस्तान एरोनाॅटिक्स लिमिटेड या कंपन्या मिळून नवीन स्टेल्थ विमान बनवत आहेत. याला सुखोई-हाल FGFA -फिफ्थ जनरेशन फायटन एअररक्राफ्ट असे नाव देण्यात आले आहे. या शिवाय आडव्हास मीडियम काॅंबॅट एअरक्राफ्ट हे भारत स्वतःच्या बळावर पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान बनवत आहे.

Monday, May 4, 2020

सांगकाम्या


सांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय. यास यंत्र मानव असेही म्हणतात. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळून येतो.

उपयोग


यंत्रमानव सांगकाम्याचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात.हे सांगकामे यंत्रमानव शक्तीची कामे कमी वेळात करू शकतात. मोटार वाहन उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरतात. हे ‘औद्योगिक’ सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर स्पोटके शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरतात. कारण यांत काही अपघात घडून मानव जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात.जसे की घरीच स्वच्छता करणे. ठराविक भागातील गवत कापणे. अंतराळ क्षेत्रात यांचा उपयोग होतो. जसे मंगळ ग्रहावर सांगकामे यंत्रमानव उतरून तेथील वातावरणाचे संशोधन केले जाते. या सांगकाम्याना फक्त आज्ञावली मार्फत दिलेले कामच करता येते. त्यांची निर्मिती अनेकदा एका प्रकारचे काम करण्यासाठी झालेली असते.
स्वरूप
सांगकामे यंत्रमानव हे मानवी स्वरूपात दिसतील असे नाही. यांना हात, पाय, डोळे आदी अवयव सदृश सेन्सर्स असलेच पाहीजेत असे नसते. हे सांगकामे निरनिराळ्या स्वरूपात असू शकतात. यांना कामासाठी आवश्यक असलेले अवयवच जोडलेले असतात जसे की यांत्रिक हात.

सध्या काळात हा सागकाम्याची खुप मदत होताना दिसते. पुर्ण जगभरात कोरोना असल्यामुळे काही लोक कामावर जातात काही घरीच आहेत. पण याच कोरोनाच्या काळात हेच सांगकामे आपली मदत करताना दिसतात. अशीच एक घटना केरळ मध्ये घडली आहे.

जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या या प्राणघातक कोरोनाव्हायरस विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केरळमध्ये एक अनोखी कल्पना समोर आली.

केरळ स्टार्टअप मिशन (केएसयुएम) नावाच्या सहकारी एजन्सीने मुखवटा, सॅनिटायझर्स वाटप करणारे आणि जीवघेणा रोगाबद्दल लोकांना शिक्षित करणारे दोन रोबोट बाजारात आणले आहेत.

असीमोव रोबोटिक्स विकसीत केएसयुएम काॅम्प्लेक्समध्ये हे दोन रोबोट कार्यरत आहेत. एक रोबोट मुखवटे आणि सॅनिटायझर्स वितरित करीत असताना, दुसरा धोका टाळण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ॲार्गनायझेशनच्या मोहीमेविषयी तपशिल करतो.













रोबोट इतर कामे ही करतात जसे की दरवाजा साफ करणे आणि कोरोनाव्हायरसच्या प्रश्नाना उत्तर देणे.

सगळेजण आपली कामे नियमाने पार पाडत आहेत. ते डाॅक्टर असो वा पोलीस. थोडी साथ आपणही देऊया. घरात राहूया, आणि सुरक्षित राहूया.

Saturday, May 2, 2020

आंतरराष्ट्रीय कामगार दिन


महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोकांना सुट्टी असते. १ मे १९६० ला महाराष्ट्र दिन म्हणून जाहीर केले गेले. आणि मुलांच्या शाळेचा निकालाचे दिवस असतो. त्यांना १५ दिवस आधी जरी सुट्टया दिल्या असल्या १ मे ला शाळेत जावच लागत. त्यामुळे शिक्षकांना ही सुट्टी नसते. असो…..

भारत

                                              
चेन्नई येथे भारतातील पहिला १ मे कामगार दिन म्हणून १ मे १९२३ रोजी साजरा केला गेला. त्या वेळेस तीथे मद्रास डे म्हणून ओळखले जात असे. याची सुरवात भारतीय मजदूर किसान पक्षाचे नेते कारमेड सिंगरावेलू चेट्यार यांनी केली. भारतात उच्च न्यायालयासमोर एक मोठे प्रर्दशने आणि एक मोठा ठराव मंजूर करून हा दिवस भारतात कामगार दिन म्हणून साजरा करावा आणि या दिवशी सुट्टी जाहीर करावी यांवर एकमत झाले. हा दिवस १ मे रोजी भारतासह सुमारे ८० देशांमध्ये साजरा केला जातो. यामागील कारण म्हणजे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो.

महात्मा गांधी
            
माहात्मा गांधी म्हणाले होते की देशाची प्रगती त्या देशांतील कामगार आणि शेतकऱ्यावर अवलंबून असते. उद्दोगपती, मालक, किंवा व्यवस्थापक मानण्याएवजी ते स्वतःला विश्र्वस्त म्हणून करू लागले. लोकशाही रचनेत सरकार लोकांच्या वतीने देखील निवड केली जाते. जे राजकीय लोकांना त्यांच्या देशांचे विश्र्वस्त म्हणून सोपवतात. व्यवस्थापनासाठी शांतता व कायदेशीर व्यवस्था राखण्यासाठी कामगार व शेतकरी यांचे कल्याण व विकास करऱ्यासाठी ते वचनबध्द आहेत. मोठ्या संख्येने कामगार व शेतकरी यांचे राज्य कार्यात मोठे योगदान आहे. औद्योगिक शांतता, उद्दोजक आणि कामगार यांच्यात शांततापुर्ण आणि कौटुंबिक संबंध राखणे ही सरकारची भूमिका आहे,

महाराष्ट्र
                                      
त्यांच दिवशी १ मे ला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. कामगार दिन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात साजरा केला जातो. येथील सर्व व्यापारी आणि कारागीर सुट्टीवर जातात.

आंतरराष्ट्रीय कामगार दीनाच्या दिवशी आम्ही मजुरांच्या कर्तुत्त्वाविषयी बोलतो, परंतु त्यानंतर आपण विसरून जातो की आज आपण आपल्या घरात बसून आराम घेतो. काही फरक पडत नाही की बाहेर काय चाललंय. आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहीजे अशी वेळ आली आहे की आपण या कठीण वेळी त्यांना सात दिली आणि कठीण परिस्थितीत त्यांचे समर्थन केले, आणि त्यांचा सन्मान केला पाहीजे आणि कृपया आदर द्दा….

Thursday, April 30, 2020

भितीदायक सत्य घटना


भयानक घटना म्हणटले की आपल्याला भिती वाटायला लागते. पण काही घटना सत्य ही असतात,आणि काही काल्पनिक ही असतात. जे आपण TV मलिका आणि सिनेमांमधून बघतो ते सर्व काल्पनिक असते. आपल्या अजुबाजूला भितीदायक घटना घडत असतात त्या ऐकुन आपल्याला विश्वास होवू लागतो, की भूतं, जादूटोणा वगैरे आहे. आज आपण आश्याच दोन सत्य घडलेल्या घटना पाहणार आहोत.

१. डीसुजा चाळ
                   
डीसुजा चाळ ही मुंबईच्या माहीम येथे आहे. ही चाळ खुप मोठी असुन त्या चाळींमध्ये एक विहीर आहे. अस सांगतात की २० वर्षा पुर्वी या विहीरीला कोणतीही कडा नव्हती. एकदा चाळीत राहनारी एक महिला पाणी घेण्यासाठी त्या विहीरीकडे गेली असताना, त्या विहीरीला कडा नसल्याने तीचा पाय घसरून ती विहीरीत पडली. ती स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती. तीची हाक कोणालाही ऐकु आली नाही. ती त्या विहीरी मध्ये बुडून मरन पावली. या घटनेला २० वर्ष झाली तरीही त्या विहीरी कडे जाण्यास लोक घाबरतात. त्या विहीरी भोवती तिची आत्मा फिरत असते असे तिथे राहणारी लोक सांगतात.
तिथे त्या विहीरीचा मालक दर आमावश्याला पुजा करतात. बऱ्याच लोकांनी एका महीलेची आकृती पाहिली ती नंतर अदृश्य होते. त्या आत्माने तिथे राहणाऱ्या लोकांना हाणी पोहचवली नाही. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. पण लोकांना बहुतेकदा सल्ला दिला जातो, की एकट्याने तिथे जाऊ नका. या चाळीत आणखी एक आत्मा आहे ती म्हणजे एका रक्षकाची असुन बहुतेकदा एका झाडाच्या जवळपास दिसते. तो रात्री येत असल्याचे दिसुन येत आहे. आणि काही लोक त्याला चाळीचे रक्षण करताना बघतात.

२. टाॅवर ॲाफ सायलेन्स

टाॅवर ॲाफ सायलेन्स हे नाव ऐकण्याईतकेच भीतीदायक आणि शांत आहे. दिवस रात्र इथे शांतता असते. आणि ही शांतता प्राणघातक आहे. याला शांततेचे क्षेत्र मानले जाते. हा जगातील सर्वात भयानक भाग मानला जातो. हे अश्या प्रकारचे एकमेव क्षेत्र आहे जेथे भितीदायक प्रवास केवळ पृथ्वीच्या अनुभवापुरते मर्यादित नाही तर त्या पेक्षा बरच काही आहे. दिवसा आपल्याला येथे एकापेक्षा जास्त भितीदायक दृश्य पाहायला मिळेल. इथली दृश्य भीतीदायक तसेच भिन्न आहेत.

इथल्या दृश्यांमध्ये लपलेल्या भीतीचे एक मोठे कारण आहे. आणि त्याचे कारण धार्मिक विधी आहे, ज्यामुळे येथे येणे म्हणजे वाईट गोष्टी स्वतःवर ओढावून घेतल्यासारखे होते. मुंबईच्या मलबार हिल भागांत स्थित टाॅवर ॲाफ सायलेन्स प्रत्यक्षात पारशी स्मशानभूमी आहे. इथल्या पारशी समाजातील लोक त्यांच्या मेलेल्यांचे अंतिम संस्कार करतात. त्यांच्या मध्ये मेलेल्या मानसाला जाळले किंवा पुरले जात नाही. ते मेलेल्या मानसाचे शरीर तिथे स्मशानभुमित सोडुन येतात. प्राण्याना खाण्यासाठी. गिधाडे आणि गरूड ते शरीर खाउन टाकतात.
विकृत शरीर, मानवी सांगाडे, शरीरातून देहाचे मांस पाहून आपले रक्त गोठेल. दिवसात ज्या ठिकाणी असे घडते, त्या ठिकाणी रात्री काय देखावे असतील. येथील स्थानिकांमध्ये प्रचंड भिती आहे. इथे जरी एखाद्याने दिवसा जाण्याची चूक केली तर रात्रीच्या वेळी कोणीही इथे जाण्याची हिम्मत करत नाही.

येथे एक मुलगी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसते. जे रात्रीच्या वेळी त्या रस्त्यातून येनाऱ्या जाणाऱ्यांना लिफ्ट मागत असते. या व्यतिरिक्त या ठिकाणी कार अपघातात ठार झालेल्या पारशी कुटूंबातील व्यक्तीनी त्या मुलीला पाहिले असल्याचा दावाही केला जात आहे.

तिथे बऱ्याचदा लोक येताना आणि जाताना दिसतात. ते गाडी खराब झाल्याच्या बहाण्याने लोक त्यांच्यकडे खेचतात आणि मदतीसाठी आवाहन करतात. या आत्म्यांनी इथून जाणाऱ्या काही लोकांचे नुकसान केले, त्यानंतर येथे अस सांगण्यात येते की तेथे जाणे धोक्याच ठरू शकत. आणि आजारपणाचे आव्हान आहे.

हे ऐकण्यासारखे किती आहे, आणि खरे किती आहे. काही लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण अज्ञान लोक घाबरतात

Wednesday, April 29, 2020

भारत आणि चीन


सध्याच्या काळात चीन मध्ये काही वेगळीच परिस्थिती आहे. चीन मध्येच नव्हे तर पुर्ण जगात कोरोना ने थैमान घातलाय. चीन मध्ये आताची बेताचा झाली आहे. त्यांनी केलेला करोनाचा सामना या सगळ्याबद्दल बोलले जात आहे.चीन ने हॅास्पिटल उभे केले ते ही फक्त ७ दिवसात आपल्या देश्यातील लोकं लवकर बरे व्हावे म्हणून. कित्येक रूग्णांचे जीव वाचवले.

ह्या बातम्या माहिती असतीलच, पण साधारण १९४० मध्ये भारतातल्या आणि खास म्हणजे महाराष्ट्रातल्या एका डाॅक्टरने चीनला जाऊन तिथल्या रूग्णांना बर केलं, त्यांची सेवा केली. हे कदाचित कोणाला माहीत नसावे.

चीनमधला कोणताही बडा नेतां भारतात आला की तो एका कुटूंबाशी हमखास भेटतो. मुंबईच्या कोटणीस कुटूंबाची. काही जणांची ज्यांच नाव ऐकल असेल अश्या डाॅ. व्दारकानाथ कोटणीस .

कोण होते डाॅ. कोटनीस, ज्यांना चीन मध्ये इतका मान दिला जातो.

दुसऱ्या महायुध्दावेळी चीन आणि जपान एकमेकांविरूध्द लढले होते. त्याचवेळी एका भारतीय डाॅक्टरांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चीनी सेनिकांचे प्राण वाचवले होते.

डाॅ. व्दारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांच नाव. जपान आणि चीनमधलं युध्द पेटल्यानंतर चीन चे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगच लागण झाली होती. त्या वेळी आपल्या इथे इंग्रज सरकार होत. चीन ने इंग्रज सरकारांकडून मदत मागितली होती. त्याचवेळी कोटणीसकरांना नुकतीच डाॅक्टर ची पदवी मिळाली होती. ते त्यांच्या गावी सोलापूरला जावून दवाखाना उभारणार होते. त्याचवेळी त्यांना इंग्रज सरकारच पत्र मिळाले की, चीन मध्ये तुम्हाला जाव लागणार आहे. ते घरच्यांची परवांगी घेण्यासाठी ते गावी गेले. घरच्यांनी चीन ला जाण्यास परवांगी दिली.

भारतीय वैद्यक मिशनंन एक टीम चीन ला पाठवली. त्या टीममध्ये डाॅ. कोटनीस हे एक होते. ते आपल काम अतिशय मन लावून करत असत. त्यांनी केलेल्या सेवेमुळे अनेक चीनी सैनिकांचे प्राण वाचले. युध्द भूमीवर प्लेगच भीषन लागन झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डाॅक्टर घाबरत असत.पण कोटनीस कधी घाबरले नाहीत. त्यांनी कीमान ८०० जणांवर उपचार केले असावेत. अस म्हणतात तिथल्या परीस्थितीमुळे त्यांच्या सोबत भारतातून आलेले डाॅक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्या समर्पण भावामुळेच त्याचा चीन मध्ये आदर केला जातो. वयाच्या यवघ्या ३२ व्या वर्षी १९४६ साली डाॅ. कोटनीस यांच अल्पशा आजारान निधन झालं.

“सैन्यानं एका चांगला सहकारी आणि देशान एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवन सदैव आपल्या मनांत  ठेवूया.” असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटनीसांना आदरांजली वाहताना काढले होते.

      
चीन मध्ये असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्किंगलन नावाच्या एका नर्सच्या प्रेमात पडले. २०१२ मध्ये त्यांच डालीयन या शहरात निधन झालं. त्यांना एक मुलगा होता. पण तो वैद्दकिय शिक्षण घेत असताना वयाच्या २४ वर्षीच त्याचा मृत्यु झाला.

डाॅ. कोटणीस यांच मुळ गाव सोलापूर. त्यांनी मुंबईच्या सेठ जी.एस. मेडिकल काॅलेजमध्ये वैद्दकीय शिक्षण घेतलं.

भारतात मात्र त्यांची फारशी आठवण कुणी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डाॅ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता.

चीनमध्ये आजही आदरणीय
चीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीननं त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट छापले आहे. हंबे या भागांत त्यांच स्मारक उभारण्यात आल आहे. या शतकातील चीनचे सर्वात जवळचे परदेशी मित्र अस सर्व्हेक्षन २००९ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आल होत. या यादीमध्ये डाॅ. कोटनीस यांचही नाव होतं. डाॅक्टरांचा आजही चीनमध्ये खुप आदर केला जातो अस चायना डेली या वृत्तपत्रात म्हटल आहे.

डाॅ. कोटनीस यांच्या लोकप्रियतेच कारण काय? १९५० सालापासुन आजपर्यंत त्यांच्या कुटूंबियांना चीनचे नेते का भेट देतात?

“१९६२ साली भारत आणि चीन चे संबंध बिघडले. पण कधीकाळी दोन्ही देशांनी परदेशी राजवटीविरूध्द आणि वसाहतवादाविरूध्द लढा दिला आहे. या भेटीमागे हा देखील समान धागा आहे.” अस चीनविषयक धोरणांचे अभ्यासक श्रीकांत कोंडापल्ली यांच म्हणणं आहे.
“भारत आणि चीन एकाच वेळी वसाहतवाद आणि साम्राज्यवादी लढत होते. कोटनीस कुटूंबीयांचि भेट धेऊन चीनी नेते दोन्ही देशांत असलेल्या एकतेच्या भावनेची पुन्हा आठवन करून देतात.” असही कोंडापल्ली म्हणतात.

१९४० साली म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या सात वर्ष आधी आणि चीनच्या क्रांतीनंतर सात वर्षांनी माओ यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहीले आणि सांगितलं, “चीनी आणि भारतीय लोकांचा उध्दार म्हणजे सर्व शोषितांचा उध्दार करणे आहे.

१९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी चॅंग काय शेक यांना एक पत्र लिहीले, पत्रात ते लिहीतात, “तुमच्याबद्दल आणि तुमच्या स्वतंत्र्य युध्दाबद्दल कायमच आस्था होती. हा संदर्भ आणि आपल्या संवादामुळे मला चीन च्या समस्या आणखी चांगल्या समजल्या.”

प्रा. कोंडापल्ली सांगतात, ते जेव्हा डाॅ कोटनीस यांना आदरांजली वाहतात तेव्हा भारत आणि चीनच्या सौहार्दापुर्व संबंधाची आठवन येते.

त्यानंतर आता जग फार बदललं आहे

चीन आणि जपान या जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारताचे दोघांशीही आर्थिक संबंध आहेत. भुतकाळातील काही बाबी आणि सीमाप्रश्नामुळे जपान आणि चीन यांचे संबंध कायम तानलेले असतात. भारत आणि चीन यांच्यातही सिमावाद आहे.

तरीही डाॅ. कोटणीस यांची आठवण आहेच.

Tuesday, April 28, 2020

छत्रपतींचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”

बहीर्जी नाईक

बहिर्जींकडे फक्त वेषांतरचीच कला होती असे नाही तर समोरच्याचा आपल्या शब्दांनी वेध घेऊन त्यांच्या नकळत सर्व माहिती काढून घेण्याचे कसब त्यांना पुरते अवगत होती.

अहो चक्क दिल्लीचा बादशाह आणि विजापुरचा आदिलशाह यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत.
  जराशीही शंका आली तरी समोरच्याला शत्रु पक्षाचा माणूस ठरवून देहदंड देणाऱ्या भेदक नजर कधीही बहिर्जींचा ठाव घेऊ शकली नाहीत यातच बहिर्जींचे असामान्य कर्तुत्व सामावलेले होते. शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी देखील अतिशय प्रमाणीकपणाने ते खाते चालवत असत. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता.  

    खोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकाऱ्यासह कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीत बहिर्जींना दिली होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेरखाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे. 
  बहिर्जीनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा विकसित केली होती. ही भाषा केवळ गुप्तहेर खात्यालाच कळे. त्यामुळे गुप्तहेर खात्याची माहिती बाहेर फुटली जात नसे. अगदी महत्त्वपूर्ण माहिती द्दायची असल्यास बहिर्जी स्वतःहून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस पडायचे नाहीत.
असे म्हटले जाते की बहिर्जी नाईक असा कोणी माणूस नाहीच, असे काही लोकांना वाटत असे. इतके बेमालूमपणे आणि अज्ञातवास असल्यासारखे ते वापरायचे. 
अनेकांना असे वाटत असेल की बहीर्जी नाईक हे फक्त गुप्तहेराचेच काम करायचे त्यात काय कर्तुत्व? तर अश्यांना सांगावेसे वाटते की,ते लढण्यात देखील तरबेज होते. पण तरीही गुप्तहेराचे काम म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे
शत्रुच्या गोटात असताना कधी कोणाला संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा. त्यमुळे बहिर्जी दांडपट्टा, तलवारबाज यांसारखी युध्द तंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्यांच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगांमधून एकट्याने शत्रुला धूळ चाखवत बाहेर पडायचे.

 अफझल खानाचा वध ही स्वराज्याच्या इतिहासातील मोठी घटना. त्यात बहीर्जींनी फार मोठी कामगीरीच बजावली होती

शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये दिली गेलेली उपाधी सर्वच दृष्टीने सार्थ ठरते 
महाराष्ट्रच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालूक्यामध्ये बाणूरगड नावाचा किल्ला आहे. कधी भेट दिली तर तुम्हाला या गुप्तहेराची समाधी आढळून येईल. तेव्हा न चुकतां या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करण्यास विसरू नका.

                                            Reference by, google.com,  times of Maharashtra, news paper